इतिहास

नवनाथ यांचा जन्म कसा झाला?

2 उत्तरे
2 answers

नवनाथ यांचा जन्म कसा झाला?

6
नवनाथांच्या इतिहासाचा शोध घेणे सोपी नाही.दंत कथांच्या सहाय्याने त्यांच्या जन्माविषयीचे निरनिराळे अर्थ काढावे लागतातत्यातुन वैचारिक होत नाही समाधान होत नाही .असे विद्वानाना वाटतेपण नदीचे मुळ व ऋषीचे कुळ शोधु नये म्हणतात. त्याप्रमाणे नवनथांच्या जन्माविषयी गुढ आहे. णवनथांचे यौगीक कार्य इतके मोठे आहे प्रभावी आहे की त्यांच्या मुळ जन्म कथांचा ऐतीहासीकभाग कोठेच धृत होत नाही .व दंत कथातुन निघणारे निष्कर्ष ऐतिहासिक कसोटीला उतरत नाहीत तसेच तेथे तात्विक विचारांच्या मंथनाला वाव मिळत नाही. नवनाथांचा जन्म अयोनीसंभव आहे व तो यौगिक मुल्याचा आहे .

मच्छिंद्रनाथ:-
मच्छिंद्रनाथांचा जन्म माशापासुन झालेला आहे ब त्याना माशाच्या उदरात असतानाच शिवा कडुन ब्रम्हद्यान प्राप्त झाले. "तो क्षीर कल्लोळाआतु ,मकरोदरी गुप्त होता तयाचा हातु ,पैठे जाले तो मच्छिंद्रसप्तश्रुंगी,भग्नाथा चौरंगी भेटला की सर्वांगी संपुर्ण जाला" द्न्यानेश्वरी अठरव्या अध्यायातील बरील उल्लेखावरुन मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला याचा अध्यात्मिक बोध होतोमच्छिंद्रनाथांचे यौगिक जीवन जल त्राटकातुन सुरु झाले आहे. म्हणुन त्यांचा जन्म जलाशी दाखवला आहे.


गोरक्षनाथ :-
गोरक्षनाथांचा जन्म मच्छिंद्रनाथांच्या कृपा प्रसादाने झाल्याची कथा सर्वशृत आहे. ती कथा अशी की ." मच्छिंद्रनाथानी सुर्यबिज अभीमंतृन ते भस्म एका विप्र स्त्रीस दिले. त्या विप्र स्त्रीने ते भस्म उकीरड्यावर टाकले व त्यात जीवधारणा निर्माण झाली ह्याचा अर्थ गोरक्षनाथ हे सुर्य त्राटक करीत असतत्यामुळे नाथपंथात त्यांचे भौतिकसामर्थय व व्यक्तीमत्व सुर्यासारखे आहे. कबिर . गोरक्षाच्या भेटीचा संबंध ऐतिहासिकदृष्ट्या जसा उत्तर हिंदुस्तानात येतो तसाच दक्षिण हिंदुस्तानातही द्न्यानेश्वरांचे पणजोबा त्रंबकपंत यांचे भेटीत येतो. किंबहुना महाराष्ट्रात नाथपंथाच्या वास्तव्याची जाणिव त्रंबकपंताच्या व गोरक्षनाथांच्या भेटीनेच होते गोरखनाथांचा मठ अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण या डोंगराबर आहे. नासिक येथील त्रंबकेश्वरी गोरखनाथांची जशी गुंफा आहे तसाच आखाडा ही आहे. या आखाड्याची स्थापना विक्रम संवत्सर९२३ साली झाली अशी नोंद या आखाड्यातील ताम्ब्रपटावर पहाबयास मिळते. ह्या वरुन असे दिसुन येते की गोरक्षनाथांचे वास्तव्य ९ व्या शतकापासुन १३व्या शतकापर्य्नत होते.

जालिंदरनाथ:-
जालिंदरनाथ यांची जन्म कथाही पौराणिकच आहे. ऱाजा ब्रम्हदेव यानी यद्न्य केला असता अग्नी प्रसन्न होवुन त्यांनी राजाला पुत्ररत्नाचा प्रसाद दीला. जालींदर नाथांचा जन्म अग्नीतुन झाला त्याअर्थी जालिनदर नाथ हे अग्नी त्राटकातुन योगी अवस्थेत आले आहेत .....

कानिफनाथ:
सिद्धकानिफनाथाला अर्थात प्रबुध्दनारायणाला हत्तीच्या कानातुन जालिनदर नाथानी बाहेर काढलेह्याचा अर्थ एकांतात बसुन कानिफनाथ गणेशोपासना करीत असले पाहीजेत कानिफनाथ ही *अग्नीत्राटकातुन योगी अवस्थेत आले .

गहीनीनाथ :-
यांचा जन्म कर्दमपुतळ्यापासुन झालेला आहे. गोरक्ष संजीवनी मंत्र पाठ करीत असताना लहान मुलाना खेळण्यासाठी मातीचा पुतळा बनवुन देतो,पण संजीवणी घोकत असल्याने त्या पुतळ्याला संजीवणी प्राप्त होते. पुढे गोरक्षनाथ गहीनी नाथाना दिक्षा देवुन तपाला बसवतातम्हणजेच गहीनीनाथ तपपुर्व बिंदुत्राटक करत असावेत ......

रेवणनाथ:-
रेवणनाथ यांचा जन्म रेवातीरी नदीकाठी रेतीत झाला. म्हणजेच नदीकाठी बसुन ते जलत्राटक करत असावेत .....

चर्पटनाथ:-
चर्पटनाथ यांचा जन्म नदीकाठी दर्भात दाखविलेला आहे म्हणजेच चरपटीनाथही जलत्राटक करत असावेत. पण इतर सर्व जलत्राटका साठी दर्भासन वापरत पण रेवणनाथ हे रेतीआसन वापरीत .....

वटसिद्ध नागनाथ:-
वटसिद्ध नागनाथ याचा जन्म एका झाडाच्या ढोलीत नाग अंडजातुन होतो ह्याचा अर्थ नागनाथ हे ढोलीत बसुन बिंदु त्राटक ही साधना करत असावेतया साधनासाठी त्यानी सर्पाची कात हे आसन घेतलए होते ......

भर्तरीनाथ:-
भर्तरीनाथ यांचा जन्म कौशिकऋषी यांच्या आश्रमात झाला असावाते भिक्षेसाठी बाहेर निघाले असताना भिक्षापात्र अंगणात ठेवले होते. ते दार बंद करण्यास गेले असताना सुर्यतेज भिक्षापात्रात पडले ते पात्र कौशिक ऋषीनी मंदराचलीच्या गुहेपाशी नेवुन ठेवलेह्याचा अर्थ भर्तरी हे कौशिकऋषी यांच्या सान्निध्यात सुर्य त्राटक करीत असावेत. सुर्यसाधनेपासुन प्राप्तझालेले तेजपाहुन कौशिक ऋषीनी त्याना साधनेसाठी गुहेत नेवुन बसवले असले पाहीजे ..

उत्तर लिहिले · 11/7/2017
कर्म · 48240
0
नवनाथांच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी काही प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहेत:
  • मच्छिंद्रनाथ: मच्छिंद्रनाथांचा जन्म एका माशाच्या पोटातून झाला, असे मानले जाते.1
  • गोरखनाथ: गोरखनाथांचा जन्म गोठ्यात गायीच्या शेणातून झाला, अशी मान्यता आहे.2
  • गहिनीनाथ: गहिनीनाथांचा जन्म एका अज्ञात ठिकाणी तपश्चर्या करणाऱ्या एका स्त्रीच्या उदरी झाला.
  • निवृत्तिनाथ: निवृत्तिनाथांचा जन्म एका ब्राह्मण दांपत्याला विठ्ठलाच्या कृपेने झाला.
  • ज्ञानदेव: ज्ञानदेवांचा जन्म निवृत्तिनाथांप्रमाणेच विठ्ठलाच्या कृपेने झाला.
  • सोपानदेव: सोपानदेवांचा जन्म ज्ञानदेवांचे बंधू म्हणून झाला.
  • मुक्ताबाई: मुक्ताबाई या ज्ञानदेवांच्या भगिनी होत्या आणि त्यांचा जन्मही त्याच दांपत्याच्या घरी झाला.
  • चांगदेव: चांगदेवांनी आपल्या तपोबळाने चिरंजीवित्व प्राप्त केले होते, त्यामुळे त्यांच्या जन्माची कथा वेगळी आहे.
  • कानिफनाथ: कानिफनाथांचा जन्म एका नागकन्या आणि राजा यांच्या मिलनामुळे झाला.
या कथांवर आधारित विविध ग्रंथ आणि मान्यता आहेत.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 860

Related Questions

ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?
आधुनिक इतिहास म्हणजे काय?
इतिहासाचे प्रकार किती व कोणते?
इतिहास म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
क्रांतीचा शोध कोणी लावला?
जिवा महाले यांची वंशावळ?