7 उत्तरे
7 answers

मराठी मध्ये कसे टायपिंग करायचे?

258
मोबाईल वर मराठी टाइपिंग:
अँड्रॉइड फोन वर मराठी टाइपिंग करण्यासाठी Google Indic Keyboad हे अधिकृत अँप गुगल ने डेव्हलप केलेले आहे.
१. या लिंक वर क्लीक करून ते अँप इन्स्टॉल करा: Google Indic Keyboard
२. इन्स्टॉल केलेले अँप ओपन करा
३. त्यात तुम्हाला हे अँप कीबोर्ड म्हणून सेट करायचा ऑप्शन येईल. तो ऑप्शन सेट करा
४. नंतर जेव्हा तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्ड वरती येईल तेव्हा कीबोर्ड मध्ये "ळ" किंवा दुसऱ्या देवनागरी अक्षराची टॅब दिसेल.

५. यातून मराठी भाषा सिलेक्ट करा.
६. आता तुम्ही "Namaste" टाईप केले कि ते "नमस्ते" असे टाईप झालेले असेल.

संगणकावर मराठी टायपिंग:
संगणकावर मराठी टाइप करण्यासाठी, आपल्याला Chrome ब्राउझर वापरण्याची आवश्यकता असेल. क्रोम ब्राउझरमध्ये Google Input Tools नावाचा एक्सटेंशन आहे. हे स्थापित करून आपण मराठी टाइप करू शकता.
संगणकावर हिंदीमध्ये टाइप करण्यासाठीचे चरणः
1. Google इनपुट साधने डाउनलोड करण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा: Google Input Tools
2. दुवा उघडल्यानंतर, Chrome एक्सटेंशन डाउनलोड करा वर क्लिक करा.
3. जे पृष्ठ उघडेल, त्यात Add to Chrome हा पर्याय निवडा.इन्स्टॉल पूर्ण झाल्यावर सर्व प्रमुख भारतीय भाषा तुम्हाला दिसतील.
4. Google Chrome एक्सटेंशन पर्यायावर जा आणि मराठी  भाषा निवडा.
5. आणि  मराठीमध्ये टाइपिंग सुरू करा. आपण "नमस्ते" टाइप करू इच्छित असल्यास, Namaste लिहा, नंतर हे आपोआप "नमस्ते" मध्ये रूपांतरित होईल.
उत्तर लिहिले · 1/12/2016
कर्म · 283280
4
       मोबाईल वर मराठी टायपिंग करण्यासाठी आता Google play store मध्ये जाऊन G-bord नावाचे apps download करून घ्यावे. हे apps तुमच्या screen वर दिसणार नाही. ते आपोआप internal memory मध्ये save होईल.
       त्यानंतर setting मध्ये जाऊन input language setting करावी तीथे G-bord चा option दिसून येईल तो select करावा language option मध्ये जाऊन English (us), Marathi, व Mar-Eng हे तीन option निवडून ओके करावे.
      मोबाईल एकदा रिस्टार्ट करून मराठी, इंग्रजी, व फोनेटीक मराठी ( उदा. Marathi टाईप केले की मराठी असे दिसेल) या सुलभ सेवेचा लाभ घ्यावा.
     धन्यवाद.
      
उत्तर लिहिले · 12/6/2019
कर्म · 12245
0

मराठीमध्ये टायपिंग करण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

1. Google Input Tools:

  • हे एक विनामूल्य साधन आहे. (Google Input Tools)
  • हे वापरण्यास सोपे आहे.
  • तुम्ही फक्त इंग्रजीमध्ये टाईप करा आणि ते आपोआप मराठीमध्ये रूपांतरित होईल.

2. Online Marathi Typing Tools:

  • इंटरनेटवर अनेक ऑनलाइन मराठी टाइपिंग टूल्स उपलब्ध आहेत.
  • तुम्ही वेबसाइटवर जाऊन थेट मराठीमध्ये टाइप करू शकता.
  • उदाहरणार्थ: Lipikaar, Marathi Typing.

3. Mobile Keyboard:

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये मराठी कीबोर्ड डाउनलोड करा. Google Indic Keyboard हे एक चांगले ॲप आहे. (Google Indic Keyboard)
  • ॲप स्टोअरवर अनेक विनामूल्य मराठी कीबोर्ड उपलब्ध आहेत.

4. Windows मध्ये मराठीkeyboard enable करा:

  • Settings मध्ये जा आणि Time & Language > Language मध्ये जा.
  • Preferred languages च्या खाली Add a language वर क्लिक करा.
  • मराठी शोधा आणि सिलेक्ट करा.
  • Language pack install करा.
  • आता तुम्ही taskbar मधील language icon वर क्लिक करून मराठी निवडू शकता.

हे काही सोपे मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मराठीमध्ये टायपिंग करू शकता.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1900

Related Questions

मराठी लेखन करण्यासाठी कोणते कळफलक योग्य आणि आदर्श आहे?
मराठी कीबोर्ड अंक?
ISM वर ग्य कसे टाइप करतात??
लॅपटॉपवर मराठीमध्ये सहज टाईप करता येईल असे काय आहे?
कॉम्प्युटरमध्ये टाइप करताना मध्येच जर आपल्याला मराठी टाइप करायचे असेल तर कसे करावे?
मला मराठी व इंग्रजी टायपिंग करायचे आहे, तर याबद्दल काही माहिती देऊ शकाल का?
गुगल इंडिक कीबोर्ड सेटिंग कशी करतात?