ग्राहक मंच
तक्रार
तक्रार नोंदणी
उपभोक्ता संरक्षण
जागो ग्राहक जागो वर कोणत्या प्रकारच्या तक्रारी दाखल करू शकतो?
3 उत्तरे
3
answers
जागो ग्राहक जागो वर कोणत्या प्रकारच्या तक्रारी दाखल करू शकतो?
4
Answer link
☙कोणत्या तक्रारी करता येतात?
सदोष किंवा असुरक्षित वस्तू (उदाहरणार्थ ः चॉकलेटमध्ये पोरकिडे, शीतपेयांत गुटख्याचे पाकीट, सदोष बियाणे नीट उगवले नाही, कपडे धुण्याच्या एक किलो पावडरमध्ये त्यापेक्षा कमी वजनाची पावडर, दुचाकीचे कमी मायलेज, गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागून जीवित-वित्त हानी होणे.)सेवेतील उणिवा (उदाहरणार्थ ः ड्रायक्लीनर्स, वरातीतील बॅंड, बॅंक, विमा, कुरिअर, पोस्ट, टेलिफोन, वाहतूक अशा सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांच्या कामकाजातील उणिवा, डॉक्टरांच्या निष्काळजी उपचारांमुळे रुग्ण कायमचा अपंग झाला, कोचिंग क्लासमध्ये नियमित वर्ग घेतले गेले नाहीत, विजेच्या दाबातील चढ-उतारांमुळे उपकरणांचे नुकसान झाले, रेल्वे प्रवासात आरक्षित डब्यात सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने सामान चोरीला गेले.)वस्तूवरील छापील किमतीपेक्षा अधिक किंमत आकारली, बिल्डरने कराराच्या मुदतीत सदनिकेची किंमत वाढवून कराराचा भंग केला, व्यायाम, आहार-नियंत्रण वगैरे न करता वजन घटविण्याची दिशाभूल करणारी जाहिरात, परदेशी विद्यापीठाची पदवी दिल्यानंतरअथवा आपला अभ्यासक्रम केल्यानंतर नोकरीची हमी देऊन फसवणूक.
☙तक्रार कशी करावी ?
स्वतःच्या शब्दांत, मुद्देसूद व आवश्यक तपशिलासह साध्या कागदावर लेखी तक्रार करता येते. (तक्रार-अर्जाचा विशिष्ट मसुदा नाही; पण मंच किंवा आयोग यांच्या कार्यालयांत अर्जाचा नमुना उपलब्ध असतो.)अर्जासोबत काही शुल्क द्यावे लागते.तक्रारदाराने वकील नेमणे आवश्यक नाही; मात्र वकिलांना मज्जावही नाही.सोबत पुरेसा पुरावा जोडावा लागतो. (उदाहरणार्थ ः खरेदीची पावती, हमीपत्र, सेवेबाबतचे करार-पत्र, तक्रारीसंदर्भातील पत्रव्यवहार, जाहिरातीचे कात्रण, आवश्यक तेथे तज्ज्ञांचे मत इत्यादींच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात.)नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च यांची मागणी केलेली असल्यास, पुरेसा पुरावा नसल्यास न्यायालये भरपाई नाकारतात किंवा नाममात्र भरपाई देतात. यासाठी खरेदीशी संबंधित कागदपत्रे फाईलमध्येनीट ठेवावीत.
☙तक्रारनिवारण कसे होते?
तक्रारीची प्रत व नोटीस मंचाकडून विरुद्ध पक्षाला पाठविली जाते.विशिष्ट मुदतीत त्यांनी उत्तर न दिल्यास एकतर्फी निकाल दिला जातो; मात्र उत्तर देऊन त्यांनी तक्रार नाकारल्यास त्या वादावर सुनावणी होते.उपलब्ध पुरावे आणि दोन्ही पक्षांनी केलेले युक्तिवाद यांच्या आधारे निर्णय दिला जातो.कोणत्याही पक्षाच्या विनंतीवरून फक्तएकदाच सुनावणी पुढे ढकलता येते. त्याच्या कारणांची नोंद मंचाला करावी लागते.विरुद्ध पक्षाला नोटीस दिल्यापासून नव्वद दिवसांत प्रकरण निकालात काढणे अपेक्षित आहे. सदोष वस्तूची प्रयोगशाळेत तपासणी करावी लागल्यास ही मुदत दीडशे दिवस आहे.या प्रत्येक टप्प्यासाठी कायद्याने मुदत घालून दिलेली असते.

2
Answer link
https://youtu.be/hzJodas9TgI
विक्री व सेवा ज्या ग्राहक म्हणून आपण घेतो देतो
लिंक ओपन करा अधिक माहिती मिळेल

0
Answer link
जागो ग्राहक जागो (Jago Grahak Jago) या ग्राहक जागृती पोर्टलवर तुम्ही विविध प्रकारच्या तक्रारी दाखल करू शकता. खाली काही सामान्य तक्रारींचे प्रकार दिले आहेत:
-
वस्तू आणि सेवांमधील दोष:
- खराब गुणवत्ता (Poor quality)
- ভেজাল (Adulteration)
- वजनामध्ये गडबड (Weight discrepancies)
- हमी (Warranty) असूनही सेवा न देणे.
-
खोट्या जाहिराती:
- दिशाभूल करणाऱ्या जाहिराती (Misleading advertisements)
- खोट्या दाव्या करणाऱ्या जाहिराती (False claims)
-
जास्त किंमत आकारणे:
- ठरलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेणे (Overcharging)
- किंमत दर्शनी भागात न लावणे.
-
सुरक्षिततेचे उल्लंघन:
- असुरक्षित उत्पादने (Unsafe products)
- उत्पादनांमध्ये त्रुटी (Defective products) ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
-
सेवांमध्ये कमतरता:
- बँक, विमा, दूरसंचार (Telecom) आणि इतर सेवांमध्ये निष्काळजीपणा.
- खराब सेवा देणे.
-
ऑनलाइन फसवणूक:
- ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणूक (Online shopping fraud)
- चुकीचे उत्पादन पाठवणे.
टीप: तक्रार दाखल करण्यापूर्वी तुमच्याकडे खरेदीची पावती (bill) आणि आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: ग्राहक मंत्रालय (consumeraffairs.nic.in)