
नैतिक अधःपतन
0
Answer link
नैतिक म्हणजे नितीतत्वांशी संलग्न राहुन जीवन जगणे.कुठेही तडजोड न करता आयुष्य घालवीणे पण असे होत नाही.आपल्या नितीतत्वांना मुरड घालावीच लागते.म्हणून अध: पतन झाले आहे असे म्हणता येणार नाही.ज्यामुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो अशावेळी मात्र आपला फायदा झालेला असतो अशी स्थिती निर्माण होते तेव्हा ती बाब पुढे आपली सवय बनून जाते त्या गोष्टी बद्दल आपल्याला पाप किवा कोणतेही सोयरसूतक वाटेनासे होते तेव्हा ते नैतिक अध: पतन असू शकते.
अनैतिक गोष्टींना जेव्हा आपण स्पष्टीकरण देतो तेव्हाच आपली भूमिका अधर्माची असते.तात्पुरता फायदा होईल पण पुढे व्याजासकट भरावे लागते.
स्री पुरुषातील संबंध हे लग्न केल्यास नैतिक समजले जातात पण तेच लग्न न करता जोडले जातात तेव्हा ते अनैतिक होतात पण काळानुसार काही व्याख्या बदलल्या तरी त्याचे परिणाम भोगावेच लागतात.जसे लिव इन रिलेशन शिप त्याला सध्या आपण नैतिक दृष्ट्या अयोग्य आहे असे म्हटले तरी लोकांना त्याचा काहीही फरक पडत नाही कारण त्यांच्या ते सोयीचे आहे.पण पुढे ते त्यानाच त्रासदायक होत असते.
कुठल्याही कार्यालयात स्रिया कायदे कानुन पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात पाळतात असा आपला समज आहे.पण सध्या एका स्री शिक्षण अधिकारयाने करप्शन करुन त्याला मुठमाती दिली आहे.ह्याला आपण नैतिक अध: पतन म्हणणार.
सध्याच्या करोना काळात नैतिक मूल्येच नष्ट झाल्याची कितितरी उदाहरणे देता येतील.एकमेका सहाय्य करू असे जे आपले ब्रीदवाक्य आपण विसरत चाललो आहोत.आपण भले आपलं भलं बाजूचा मेला तरी चालेल ही वृत्ती वाढत चालली आहे.हे नैतिक अध: पतनच आहे.
एखादा स्री जोडीदार कार्यालयात आपल्या बरोबर काम करतो,हसतो बोलतो,सलगी करतो म्हणून त्याच्याकडून स्री सुखाची अपेक्षा ठेवणे किवा मागणी करणे किवा कोंडीत पकडून जबरदस्ती करणे हा प्रकार नैतिक तसेच कायदेशीर सुध्दा गैर आहे.
शाळा कॉलेज यांच्या बाबतीत फी विषयी पालकांना वेठीस धरणे हे आताच्या काळातिल सर्वात मोठे नैतिक अध: पतन आहे.पूर्वी विद्या हे दान मानले जायचे आज ते कमायीचे करण बनले आहे.
काही दिवसापूर्वी शाळेतल्या एका स्री शिक्षकीने विद्यार्थ्याशी अवैध संबंध ठेउन लग्न केले ही तर अध: पतनाची सीमा गाठली असेच म्हणावे लागेल.
रोजच्या आयुष्यात आपण सध्या अनेक गोष्टी टाळल्या पाहिजेत जसे मुलांना शिस्त लावण्याच्या नादात आपण कृरतेची सीमा गाठत आहोत हे सुध्दा अध: पतन आहे.तुमचा मुलगा आहे म्हणून आजी आजोबा सुध्दा काही बोलू शकत नाहीत.अशा प्रकारे हजारो उदाहरणं देता येतील.
3
Answer link
नैतिक म्हणजे जी गोष्ट नीतिमत्तेने केली जाते ती. उदाहरण, १० रुपयांची वस्तू १० रुपयात विकणे हे एक नैतिक वागणे आहे. तीच वस्तू अव्वाच्या सव्वा किमतीत विकणे हे अनैतिक आहे.
अधःपतन म्हणजे एखाद्या गोष्टीचा दर्जा ढासळणे किंवा ती गोष्ट कमकुवत होणे.
म्हणजेच एखाद्या व्यक्तीची नीतिमत्ता ढासळते तेव्हा त्या व्यक्तीचे नैतिक अधःपतन झाले असे म्हणतात.