अर्थ
शैक्षणिक कर्ज
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया काय आहे याची कृपया माहिती मिळू शकेल काय ?
मूळ प्रश्न: एज्युकेशन लोन (शैक्षणिक कर्ज) घ्यायचे आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे?
एजुकेशन लोन द्यायचे कि नाही हे बँक तुमचे मेरिट पाहून ठरवते. तुम्हाला ज्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे आहे त्यात काही परीक्षा द्याव्या लागत असतील तर त्याचे मार्क्स मुख्यत्त्वे बँक पाहून घेते.

जर बँकेला तुमचे प्रोफाइलमध्ये मेरिट दिसले तर बँक लोन देण्यासाठी तयार होते.
(वरची अट फक्त कागदोपत्री असते, तुमच्याकडे चांगला जामीनदार असेल तर वरची अट लगेच मान्य होते).
भारतात शिक्षणासाठी जास्तीत जास्त १० लाख तर परदेशात शिक्षणासाठी जास्तीत जास्त २० लाख लोन मिळू शकते.
४ लाखापर्यंत कुठलेही तारण ठेवावे लागत नाही. फक्त तुमचे वडील किंवा पालक याना जामीनदार(Co-Borrower) म्हणून राहावे लागते. म्हणजे तुम्ही जर लोन फेडू शकला नाही तर त्यांना ते पैसे बँकेला फेडावे लागतील.
४ लाखाच्या पुढे जर लोन पाहिजे असेल तर तुम्हाला पालकांच्या जामीनदारी बरोबरच तारण म्हणून काहीतरी बँकेकडे गहाण ठेवावे लागेल. यात फ्लॅट, NA प्लॉट, बंगला, फिक्सड डिपॉजिट, ई. गोष्टी येतात.

कागदपत्रे:
१. तुमचे ID प्रूफ
२. सर्व मार्कशीट व सर्टिफिकेट्स
३. ऍडमिशन झालेले कॉलेजचे कंफर्मेशन आणि कॉलेजचे फी स्ट्रक्चर
४. जे जामीन(Co-Borrower) राहणार आहेत त्यांची सॅलरी स्लिप आणि ३ वर्षांचे टॅक्स रिटर्न
५. जर कर्ज ४ लाखांपेक्षा जास्त असेल तर तर गहाण ठेवणाऱ्या जागेचे ओरिजिनल कागदपत्र बँकेकडे जाम करावे लागतात.
कर्जावर व्याज जवळपास १४ % असते. आणि तुम्ही ज्या दिवशी कर्जाची रक्कम घेणार त्या दिवशीपासून व्याज चालू होते. नोकरीला लागल्यानंतर बँकेला हफ्ते चालू होतात. मग तुम्ही एकदाच किंवा काही वर्षांपर्यंत हे कर्ज हफ्त्या हफ्त्याने फेडू शकता.
1 उत्तर
1
answers
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया काय आहे याची कृपया माहिती मिळू शकेल काय ?
4
Answer link
जवळच्या बँकेत जा जिथे तुमच्या आई-वडिलांचे बँकेत अकाउंट आहे. तिथे तुम्हाला शैक्षणिक कर्ज मिळेल. डिटेल्स तुम्हाला बँकेत मिळतील. जसे की आवश्यक कागदपत्रे, कर्जाची रक्कम, इत्यादी.
Related Questions
मला हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी बँकेतून एज्युकेशन लोन घ्यायचं आहे, तर त्याची प्रोसेस काय आहे?
1 उत्तर