Topic icon

कालसर्प योग

1
 तुम्हाला मी केलेल्या एका ढोबळ Survey चे अनुमान सांगतो. मी बोललेल्या शंभर लोकां पैकी ७० ते ८० टक्के लोकांनी केवळ घाबरून त्रंबकेश्वर ची वारी या पूजे साठी केली आणि त्यातील ९० टक्के लोकांना नंतर असे वाटले कि ते त्यांनी उगाच केले. तिथे गेल्यावर येणारे अनुभव (पाचशे लोक एकाचवेळी बाजूबाजूला गर्दीत बसून केलेल्या पूजा, कोणाचा कोणाला मेळ नाही, आजूबाजूला असणाऱ्या घाणीचे साम्राज्य, प्रत्येक गोष्टीत काढले जाणारे हजारोंनि रुपये, तेथील बाजारीकरण...यादी फार मोठी आहे ) हे सगळे खरंतर तुम्हाला आतून सांगत असते कि हे काही खरं नाही, पण भीती हि गोष्ट अशी आहे कि माणूस म्हणतो उद्या कोणी म्हणायला नको कि हि पूजा केली नाही म्हणून नुकसान झाले. पूजा करून किती लोकांना खरंच फायदा झाला हे गणित छापा काट्यामध्ये छापा किती वेळा पडेल असेच आहे. ज्योतिषाचा आणि तेथील लोकांचा संपूर्ण व्यवसायच असा लोकांना घाबरवून चालत आहे. तुम्ही त्याला बळी पडू नका.

देवावर विश्वास असेल तर तुमच्या आवडत्या मंदिरात जाऊन मनापासून कळकळून विनंती करा. देव आहे कि नाही कोणाला माहिती नाही पण तो असेल तर ती विनंती पोचेल, तो असला तरी तो खरंच आपल्याला materialistic गोष्टीसाठी मदत करतो का? करत असेल तर कधी करतो आणि कधी नाही हे लॉजिक आपल्याला माहिती नाही पण तुमची case त्या लॉजिक मध्ये बसणारी असेल तर तुम्हाला मदत मिळेल. त्यासाठी खर्च करून अमुक ठिकाणी जायला पाहिजे असे नाही.

आता सगळ्यात शेवटी आणि महत्वाचे, ज्या पत्रिके वरून तुम्हाला सांगितले आहे कि अमुक योग आहेत आणि अमुक पूजा करा हे तरी खरे आहे का? आजतागायत ते कधीहि सिद्ध झालेले नाही. त्याउलट ते कसे खरे नाही हे आम्ही स्वतः शास्त्रोक्त प्रयोग करून, हजारो पत्रिका घेऊन सिद्ध केलेले आहे. जर ग्रह पत्रिका हेच खरे नसेल तर त्यात असणारे घाबरावणरे योग पण खरे नाहीत. तेव्हा तुम्ही हि भीती मनातून पूर्ण काढून टाका. इथे मी दिलेली इतर उत्तरे बघा, माझा ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही हा खाालील व्हिडिओ बघा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

https://youtu.be/RBKuOeOF79w

 


उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 530