संस्कृती देव जात व कुळे कुलदैवत

गवळी समाजातील कुळ दैवत कोणते?

2 उत्तरे
2 answers

गवळी समाजातील कुळ दैवत कोणते?

3
गवळी समाजाचे मुख्य दैवत कृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतां मध्ये काळभैरव-भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा) आहेत. गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठयाबाया, जागेवाला, म्हसोबा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यात गवळी बांधव नाचतात.

गवळी समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणुन त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकर्‍याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनी च्या भेटीला जायची रित आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपती च्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपुजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व ईतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यातील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी येतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुध्दा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे.

संदर्भ
उत्तर लिहिले · 13/5/2017
कर्म · 283280
0
गवळी समाजातील कुळ दैवत विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. खाली काही प्रमुख कुळदैवतांची माहिती दिली आहे:
  • खंडोबा: गवळी समाजातील काही लोकांचे खंडोबा हे कुळदैवत आहे. येथे पहा
  • ज्योतिबा: काही गवळी समाज बांधवांमध्ये ज्योतिबा देवाची देखील कुळदैवत म्हणून पूजा केली जाते.येथे पहा
  • काळभैरव: गवळी समाजात काळभैरवाची उपासना कुळदैवत म्हणून प्रचलित आहे.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1220

Related Questions

आडनाव गुरगुडे आहे, देवाक काय असेल?
आम्ही कोकणातले, आमची जात कुणबी, मग आमचे कुलदैवत कोणतं असेल?
मी योगेश रघूवीर होळंब (8879944048) राहणार पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथील असून मला आमच्या कुळाची कुलस्वामिनी माहित नाही. मी भंडारी आहे आणि कोकणस्थ आहे. जर कोणी मला "होळंब" या आडनावाची कुलस्वामिनी आणि तिचे मंदिर सांगू शकेल का?
कृपया मला वैश्यवाणी तवटे घराण्याचे कुलदैवत कोण ते नाव कळवा,?