2 उत्तरे
2 answers

UGC म्हणजे काय?

3
विद्यापीठ अनुदान आयोग (U.G.C.)ही भारतातील विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) शिक्षणक्षेत्रातील भूमिका महत्त्वाची मानली जाते. या आयोगाची स्थापना २८ डिसेंबर इ.स. १९५३ रोजी करण्यात आली.इ.स.१९४४ मध्ये सार्जंट समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थापनेची शिफारस केली होती. सुरुवातीस या समितीचे कार्यक्षेत्र बनारस, अलीगढ व दिल्ली विद्यापीठापुरते होते. इ.स.१९४८ मध्ये डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठ अनुदान आयोग स्थापनेची शिफारस केली. इ.स.१९५३ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्घाटन झाले. इ.स.१९५६ च्या कायद्यानुसार 'यूजीसी'ला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांच्या अखत्यारीत हा आयोग येतो. उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे कार्य हा आयोग करत असतो. शैक्षणिक क्षेत्रातील खालील गोष्टींमध्ये गुणवत्ता राखणे हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उद्दिष्ट आहे.
उत्तर लिहिले · 11/6/2017
कर्म · 2735
0

UGC म्हणजे काय?

UGC म्हणजे 'University Grants Commission' (विद्यापीठ अनुदान आयोग) होय.

हे भारत सरकारद्वारे स्थापित एक वैधानिक संस्था आहे.

UGC ची कार्ये:

  • विद्यापीठांना मान्यता देणे.
  • उच्च शिक्षणाचे समन्वय, निर्धारण आणि देखभाल करणे.
  • विद्यापीठांना निधी देणे.
  • शैक्षणिक मानके राखणे.

अधिक माहितीसाठी, आपण UGC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: UGC Official Website

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2700