3 उत्तरे
3
answers
बारावी नंतर MPSC ची परीक्षा देता येते का?
10
Answer link
वयाची 19 वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असत.
अधिक महितीसाठी:
लोकसेवा आयोगाची तयारी कशी करावी?
अधिक महितीसाठी:
लोकसेवा आयोगाची तयारी कशी करावी?
2
Answer link
बारावीनंतर मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर MPSC ची परीक्षा देऊ शकतो. अधिक माहितीसाठी www.mpsc.gov.in या वेबसाईटवर शोध घ्यावा.
0
Answer link
नाही, बारावी नंतर MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) ची परीक्षा देता येत नाही. MPSC च्या परीक्षांसाठी काही पात्रता निकष (Eligibility criteria) असतात, त्यापैकी एक महत्वाची अट म्हणजे उमेदवार पदवीधर (Graduate) असावा लागतो. याचा अर्थ तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
त्यामुळे, जर तुम्हाला MPSC ची परीक्षा द्यायची असेल, तर तुम्हाला प्रथम तुमची पदवी पूर्ण करावी लागेल. पदवी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही MPSC च्या परीक्षांसाठी अर्ज करू शकता आणि परीक्षा देऊ शकता.