4 उत्तरे
4
answers
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
4
Answer link
National Bird of India: Peacock
Common Name: Indian Peafoul
Scientific Name: Pavo cristatus
Adopted in: 1963
मोर
मोर (शास्त्रीय नाव: पावो क्रिस्टेटस) हा एक पक्षी आहे. मोरांमध्ये नराला पिसारा असतो; मादीला, म्हणजेच लांडोरीला, पिसारा नसतो.
हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
मोराचा कंठ निळा असतो म्हणून त्याला नीलकंठ असे म्हणतात.रंगीबेरंगी पिसारा म्हणजे मोराचा जन्मजात अलंकार होय. शारदेचे वाहन म्हणजे सुंदर मोर होय. ढगांच्या दर्शनाने मोर आनंदित होतात आणि पिसारा फुलवून नाच करतात.
नाच रे मोरा…!!!
“नाचरे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच!’ लहानपणापासून कित्येक वेळा आपण हे गाणं ऐकलेलं असतं।
आकार : –
मोर (नर) मोठ्या पक्ष्यांमधे गणला जातो. साधारणतः नर मोराची लांबी (चोचीपासून शेपूट सुरू होईपर्यंत) १०० ते ११५ सें.मी. असते. पूर्ण वाढलेला पिसारा १९५ ते २२५ सें.मी. असू शकतो. मोराचे वजन ४ – ६ किलो असते. लांडोर (मादी) आकाराने लहान असतात. त्यांची लांबी साधारणतः ९५ सें.मी. आणि वजन २.७ – ४ किलो असते. लांडोरीला पिसारा नसतो.
खाद्य : –
मोर धान्य, झाडाची पाने, किडे, साप, सरडे खातो.
वास्तव्य : –
मोर पानझडी जंगलांत राहतात. ते रात्री आसर्यासाठी झाडांवर जातात.
महाराष्ट्रात मोरांचे स्थान : –
महाराष्ट्रात बऱ्याच गावांलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हे सरस्वती देवीचे वाहन आहे या श्रध्देपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व पाणी देत असतात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या ‘मोरांची चिंचोली’ नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात.

0
Answer link
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
वैज्ञानिक नाव: पावो क्रिस्टेटस (Pavo cristatus)
मोराची लांबी जवळपास 2.15 मीटर असते.
नर मोराच्या डोक्यावर सुंदर तुरे असतात.