
आर्थिक राष्ट्रवाद
2
Answer link
आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय, सविस्तर लिहा.?
राष्ट्र म्हणून राष्ट्राचा आर्थिक विकास करणे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत आर्थिक सामर्थ्य प्रस्थापित करणे, त्यासाठी अर्थव्यवस्थेवरील परराष्ट्रांचे नियंत्रण कमी करणे म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद असे म्हणतात.
राष्ट्राला आर्थिक दृष्ट्या विकसित व समर्थ करणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, बेरोजगारीचे निर्मूलन, दरडोई उत्पन्नात वाढ, उद्योग व शेती यांच्या विकासाचा आणि शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल, तसेच आयात निर्यात व्यापाराचा फायदेशीर तोल, इत्यादी उद्दिष्टे साध्य करणे होय. पण हा विकास परिपूर्ण होण्यासाठी आर्थिक विकासाला सामाजिक विकासाची जोड मिळणेही आवश्यक असते. त्यामुळे आर्थिक समता व संपत्तीचे समान वाटपही गरजेचे असते.