4 उत्तरे
4
answers
जेनेरिक औषधे म्हणजे काय, ती इतकी स्वस्त का?
35
Answer link
_*💊जेनेरिक औषधे म्हणजे काय?ही औषधे स्वस्त का असतात?*_
१०० रुपयांची मिळणारी औषधे २० रुपयांना, जेनेरिक मेडिसिन एवढी स्वस्त का?असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडलेला असेलच मी *रसुल खडकाळे* आज आपणाला या बद्दल सविस्तर माहिती व उत्तर देत आहे.ही पूर्ण पोस्ट लक्षपूर्वक वाचा.
आपण आजारी पडल्या नंतर आपल्यावर होणाऱ्या उपचारामध्ये सर्वात जास्त खर्च हा औषधींवर होतो.परंतु बरेच लोक आपल्या गरिबीमुळे हे औषधी सुद्धा घेऊ शकत नाही. पण जेनेरिक मेडिसिन चा उपयोग करून महागडी औषधी अगदी माफक दारात आपल्याला मिळू शकते.
आपण जर आकडेवारी बघितली तर भूकंपामध्ये जितके प्राण जात नाहीत तितके प्राण किंवा जीव किंबहुना त्यापेक्षा जास्त औषधी न मिळाल्यामुळे दरवर्षी जातात. ही अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. परंतु याच औषधी कमी व माफक दरात लोकांना पोहोचवण्याचं काम केल राजस्थान सरकारने जेनेरिक मेडिसिन च्या साहाय्याने आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ती चित्तोडगडचे माझी ज़िल्हाधिकारी डॉ.समित शर्मा यांनी.
*जेनरिक मेडिसिन म्हणजे काय?*
मूळ औषध किंवा त्याचे नाव वापरून विविध कंपन्यांद्वारा गोळ्या, सिरप्स बनवली जातात. काही औषध कंपन्या त्यांचं ब्रॅन्ड नेम वापरून औषधं विकतात. ब्रॅन्ड नेम नसलेली पण औषधांचा सारखाच फॉर्म्युला वापरून बनवलेल्या गोळ्या, सिरप म्हणजे जेनरिक औषधं.
जेनेरिक हा तसा मूळ इंग्रजी शब्द आहे. जेनेरिक हे औषधीच मूळ नाव किंवा औषधीच केमिकल नाव आहे. परंतु ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे कि या औषधींच नंतर ब्रॅण्डिंग केल्या जातं आणि त्याची किंमत मूळ किमतीपेक्षा पाचपट तर कधीकधी दहापट वाढविल्या जाते.जर आपण मधुमेह या आजारावरच्या औषधींच उदाहरण घेतलं तर बाजारामध्ये ब्रँडेड औषधींची किंमत ११७ रुपये प्रति गोळी अशी आहे पण तीच जर आपण जेनेरिक औषधी बरोबर जर त्याची तुलना केली तर १.९५ रुपयांमध्ये आपल्याला १० गोळ्या मिळतात.हा अतिशय मोठा फरक आपल्याला दिसून येतो.तर याची किंमत वाढते कशी हाच प्रश्न आपल्याला पडला असेल?तर जे यामध्ये औषधमाफिया आहेत त्यांच्यामुळे या किमती वाढतात.मूळ कंपनी अतिशय माफक दरात औषधे पुरवते परंतु नंतर औषधिमाफियांकढून त्याची किंमत वाढविल्या जाते व डॉक्टरना सुद्धा त्यामध्ये फोर्स केल्या जातो कि तुम्ही हीच औषधी आपल्या कडे येणाऱ्या रुग्णांना द्यावी.
४० करोड पेक्षा जास्त भारतीय आज दोन वेळचं आपल जेवण सुद्धा मिळवू शकत नाहीत.त्यांना औषधी मिळवणं तर फार लांबची गोष्ट झाली.जागतिक आरोग्य संघटना सांगते कि ६५ वर्ष्याच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुद्धा ६५% भारतीय लोक आज सुद्धा मूलभूत औषधी सुद्धा मिळवू शकत नाही.ही अतिशय शरमेची बाब एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यासाठी आहे.दुसऱ्याच हाताला आपण दरवर्षी ४५,००० करोड ची जेनेरिक मेडिसिन दुसऱ्या देशामध्ये निर्यात करतो. इथे आपल्या देशातील लोकांना मूलभूत औषधी मिळत नाहीत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपण दुसऱ्या देशामध्ये औषधी निर्यात करतो.
डॉ.समित शर्मा यांनी जेंव्हा सुरुवात केली तेंव्हा ते १०० वर्ष जुनी शोषन व्यवस्थेविरोधात त्यांना आपला लढा द्यायचा होता आणि फक्त तेच बदल करायचा होत जे आज पर्यंत चुकीचं होत आहे.डॉ.समित शर्मा यांनी आपली बुद्धी वापरून ही शोषण व्यवस्था बदलली आणि अतिशय माफक दरात जेनेरिक मेडिसिन गोरगरीब जनतेसाठी उपलब्ध करून दिली त्यासाठी डॉ.समित शर्मा तसेच राजस्थान सरकार यांना आपण सलाम केला पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर राज्यातील सरकारने सुद्धा जेनेरिक मेडिसिन दुकाने सुरु करावीत जेणेकरून लोक माफक दरात औषधी घेऊन आपला उपचार करू शकतील.

9
Answer link
👉 जेनेरिक औषधे कशाला म्हणतात?
जेनेरिक औषधांना ‘इंटरनॅशनल नॉन प्रॉपराइट नेम मेडिसन’ देखील म्हटले जाते. ज्यांची निर्मिती ब्रँडेड औषधांसारखीच होते. त्याचबरोबर ही औषधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ‘एसेंशियल ड्रग’लिस्टमध्ये सांगितलेल्या वैशिष्ट्यांशी अनुरूप असतात. ज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी देखील परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. ब्रँडेड औषधांसारखीच जेनेरिक औषधांची देखील गुणवत्ता तपासली जाते.
👉 जेनेरिक औषधे स्वस्त का?
ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते. तुमचा डॉक्टर जे औषधे लिहून देतो त्याच स्लॉट मधील जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतात. महाग औषधे आणि त्याच स्लॉट मधील जेनेरिक औषधे यांच्या किंमतीमध्ये कमीत कमी 5 ते 10 पट अंतर असते. काहीवेळा तर जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतीमध्ये 90% फरक असतो.
जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना वेगळ्या संशोधन आणि विकासासाठी प्रयोगशाळा बनवण्याची आवश्यकता नसते. जेनेरिक औषधे बनवणाऱ्यांमध्ये स्पर्धा होते व या औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या औषधांची जाहिरात करत नाहीत, त्यामुळे जेनेरिक औषधांना लागणारा खर्च कमी होतो आणि लोकांसाठी स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध होतात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांपेक्षा बिलकुल कमी नसते आणि त्यांचा होणारा परिणाम सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. जेनेरिक औषधांचा डोस आणि त्यांचे साइड-इफेक्ट काही प्रमाणात ब्रँडेड औषधांसारखेच असतात.
👍👍👍

0
Answer link
जेनेरिक औषधे म्हणजे अशी औषधे जी मूळ औषधांच्या (Brand name medicine) फॉर्म्युलावर आधारित असतात, पण ती मूळ औषधे बनवणाऱ्या कंपनीशिवाय इतर कंपन्या बनवतात.
जेनेरिक औषधे स्वस्त असण्याची काही कारणे:
- संशोधन आणि विकास खर्च नाही: जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना मूळ औषधांसाठी करावा लागणारा संशोधन आणि विकास खर्च येत नाही. कारण त्यांनी फक्त तयार फॉर्म्युला वापरून औषध बनवायचे असते.
- मार्केटिंग खर्च कमी: जेनेरिक औषध कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नसते, कारण डॉक्टर्स आणि ग्राहक दोघांनाही या औषधांची माहिती असते.
- स्पर्धा: अनेक कंपन्या एकाच फॉर्म्युलावर आधारित औषधे बनवत असल्यामुळे बाजारात स्पर्धा वाढते आणि किंमती कमी होतात.
- नियामक प्रक्रिया: जेनेरिक औषधांना नियामक संस्थांकडून (regulatory bodies) मंजुरी मिळवणे सोपे असते, त्यामुळे ती लवकर बाजारात येतात.
सोप्या भाषेत: जेनेरिक औषधे म्हणजे 'copy' केलेली औषधे. त्यामुळे कंपन्यांना जास्त खर्च येत नाही आणि ती स्वस्त मिळतात.
अधिक माहितीसाठी: