मला लॅपटॉपमध्ये मराठी लिपीचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी काय करावे लागेल?
मला लॅपटॉपमध्ये मराठी लिपीचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी काय करावे लागेल?
कॉम्पुटर वर मराठी टाईप करण्यासाठी गुगल चे फ्री सॉफ्टवेअर आहे. ते इन्स्टॉल करून तुम्ही कॉम्पुटर/लॅपटॉप वर मराठी टाईप करू शकता.
विंडोज कॉम्पुटरवर मराठी टाईप करण्यासाठी स्टेप्स:
१. गुगल चे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लीक करा: Google Input Tools
२. लिंक ओपन झाल्यावर मराठी भाषा सिलेक्ट करा आणि डाउनलोड बटनावर क्लिक करा.
३. डाउनलोड झालेले सॉफ्टवेअर इंस्टाल करा, इन्स्टॉलेशन नंतर मराठी भाषेचा ऑप्शन तुमच्या कॉम्पुटर वर आलेला असेल.
४. Windows Key + Space Bar दाबून तुम्ही मराठी भाषा सिलेक्ट करा.
५. आणि मराठी टाईप करायला सुरवात करा. जसे कि "नमस्ते" लिहायचे असेल तर "Namaste" असे टाईप केल्यास ते आपोआप मराठीत "नमस्ते" असे कन्व्हर्ट होईल.
मोबाईल वर मराठी टाइपिंग:
अँड्रॉइड फोन वर मराठी टाइपिंग करण्यासाठी Google Indic Keyboad हे अधिकृत अँप गुगल ने डेव्हलप केलेले आहे.
१. या लिंक वर क्लीक करून ते अँप इन्स्टॉल करा: Google Indic Keyboard
२. इन्स्टॉल केलेले अँप ओपन करा
३. त्यात तुम्हाला हे अँप कीबोर्ड म्हणून सेट करायचा ऑप्शन येईल. तो ऑप्शन सेट करा
४. नंतर जेव्हा तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्ड वरती येईल तेव्हा कीबोर्ड मध्ये "ळ" किंवा दुसऱ्या देवनागरी अक्षराची टॅब दिसेल.
५. यातून मराठी भाषा सिलेक्ट करा
६. आता तुम्ही "Namaste" टाईप केले कि ते "नमस्ते" असे टाईप झालेले असेल.
-------------------------
गुगल मध्ये सर्च करा गुगल इनपुट आणि मग हवी ती language सिलेक्ट करून डाउनलोड करा
इन्स्टॉल करा
लॅपटॉपमध्ये मराठी लिपीचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
1. विंडोज (Windows) ऑपरेटिंग सिस्टमसाठी:
-
गुगल इनपुट टूल्स (Google Input Tools): हे सर्वात सोपे आणि लोकप्रिय साधन आहे.
-
गुगल इनपुट टूल्स डाउनलोड करा.
-
मराठी भाषेचा पर्याय निवडा आणि इन्स्टॉल करा.
-
इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तुम्ही टास्कबारमधील भाषा पर्यायांमधून मराठी निवडू शकता.
-
-
ऍमएस इंडिक इनपुट टूल्स (MS Indic Input Tools): हे मायक्रोसॉफ्टचे अधिकृत टूल आहे.
- ऍमएस इंडिक इनपुट टूल्स डाउनलोड करा.
-
मराठी भाषेचा पर्याय निवडा आणि इन्स्टॉल करा.
-
इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, तुम्ही टास्कबारमधील भाषा पर्यायांमधून मराठी निवडू शकता.
2. अँड्रॉइड (Android) साठी:
-
गुगल इंडिक कीबोर्ड (Google Indic Keyboard):
-
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन गुगल इंडिक कीबोर्ड शोधा आणि इन्स्टॉल करा.
-
ॲप उघडा आणि मराठी भाषेचा पर्याय निवडा.
-
सेटिंग्जमध्ये कीबोर्ड पर्याय म्हणून गुगल इंडिक कीबोर्ड निवडा.
-
3. आयओएस (iOS) साठी:
-
ॲपलचे डिफॉल्ट कीबोर्ड (Apple's Default Keyboard):
-
सेटिंग्जमध्ये जा > सामान्य > कीबोर्ड > कीबोर्ड्स > नवीन कीबोर्ड ॲड करा...
-
मराठी भाषेचा कीबोर्ड निवडा.
-
टीप:
-
तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता. गुगल इनपुट टूल्स आणि गुगल इंडिक कीबोर्ड हे वापरण्यास सोपे आहेत.
-
इन्स्टॉलेशन दरम्यान काही समस्या आल्यास, तुम्ही ऑनलाइन ट्युटोरिअल्स (tutorials) आणि मार्गदर्शिका (guides) पाहू शकता.