उपभोक्ता संरक्षण
0
Answer link
अशी ही भेसळाभेसळी . http://bit.ly/33pUkGz
____________________________
💢 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 💢
____________________________
अन्नभेसळीचे दुष्परिणाम अनेक आहेत व रोज भेसळीचे अन्न पोटात जाऊन काही काळानंतर परिणाम दिसायला लागतात. काही वेळा मात्र ताबडतोब दुष्परिणाम दिसतात व मृत्यूही येऊ शकतो. अन्नभेसळीमुळे ब-याच लोकांना अपंगत्व आलेले आहे. तरीही भेसळ अखंडपणे चालूच आहे.
╔══╗
║██║ _* ⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
भेसळाभेसळीची आपण काही उदाहरणे पाहु,बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते."सायट्रिक आसिड"ची . ब्लोटिंग पेपर + सायट्रिक आसिड = फक्कड लस्सी.हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.आता काही नावाजलेले दुध संघ ताक विकतात,हे ताक व घरगुती ताक फरक का असेल हे समजले असेलच.हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "पाणी-पुरी"मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून नसायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्यजी थोडा पानीआौर दो .....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्शा खूप स्वस्त आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,ऊसाचा रस ऊन्ह्ळ्यात चऊसाचा.पण काही "कलाकार" ह्यामध्ये"सॅकरिन " वापरतात्..... थोढ्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा.पण ह्यचा वापर एवढा सर्रास नाही.टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून " बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो."वडापावाच्या" लसूण चट्णीत "लाकडाचा नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना?मिरीमधे पपईचं बी, मसाल्यात घोड्याची लीद.मँगो आइसक्रीम हे बर्याचदा पपईचे असते. आणि आंबा फ्लेवरपुरता असतो. आता याला भेसळ म्हणावे का हे कळत नाही.हल्लीच कळलेली बातमी म्हणजे स्किम मिल्क पावडर,मैदा आणि वनस्पती (डालडा) एकत्र भाजून बनवलेला 'खवा'.आपण कंपनिचा म्हणुन खातो.हे तर काहीच नाही,प्राण्यांचे मृतदेह एकत्र जमवून त्यावर प्रक्रिया करून त्यातील चरबी काढून त्याची विक्री करणारे महाभाग आहेत. मग मिठाया व अन्य स्वस्त तळलेला माल बनवायला हेच चरबी म्हणून वापरले जाते.हे वाचून शहारे आले. तेव्हा रस्त्यावरील तळलेल्या गोष्टी खाताना जपून. कदाचित फरसाण व अन्य तळीव पदार्थात काही प्रमाणात हा पदार्थ वापरला जात असेलही. स्वस्त असल्यामुळे कुणाही उत्पादकाला ह्याचा मोह होणे शक्य आहे. 

&&& अन्न भेसळ काही उदाहरणे
√दुधात पाणी मिसळणे किंवा त्यातील चरबी काढून घेणे.
√शुध्द तुपात किंवा लोण्यात वनस्पती तूप मिसळणे.
√लोण्यात पाणी जास्त प्रमाणात ठेवणे (वजन वाढण्यासाठी)
√हळद पावडरीत एक विषारी पिवळा रंग मिसळणे.
√मिरची पावडरीत (लाल तिखट) लाकडाचा भुसा, विटांची पावडर किंवा इतर पावडर मिसळणे.
√हिंग खडयाबरोबर (किंवा खडयाच्या ऐवजी) इतर खडे विकले जातात.
√रव्यामध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा मिसळला जातो.
√धान्यामध्ये खडे, किडके धान्य यांचे प्रमाण जास्त असेल तर ती भेसळ समजा.
√मोहरीमध्ये धोत-याचे बी मिसळले जाते व ते विषारी असते. (धोत-याचा दाणा एका बाजूला त्रिकोणी असतो व मोहरीपेक्षा साधारणपणे लहान असतो.)
√चहाच्या पावडरीमध्ये लाकडाचा भुसा वा एकदा वापरलेली चहापूड मिसळतात.
√डाळींना कृत्रिम रंग देऊन आकर्षक केले जाते. हे रंग अपायकारक असतात.
√खाद्यपदार्थात धुण्याचा सोडा घातला जातो. त्यामुळे आतडयांना इजा होते.
√खाद्यतेलात विषारी तेले मिसळल्यामुळे अपंगत्व येण्याची शक्यता असते.
अशी बरीच यादी वाढवता येईल.
भेसळीसंबंधी काही नेहमीची उदाहरणे आपण पाहिली. भेसळीची शंका आल्यास त्या भागातल्या अन्ननिरीक्षकाशी संपर्क साधावा किंवा राज्य सरकारच्या आरोग्य प्रयोगशाळांशी संपर्क साधावा. या प्रयोगशाळा औरंगाबाद, नागपूर, पुणे, सोलापूर,कोल्हापूर, नांदेड, अमरावती, नाशिक, कोकण भवन, जळगाव व सांगली येथे आहेत. शिवाय स्थानिक प्राथमिक आरोग्यकेंद्रे किंवा जिल्हा परिषदांचे आरोग्य अधिकारी यांच्या मार्फतही संपर्क साधता येईल.
अन्न आणि औषधातील भेसळीबाबत काही तक्रार असल्यास 1800222364 आणि 1800222365 या २४ तास सुरु असणाऱ्या टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
9890875498
__________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🥇_*
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
. _*ጦඹիiᎢi*_
0
Answer link
तुमच्या प्रश्नावरून मला असे वाटते की, दुकानदाराने लोकांना तारीख व्यवस्थित दिसू नये म्हणूनlabel बदलण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात काही गोष्टी संभवतात:
- खराब झालेले पेंट: पेंटच्या डब्यावर दिलेली एक्सपायरी डेट (expiry date) निघून गेली असेल, तर तो पेंट खराब होऊ शकतो. जुना पेंट वापरल्यास रंग व्यवस्थित लागणार नाही, रंगात गुठळ्या येऊ शकतात किंवा तो लवकर निघू शकतो.
- फसवणूक: दुकानदाराने जाणीवपूर्वक लोकांना जुना माल नवीन म्हणून खपवण्याचा प्रयत्न करत आहे. हे फसवणूक करण्याच्या उद्देशाने केले जात आहे.
- आरोग्यास धोका: काही पेंट्समध्ये हानिकारक रसायने (harmful chemicals) असतात आणि ते जास्त दिवस जुने झाल्यावर त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात.
तुम्ही या संदर्भात खालील गोष्टी करू शकता:
- दुकानदाराशी बोला: तुम्ही दुकानदाराला याबद्दल जाब विचारू शकता आणि त्याने असे का केले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
- ग्राहक संरक्षण विभागात तक्रार करा: तुम्हाला खात्री असेल की तुमची फसवणूक झाली आहे, तर तुम्ही ग्राहक संरक्षण विभागात (Consumer Protection Department) तक्रार करू शकता.
- पेंट कंपनीला माहिती द्या: तुम्ही पेंट बनवणार्या कंपनीला या घटनेची माहिती देऊ शकता.
ग्राहक म्हणून तुम्हाला योग्य माहिती मिळवण्याचा आणि फसवणुकीपासून वाचण्याचा अधिकार आहे.
0
Answer link
मला माफ करा, पण या विषयावर माझ्याकडे सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मी तुम्हाला अचूक माहिती देऊ शकत नाही.
4
Answer link
☙कोणत्या तक्रारी करता येतात?
सदोष किंवा असुरक्षित वस्तू (उदाहरणार्थ ः चॉकलेटमध्ये पोरकिडे, शीतपेयांत गुटख्याचे पाकीट, सदोष बियाणे नीट उगवले नाही, कपडे धुण्याच्या एक किलो पावडरमध्ये त्यापेक्षा कमी वजनाची पावडर, दुचाकीचे कमी मायलेज, गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागून जीवित-वित्त हानी होणे.)सेवेतील उणिवा (उदाहरणार्थ ः ड्रायक्लीनर्स, वरातीतील बॅंड, बॅंक, विमा, कुरिअर, पोस्ट, टेलिफोन, वाहतूक अशा सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांच्या कामकाजातील उणिवा, डॉक्टरांच्या निष्काळजी उपचारांमुळे रुग्ण कायमचा अपंग झाला, कोचिंग क्लासमध्ये नियमित वर्ग घेतले गेले नाहीत, विजेच्या दाबातील चढ-उतारांमुळे उपकरणांचे नुकसान झाले, रेल्वे प्रवासात आरक्षित डब्यात सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने सामान चोरीला गेले.)वस्तूवरील छापील किमतीपेक्षा अधिक किंमत आकारली, बिल्डरने कराराच्या मुदतीत सदनिकेची किंमत वाढवून कराराचा भंग केला, व्यायाम, आहार-नियंत्रण वगैरे न करता वजन घटविण्याची दिशाभूल करणारी जाहिरात, परदेशी विद्यापीठाची पदवी दिल्यानंतरअथवा आपला अभ्यासक्रम केल्यानंतर नोकरीची हमी देऊन फसवणूक.
☙तक्रार कशी करावी ?
स्वतःच्या शब्दांत, मुद्देसूद व आवश्यक तपशिलासह साध्या कागदावर लेखी तक्रार करता येते. (तक्रार-अर्जाचा विशिष्ट मसुदा नाही; पण मंच किंवा आयोग यांच्या कार्यालयांत अर्जाचा नमुना उपलब्ध असतो.)अर्जासोबत काही शुल्क द्यावे लागते.तक्रारदाराने वकील नेमणे आवश्यक नाही; मात्र वकिलांना मज्जावही नाही.सोबत पुरेसा पुरावा जोडावा लागतो. (उदाहरणार्थ ः खरेदीची पावती, हमीपत्र, सेवेबाबतचे करार-पत्र, तक्रारीसंदर्भातील पत्रव्यवहार, जाहिरातीचे कात्रण, आवश्यक तेथे तज्ज्ञांचे मत इत्यादींच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात.)नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च यांची मागणी केलेली असल्यास, पुरेसा पुरावा नसल्यास न्यायालये भरपाई नाकारतात किंवा नाममात्र भरपाई देतात. यासाठी खरेदीशी संबंधित कागदपत्रे फाईलमध्येनीट ठेवावीत.
☙तक्रारनिवारण कसे होते?
तक्रारीची प्रत व नोटीस मंचाकडून विरुद्ध पक्षाला पाठविली जाते.विशिष्ट मुदतीत त्यांनी उत्तर न दिल्यास एकतर्फी निकाल दिला जातो; मात्र उत्तर देऊन त्यांनी तक्रार नाकारल्यास त्या वादावर सुनावणी होते.उपलब्ध पुरावे आणि दोन्ही पक्षांनी केलेले युक्तिवाद यांच्या आधारे निर्णय दिला जातो.कोणत्याही पक्षाच्या विनंतीवरून फक्तएकदाच सुनावणी पुढे ढकलता येते. त्याच्या कारणांची नोंद मंचाला करावी लागते.विरुद्ध पक्षाला नोटीस दिल्यापासून नव्वद दिवसांत प्रकरण निकालात काढणे अपेक्षित आहे. सदोष वस्तूची प्रयोगशाळेत तपासणी करावी लागल्यास ही मुदत दीडशे दिवस आहे.या प्रत्येक टप्प्यासाठी कायद्याने मुदत घालून दिलेली असते.