2 उत्तरे
2
answers
वाईन शॉपचा परवाना कसा काढावा?
39
Answer link
वाईन शॉपसाठी परवाना मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या एक्साईज डिपार्टमेंटकडे अर्ज करणे आवश्यक असते. हेच डिपार्टमेंट अर्ज पडताळणी करून वाईन शॉप चे परवाने देते.
१. १० रुपये किमतीचा कोर्टचा स्टॅम्प घ्या
२. तुमच्या जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या राज्य सरकारच्या एक्साईज ऑफिसमध्ये जा. जर एक्साईज ऑफिस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नसेल तर कलेक्टर ऑफिसकडे चौकशी करून पर्यायी ऑफिसची माहिती मिळवा.
३. ऑफिसमधून परवान्यासाठी अँप्लिकेशन फॉर्म घ्या - हा फॉर्म मोफत मिळतो.
४. फॉर्म मधील सर्व माहिती भरा- नाव, जन्मतारीख, व्यवसाय आणि पत्ता
५. वरील माहितीचे प्रूफ म्हणून आवश्यक कागदपत्रे सोबत राहूद्या, जसे कि आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स
६. वर खरेदी केलेला स्टॅम्प अप्लिकेशन फॉर्म वर चिकटवा
७. अप्लिकेशन फॉर्म, फोटो आणि ऍड्रेस प्रूफ साठीच्या कागदपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रति ऑफिसमध्ये सबमिट करा.
अप्लिकेशन पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला परवाना मिळून जाईल.

वरील प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता, पण ऑनलाईन सिस्टम आणि एक्साईज डिपार्टमेंटची वेबसाईट वापरण्यासाठी जास्त डिटेल्स कुठेही दिलेले नाही. http://exciseservices.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अकॉउंट उघडून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
वरील माहिती खूप सरळ वाटते, आणि असे अप्लिकेशन करून परवाने मिळाले तर गल्लीगल्लीत सर्वांकडे वाईन शॉप परवाने दिसतील.
सर्वांकडे परवाने होऊ नये यासाठी एक अलिखित प्रथा सिस्टिम मध्ये पडली आहे. या प्रथेला आपण लाच म्हणून ओळखतो :). म्हणूनच भरमसाठ लाच देऊन लायसन्स मिळवणारे उदाहरणे आपल्याला दिसतात. परिणामी नुसता अर्ज करून परवाना मिळणे जवळपास अशक्यप्राय आहे.
0
Answer link
वाईन शॉपचा परवाना काढण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करणे आवश्यक आहे:
1. आवश्यक कागदपत्रे जमा करा:
- अर्जदाराचा फोटो
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ.)
- पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, वीज बिल, इ.)
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र
- मालमत्तेचे कागदपत्रे (खरेदी खत किंवा भाडे करार)
- नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC)
2. अर्ज सादर करा:
* राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करा किंवा कार्यालयातून अर्ज प्राप्त करा. राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन
3. शुल्क भरा:
* परवान्याच्या प्रकारानुसार शुल्क भरा.
4. तपासणी आणि पडताळणी:
* तुमच्या अर्जाची आणि जागेची तपासणी केली जाईल.
5. परवाना मिळवा:
* तपासणीत सर्व काही ठीक आढळल्यास, तुम्हाला वाईन शॉपचा परवाना मिळेल.
अधिक माहितीसाठी:
तुम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकता.
टीप: नियमांनुसार, वाईन शॉप शाळा, धार्मिक स्थळे आणि रुग्णालयांजवळ नसावे.
कायदेशीर सल्ला: परवाना काढण्यापूर्वी अधिकृत वकिलाचा सल्ला घ्या.