Topic icon

संगणक माउस

1
माऊस च्या प्रकारानुसार माऊस च्या पार्टस मधेही वेगळेपणा असू शकतो.
आम्ही खाली माऊस चे सामान्य पार्टस ची माहिती दिली आहे.

1 ) Buttons
आजच्या काळात सर्वात जास्त वापरला जाणाऱ्या माऊस ला दोन बटण असतात. एक बटण डाव्या बाजूला आणि एक बटण उजव्या बाजूला असते.

याचा वापर करून कॉम्पुटर मधील Text आणि Objects वर प्रक्रिया करणे शक्य होते. जुन्या माऊस ला एकच बटण असायचे. उदा… Apple कंपनी च्या माऊस ला एकच बटण असते.

2) Ball/ Laser/ LED
बॉल, लेजर आणि LED यांचा वापर माऊस कर्सर ला X- Y Direction मध्ये Move करण्यासाठी केला जातो. बॉल चा वापर मेकॅनिकल माऊस मध्ये केला जातो,

तर लेजर आणि LED चा वापर ऑप्टिकल माऊस मध्ये केला जातो. माऊस च्या खालच्या भागात ही उपकरणे जोडलेली असतात.

3) Scroll Wheel
माऊस च्या दोन बटण च्या मध्ये एक उभ्या चकासारखे उपकरण असते त्याला Scroll Wheel असे म्हणतात. Scroll Wheel च्या मदतीने आपण मोठ्या आकाराच्या Documents किंवा वेबसाईट पेजेस ला वर किंवा खाली स्क्रोल करू शकतो.

4) Cable किंवा Receiver
Wired म्हणजेच Corded माऊस मध्ये केबल चा वापर Transmitting Device म्हणून केलेला असतो. Cable ला कॉम्पुटरशी कनेक्ट करण्यासाठी USB किंवा PS/2 पोर्ट वापरले जाते.

Wireless माऊस मध्ये Wireless Receivers जोडलेले असतात. जसे, Bluetooth, USB Wireless Receiver, ई.

5) Circuit Board-
माऊस च्या आत मध्ये हे Circuit Board बसवलेले असते. या Circuit Board ला Capacitor, Diode आणि Register ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जोडलेले असतात.

यूजर जेंव्हा माऊस चे बटण दाबतो, त्यावेळी तो Input Signal हा Circuit Board ला इलेक्ट्रॉनिक सिग्नल च्या स्वरूपात मिळतो आणि पुढे हा सिग्नल संगणकाला Cable किंवा Wireless Receiver द्वारे पाठवला जातो.श्रोत - माऊस ची माहिती मराठीत- Mouse Information in Marathi

उत्तर लिहिले · 16/4/2021
कर्म · 465