resume कसा तयार करावा? मला उदाहरण द्या?
June 24, 2017 मराठी पिझ्झा टीम CV, Difference, Resume
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza
===
आपण कोणत्याही नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी खूप तयारी करतो. नवीन नोकरीला लागलेल्या लोकांकडून काही ना काही सल्ले घेतो की, मुलाखतीला कोणते कपडे घालावेत? मुलाखतीला गेल्यावर कसे वागावे? इत्यादी इत्यादी! तर या मुलाखतीला जाताना आपण आपल्या शैक्षणिक आणि कामकाजविषयक कारकीर्दीचा आढावा म्हणून १ ते २ पानाची माहिती बरोबर घेऊन जातो, ज्याला काही लोक सीव्ही म्हणतात तर काही रेझ्युमे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काय म्हणता असं कसं? चला तर जाणून घेऊया CV आणि Resume मधील फरक!
avservices.co.in
ब्रिटीश नागरिक नेहमी सीव्ही बरोबरच नोकरीसाठी अप्लाय करतात, तर अमेरिकेतील नागरिक रिज्यूमेने अप्लाय करतात.ऑस्ट्रेलिया मध्ये दोन्ही वापरले जातात.
=====
=====
सीव्ही :
सीवी (Curriculum Vitae याचा अर्थ जीवनात पुढे जाण्यासाठीचा लेखाजोखा) एक तपशीलवार कागद असतो ज्यामध्ये दोन किंवा तीन पानांमध्ये माहिती दिली जाते. यामध्ये आपल्या करियर मध्ये आतापर्यंत झालेली प्रत्येक गोष्ट जिला तुम्ही सांगण्या लायक समजता, यात सांगितली जाते. सीव्ही मध्ये शिक्षण आणि इतर वैशिष्ट्ये, तसेच तुम्हाला मिळालेले अवार्ड, हॉनर्स, प्राइजेस यांचा समावेश केला जातो.
curriculumvitae-resume-formats.com
सीव्ही तयार करताना क्रम लक्षात ठेवणे गरजेचे असते. ज्या क्रमाने तुमच्या कारकिर्दीत घटना घडल्या आहेत त्याच क्रमाने त्या मांडणे गरजेचे असते. सीव्ही प्रत्येकवेळी एकसारखाच असतो. तुम्ही कोणत्याही पोझिशनसाठी अप्लाय करा, यामध्ये काहीच बदल होणार नाही. जर तुम्ही काही बदल करू इच्छित असाल किंवा त्यात तुम्हाला विशेष काही सांगायचे असेल तर एका कवर लेटर मध्ये तुम्ही त्याबद्दल माहिती देऊ शकता.
रेझ्युमे :
रेझ्युमे (Resume) मध्ये आपली निवडक माहिती दिली जाते. रेझ्युमे एका पानापेक्षा जास्त मोठा नसावा. असे म्हणतात की, मुलाखतकार रेझ्युमे वाचण्यावर जास्त वेळ खर्च करत नाहीत. रेझ्युमे मध्ये कमी परंतु गरजेची असलेली माहिती भरली जाते. स्वत:ला खास ठरवण्यासाठी रेझ्युमे वापर केला जातो.
एकीकडे सीव्ही कोणत्याही पोझिशनसाठी वापरला जातो, तर दुसरीकडे रेझ्युमेमध्ये मात्र पोझिशननुसार बदल करावा लागतो. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्याच्याशी निगडीत माहिती त्यात भरणे गरजेचे आहे. रेझ्युमे मध्ये तुमच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या घटना क्रमाने मांडणे आवश्यक नसते. पण रेझ्युमेमध्ये तुमच्या करियर मधील प्रत्येक गोष्ट लिहिणे गरजेचे नाही.
template.net
रेझ्युमे आणि सीव्ही यामधील फरक
रेझ्युमे आणि सीव्ही यामध्ये लांबी, लेआउट आणि ऑब्जेक्टीव्ह यांचा फरक असतो. रिज्यूमे मध्ये तुमची क्षमता, अनुभव याचे कमी वर्णन होते, तर सीव्ही मध्ये ही माहिती विस्ताराने दिली जाते
Resume कसा तयार करावा?
Resume ( resume ) हा नोकरीसाठी अर्ज करताना महत्वाचा भाग असतो. तो तुमच्याबद्दलची माहिती देतो, जसे की तुमचे शिक्षण, अनुभव आणि कौशल्ये. Resume आकर्षक आणि वाचायला सोपा असावा.
Resume चे महत्वाचे भाग:
- संपर्क माहिती: यामध्ये तुमचे नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर लिहा.
- नोकरीचा प्रकार (work profession): तुम्हाला कोणत्या प्रकारची नोकरी हवी आहे ते स्पष्ट लिहा.
- शिक्षण: तुमची सर्वात नवीन पदवी आणि शिक्षण क्रमाने लिहा.
- नोकरीचा अनुभव: तुमच्या मागील नोकरीचा अनुभव क्रमवार सांगा. प्रत्येक नोकरीमधील तुमच्या जबाबदाऱ्या (responsibilities) स्पष्ट करा.
- कौशल्ये: तुमच्याकडे कोणती कौशल्ये आहेत, जसे की भाषा आणि इतर तांत्रिक कौशल्ये, ते सांगा.
- पुरस्कार आणि प्रमाणपत्रे (Awards and certifications): तुम्हाला मिळालेले पुरस्कार आणि तुमच्याकडील प्रमाणपत्रांची माहिती द्या.
- संदर्भ (reference): तुमच्या ओळखीच्या लोकांची माहिती द्या, जे तुमच्या कामाबद्दल सांगू शकतील.
Resume चे उदाहरण:
नाव: मोहन कृष्णा शेलार
पत्ता:Flat No. 101, गुलाब अपार्टमेंट, शिवाजी नगर, पुणे - 411005
ईमेल: mohan.shelar@email.com
मोबाईल नंबर: ९८XXXXXXXX
नोकरीचा प्रकार: डेटा विश्लेषक (Data Analyst)
शिक्षण:
- मास्टर ऑफ सायन्स (Master of Science) - सांख्यिकी (Statistics), पुणे विद्यापीठ - 2022
- बॅचलर ऑफ सायन्स (Bachelor of Science) - सांख्यिकी (Statistics), पुणे विद्यापीठ - 2020
नोकरीचा अनुभव:
डेटा विश्लेषक - टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (Tata Consultancy Services) - (2022-Present)
- डेटा विश्लेषण करणे आणि अहवाल तयार करणे.
- डेटाबेस व्यवस्थापित करणे.
कौशल्ये:
- भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी
- तांत्रिक कौशल्ये: Python, SQL, Excel
पुरस्कार आणि प्रमाणपत्रे:
- डेटा सायन्स (Data Science) मध्ये प्रमाणपत्र - Coursera
संदर्भ:
मिस्टर. सुरेश पाटील
व्यवस्थापक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस
ईमेल: suresh.patil@tcs.com
तुम्ही resume बनवण्यासाठी online tools वापरू शकता. उदा. Canva, Resume.com.
Canva Resume BuilderResume.com