3 उत्तरे
3
answers
क्ष किरण व त्यांचे महत्त्व काय आहे?
4
Answer link
क्ष किरण म्हणजेच X-Ray हे आपल्या व्यावहारिक जीवनात फार उपयोगी असतात. पहिले किरण म्हणजे काय हे समजून घेऊ. जनरली किरण म्हणजे प्रकाशाचा एक झोत असतो. सूर्यापासून येणारे प्रकाशाचे किरण हे आपल्याला डोळ्यांनी दिसतात. परंतु असे अनेक दुसऱ्या प्रकारचे किरण असतात जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. जसे कि मोबाईल चे नेटवर्क कॅरी करणारे किरण(rays/waves). सॅटेलाईट सोबत कम्युनिकेशन करणारे रेडिओ सिग्नल. हे सगळे डोळ्यांना न दिसणारे किरण आहेत. क्ष किरण सुद्धा अशाच प्रकारचे डोळ्यांना न दिसणारे किरण आहेत, म्हणूनच जेव्हा हॉस्पिटल मध्ये X-Ray काढला जातो तेव्हा आपल्याला कुठलाही लाईट पडलेला दिसत नाही.
क्ष किरण इतके प्रसिद्ध असण्यामागचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा इमेजिंग च्या क्षेत्रात होणारा उपयोग. क्ष किरणांमध्ये कुठल्याही पदार्थाला भेदण्याची क्षमता हि नॉर्मल लाईट च्या किरणांपेक्षा जास्त असते. याचा उपयोग करून जे फोटो काढले जातात ते फोटो काही ठराविक थराआड लपलेली माहिती कॅप्चर करतात. जसे कि आपण जर छातीचा X-Ray काढला तर आपले मांसाआड असलेल्या बरगड्या आपल्याला दिसतात. मेडिकल क्षेत्रात जवळपास सगळ्याच इमेज टेस्ट मध्ये क्ष-किरण वापरले जातात.
क्ष-किरण हे मेडिकल व्यतिरिक्त बाकीच्या क्षेत्रात देखील वापरले जातात. विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशन मध्ये बॅग चेक करण्यासाठी जे स्कॅनिंग मशीन वापरले जाते ते देखील क्ष-किरणांचा वापर करते.
क्ष किरण टेक्निकली कसे काम करतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता:
जर उत्तर आवडले तर खाली फेसबुक चा आयकॉन वापरून तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेयर करा आणि नॉलेज स्प्रेड करण्यास मदत करा.
4
Answer link
ही एक प्रकारची विद्युतचुंबकीय विकीरणे असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटरपर्यंत असते व वारंवारिता ३० पेंटाहर्ट्झ ते ३० एक्झाहर्ट्झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी ही गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनील किरणांपेक्षा जास्त असते.
क्ष-किरण प्रतिमा घेण्याची पद्धती
क्ष-किरण प्रतिमा
वैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते.
क्ष-किरण प्रतिमा घेण्याची पद्धती
क्ष-किरण प्रतिमा
वैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते.
0
Answer link
क्ष-किरण (X-rays) : क्ष-किरण म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणांचा एक प्रकार आहे. त्यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटर (nanometers) असते आणि वारंवारता ३० पेटाहर्ट्झ ते ३० एक्झाहर्ट्झ (petahertz to exahertz) असते.
क्ष-किरणांचे महत्त्व:
- वैद्यकीय क्षेत्र:
- क्ष-किरणांचा उपयोग हाडे आणि इतर घन ऊती (tissues) तपासण्यासाठी करतात.
- क्ष-किरणामुळे शरीरातील फ्रॅक्चर (fracture), संसर्ग (infections),आणि काही प्रकारचे ट्यूमर (tumors) शोधता येतात.
- औद्योगिक क्षेत्र:
- वस्तूंच्या तपासणीसाठी क्ष-किरणांचा वापर होतो.
- पाईपलाईन (pipelines) आणि वेल्डिंग (welding) मधील दोष शोधण्यासाठी याचा उपयोग होतो.
- सुरक्षा क्षेत्र:
- विमानतळांवर (airports) सामानाची तपासणी करण्यासाठी क्ष-किरणांचा उपयोग करतात.
- याच्या साहाय्याने स्फोटके आणि शस्त्रे शोधता येतात.
- वैज्ञानिक संशोधन:
- क्ष-किरणांचा उपयोग स्फटिकांच्या संरचनेचा (crystal structure) अभ्यास करण्यासाठी करतात.
- नवीन सामग्री (material) विकसित करण्यासाठी याचा उपयोग होतो.