Topic icon

देवता

0
गुरुवार आणि त्या दिवसाचे महत्त्व

गुरुवार हा दिवस अनेक देवतांना समर्पित आहे, त्यापैकी काही प्रमुख देवता आणि त्यांची शिकवण खालीलप्रमाणे:

गुरुवार: देवता आणि महत्त्व
  • विष्णू: गुरुवारी विष्णू देवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू हे जगाचे पालनहार आहेत आणि त्यांची पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते.
  • बृहस्पति: বৃহস্পতি हे देवगुरु मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, বৃহস্পতি हे ज्ञान, बुद्धी आणि भाग्याचे कारक आहेत. त्यांची उपासना केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळते.
  • दत्तगुरू: काही लोक गुरुवारी दत्तगुरूंची देखील पूजा करतात. दत्तगुरू हे ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे रूप मानले जातात. त्यांची पूजा केल्याने भक्तांना ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.
गुरुवारच्या व्रताची शिकवण
  • सत्य आणि धर्म: गुरुवारी सत्य आणि धर्माचे पालन करण्याचा संकल्प करावा.
  • दान: या दिवशी गरीब व गरजूंना दान करावे.
  • गुरुंचे महत्त्व: गुरुवारी गुरुंचे स्मरण करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करावा.
  • कृतज्ञता: जीवनात जे काही प्राप्त झाले आहे, त्याबद्दल देवाला आणि गुरुंना धन्यवाद द्यावे.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

टीप: ही माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे.

उत्तर लिहिले · 17/4/2025
कर्म · 2200
1
पशुधनाचे रक्षण करणारा पूषण देव होता.





पूषण हे वैदिक देवता आहे. पूषण ही देवता आहे जी विवाहास मदत करते, सुरक्षित प्रवास प्रदान करते आणि जे प्राण्यांना चारा देतात त्यांच्या हृदयात वास करते. तो आपल्या कर्मानुसार फळ देतो. तो आत्म्यांना दुसऱ्या जगात जाण्यासाठी मार्गदर्शन करतो.
 
 
तो लोकांच्या मृत्यूच्या वेळी त्याची सुंदर उपस्थिती दाखवून त्यांचे भय दूर करतो. तो यात्रेकरूंचे चोर आणि प्राण्यांपासून संरक्षण करतो आणि शत्रू, अपघात आणि अनैसर्गिक मृत्यूपासून संरक्षण करून लोकांना दैवी मार्गावर मार्गदर्शन करतो. तो एक देणगी देव देखील आहे जो आपल्या जीवनात संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी देतो.

जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा ते आपल्या सामानाचे रक्षण करतात. तो आपल्या मनातील वाईट विचार काढून टाकतो, काळी जादू काढून टाकतो आणि अनेक घातक रोग बरे करतो.


 
तो प्रामुख्याने चक्रीवादळ, पूर, अतिवृष्टी आणि त्सुनामीमुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींपासून लोकांना दिलासा देतो. तो आपल्यासाठी सर्व काम करतो, शांत जीवन जगतो. देवाची उपासना करणार्‍या भक्तांची तो नेहमी काळजी घेतो आणि भले ते इतर धर्माचे असोत, पण लोकांची ईश्वरावर खरी भक्ती असावी एवढीच त्यांची अपेक्षा असते.

 
जर आपली देवाप्रती शुद्ध भक्ती असेल, तर तो आपल्या भूतकाळातील कर्मांच्या आधारे आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी करेल. आपली वाईट कृत्ये काही प्रमाणात कमी करून आपल्या जीवनात चांगले परिणाम देण्याची शक्ती देखील त्याच्यात आहे परंतु तो एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण नशीब बदलू शकत नाही.


ऋग्वेद आणि प्राचीन पुराण आणि धार्मिक ग्रंथांमध्येही त्यांचा उल्लेख आढळतो. तोही यज्ञात सहभागी होतो. तो यज्ञकर्ते आणि लोकांना आशीर्वाद देतो. तो खोकला, सर्दी, दमा, हृदयाच्या समस्या आणि इतर अनेक आजारांपासून जलद आराम देईल. तो लोकांना मानसिक विकार, मानसिक गोंधळ, उर्जेचा अभाव, आळस, आळस आणि मानसिक अस्थिरता यापासून मुक्त करतो. विविध होम्स आयोजित करताना त्यांचे नाव अनेक वेळा पुनरावृत्ती होते.

 
तो इंद्र, वरुण, अग्नि, वायू, सूर्य आणि चंद्र या वैदिक देवतांच्या समतुल्य मानला जातो. त्याच्याकडे अलौकिक शक्ती आहे आणि तुमची हाक ऐकल्यानंतर तो कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी पोहोचेल. आपण त्याच्या नावाचा पुन्हा पुन्हा जप करू शकतो, जेणेकरून जीवनाच्या प्रत्येक वाटचालीत तो आपल्यासोबत असतो.


पुराणात पूषनचे वर्णन १२ आदित्यांपैकी एक असून अदिती आणि कश्यप यांचा पुत्र आहे. त्याचे भाऊ सूर्य, वरुण आणि इंद्र आहेत. 

तो आपल्यासाठी अंगरक्षक म्हणून काम करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. जरी तो इतर देवांसारखा प्रसिद्ध नसला तरी. तो वैदिक देवतांपैकी एक आहे आणि पृथ्वीवरील लोकांना मदत करतो. भगवान इंद्रांनी दिलेल्या सूचनेनुसार तो आपली कर्तव्ये पार पाडतो आणि त्याला मदत करणारा मित्र म्हणूनही काम करतो. वायू, वरुण, सूर्य आणि चंद्र यांसारख्या इतर देवतांशीही तो आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडतो.


 
अनेक ऋषीमुनींनी त्यांची पूजा केली आहे आणि ते ऋषी त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. तो ऋषीमुनींना योग्य तपश्चर्या करण्यास मदत करतो आणि तपश्चर्या करताना त्यांच्याकडून झालेल्या चुका दूर करतो. सर्वसाधारणपणे, आपण असे म्हणू शकतो की तो संपूर्ण जगाशी मैत्रीपूर्ण आहे. आपण त्याच्या गौरवाची स्तुती करू आणि आशीर्वादित होऊ या. ओम श्री पुषन नमः ।


उत्तर लिहिले · 30/10/2023
कर्म · 53750
0
पशुधनाचे रक्षण करणारा पूषण देव होता.
उत्तर लिहिले · 20/9/2022
कर्म · 53750
2
वास्तुशांती का करावी? याचे विधान काय आहे ते पाहू
लग्न पहावं करुन, घर पहावं बांधून ही एक प्रचलित म्हण आहे. म्हणजेच या दोन्ही गोष्टींचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. वास्तू हा शब्द वास धातूपासून निर्माण झाला. वास म्हणजे राहणे. राहण्यायोग्य वास्तू कशी असावी हे आपण वास्तुशास्त्र प्रकरणात पाहू.
वास्तू शब्दाचा अर्थ:-
मनुष्याला जीवनात तीन प्रमुख बाबींची आवश्यकता असते. जीवनात शक्तीसाठी अन्न, निसर्गाच्या तापमानानुसार वस्त्र आणि निवासासाठी सुरक्षित घर. वरील तीनपैकी घर ही महत्त्वाची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेले घर हे लाभदायी ठरावे, याचाही विचार आपण केला पाहिजे.
आपण आपल्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करीत असतो. आपल्या सर्वसामान्य लोकांचे एकच स्वप्न असते. आणि ते म्हणजे आपल्या स्वतःचे एखादे घर असावे. अहोरात्र कष्ट करून तसेच कर्ज इत्यादि मिळूनही आपल्या घराचे स्वप्न साकार होतेच असे नाही. ते स्वप्न साकार होण्यासाठी दैवाची अनुकूलता मिळवावी लागते. ज्योतिष अभ्यासाप्रमाणे आपल्या कुंडलीतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु लाभ पहातात.
दैव तसेच ग्रह अनुकूल झाल्यानंतरच आपले स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. त्यानंतर मात्र आपल्याला होणारा आनंद मात्र न भूतो न भविष्यति असाच असतो. कालांतराने मात्र हा आनंद हळूहळू कमी होत जातो आणि त्याची जागा मात्र कष्ट, दुःख, आजार हे घेतात. मग आपणास शंका येते की, आपल्या या जागेमध्ये काही दोष आहे का? या जागेमध्ये काही तांत्रिक देवतांचे वास्तव्य आहे का? आपल्याला कोणाची तरी दृष्ट लागली तर नाही ना? या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एकच गोष्टीचा उलगडा होतो की, आपण आपल्या वास्तुची शांती केली नाही. मग आपण आमच्याकडे येतात. आम्ही योग्य तो वास्तुचा मुहुर्त काढून देतो.
आपल्या माहितीसाठी वास्तुशांतीसाठी वर्ज्य (अशुभ) असलेले दिवस देत आहे. त्याची आपण वास्तुशांती करीत असतांना दखल घ्यावी.
महिना -- चैत्र संपूर्ण, अश्विन संपूर्ण, व अधिक महिना.
तिथी -- अमावस्या, क्षयतिथी, रिक्ततिथी.
वार -- रविवार, मंगळवार.
हे दिवस वास्तुशांती साठी वर्ज्य आहेत.
मघाच्या लेखामध्ये आपण श्रीवास्तु देवता कोण त्यांचा जन्म कसा झाला व
श्री महादेवने त्यांना असा आशिर्वाद दिला जो कोणी नविन वास्तु निर्माण करेल त्या वास्तुची वास्तुशांती करणार नाही तो या वास्तुचा आहार बनेल व ती वास्तु स्मशानभूमी बनेल व जो नित्य वास्तुला नैवेद्य देणार नाहीत त्यालाही वास्तुमुळे त्रास होईल असा आशिर्वाद प्राप्त झाला.
या सोबत जो मनुष्य नविन वास्तु निर्माण करतो तेव्हा त्या वास्तु भुमिच्या सप्त पाताळ नावे पुढील प्रमाणे 1:अतल, 2: वितल, 3: सुतल, 4:तलातल,
5: महातल, 6: रसातल, 7: पाताळ या सप्त पाताळ स्थित वास्तु भुमी खाली दोष
आहेत ते दोष परिहार करण्यासाठी व या भुमी वर जेव्हा आपण वास्तु
निर्माण करतो तेव्हा लोखंड कुठून येते, विटा कुठून येतात, रेती नदीतुन येते(नदी अनेक मृतां जनांचा अस्थि विसर्जन केलेले
असते) या द्वारे ह्या वस्तू आपल्या वास्तु निर्माण करण्यात साह्य करतात व वास्तु निर्माण करतात अनेक सुक्ष्म जीव मारले
जातात या सर्वाचे दोष वास्तुच्या मालकाला लागतात.
या सोबत हे सर्व दोष वास्तुही (घराला) लागतात हे दोष परिहार जाण्यासाठी वास्तुशांती पुजन करतात
कोणीही नविन घर, फ्लैट, रोहाऊस, दुकान किवा आपल्या मालकी नविन अथवा जुनी वास्तु घेतल्यास वास्तु शांति करवी एकदा वास्तु शांती केल्यावर हा श्रीवास्तु देव आपले सात पिढ्या पर्यंत रक्षण करतो
पण त्याप्रमाणे आपण आर्थिक जुळवाजुळव करुन मनापासून ती तयार करतो. मात्र निवास करण्यापूर्वी वास्तुशांती नावाचा विधी करण्यास विसरतो किंवा सोयीस्कररित्या टाळतो. त्यासाठी अनेक कारणे आपल्याकडे असतात.
1) आम्ही कायम कायमसाठी इथे राहणार नाही. पुढे मोठया घरात बघू.
2) इथे आम्ही दोघेच तर राहणार आहोत. मुलगा परदेषात असतो. मुलगी तर सासरी जाईल.
3) आमचं काय व्हायचंय आता कुठे वंष वाढणार आहे.
4) आम्ही इथे तात्पुरते आलोय.
5) आहो हे रिसेलचे घर आहे. पुर्वी होते त्यांनी केली असेल.
6) अहो आम्ही तिसऱ्या मजल्यावर घेतलंय, तिथे वास्तुषांतीची काय गरज?
7) अहो, बिल्डरने घर ताब्यात देतानाच वास्तुषांती करुन दिली आहे.
अशी एक ना अनेक कारणं आपल्याकडे असतात. जी वास्तू तयार करताना रंगरंगोटी, इंटेरियर, फर्निचर यासाठी आपण जितकी काळजी घेतो, जेवढे सजग आपण असतो, तितकेच आपण वास्तुषांती विधी करण्याबाबत निरिच्छ व उदासीन असतो. अषा मंडळींना मी एक
श्लोक सांगू इच्छितो. कर्तव्य वास्तुषमनं सौमित्रे चिरजीविभीः।।
मग वास्तुशांती केव्हा व कशी करावी? यातील मुख्य विधी कोणते?
वास्तुशांती विधान पुढिल प्रमाणे:-
वास्तुशांती संकल्प - माझी ही जागा बांधतांना सर्वप्रथम या जमिनीवर जे संस्कार केले गेले, ते संस्कार करीत असतांनी भूमीदेवतेला जे दुःख झाले असेल. जमीन खणणे, तोडणे, कापणे, भाजणे, भिजवणे, तुडवणे, कांडणे, कमी जास्त करणे, उंच सपाट करणे, हे करीत असतांना, तसेच जमीनीतून सुवर्ण, रजत, ताम्र, तपु, सीसक, कांस्य, लोह, पाषाण इत्यादि काढुन घेत असतांना जे दोष निर्माण झाले असतील तसेच कीटक, क्रुमी यांची हत्या झाल्यामुळे निर्माण झालेले जे दोष असतील, ते सर्व दोष निघुन जाऊन मला माझ्या या नवीन जागेमध्ये सदासर्वदा सुखशांती लाभावी, मनातील हेतू पूर्ण व्हावे, शत्रूंचा नाश होऊन माझ्या कुटुंबातील सर्वांना दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे. धनधान्य, पुत्र, पौत्र, किर्ती, यश लाभ मला प्राप्त व्हावे. वास्तुपुरुषाचा आशिर्वाद मला प्राप्त व्हावा, नवग्रह मला अनुकुल व्हावे. म्हणून मी आज वास्तुशांती करीत आहे. असा प्रधान संकल्प करावा. नंतर
- गणपतीपूजन
- भुमि, दिपनाथ, सुर्य नारायण पुजन
- पुण्याहवाचन( वरुणपूजन)
प्रथम यजमानांनी जमिनीला, गहू किंवा तांदूळाला, कलशाला स्पर्श करावा. कलशात सात नद्यांचे पाणी घालावे. कलशामध्ये गंध, हळद, दुर्वा, एक नाणे, पंचरत्न, सुपारी, दशॊषधी , सप्तमृतिका घालावे. पंचपल्लव घालून त्यावर नारळ ठेवावे. कलशाला गंध, अक्षता, हळद-कुंकू फूल वहावे. बेल, तुळस, दुर्वा वाहून फळाचा नैवेद्य दाखवावा. कलशाची प्रार्थना करावी. पूजा केलेला कलश उचलून आपल्या कुटुंबातील सर्वांच्या कपाळाला तीनवेळा लावावा. ब्राह्मण पूजन करुन त्यांचे आशिर्वाद घ्यावे. ही शांती आपण सर्वांनी प्रसन्न होऊन करावी, अशी ब्राह्मणांची प्रार्थना करावी. माझ्या घरामध्ये सदासर्वदा सुखशांती राहो, जे रोग असतील ते निघून जावो, यासाठी त्या कलशातील शुभ याचे पाणी अस्तु म्हणत समोरील ताम्हणात काढावे. अशुभ याचे पाणी बाहेर काढावे. त्यानंतर या वास्तुशांतीच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना पुण्य लाभो, आमच्या सर्वांचे कल्याण होवो, आमच्यातील चांगल्या गोष्टी वाढो, आम्हाला मानसिक स्वास्थ लाभो, आम्हाला पैसा मिळो, ह्या पाच गोष्टी देवांकडे मागाव्या. ताम्हणामध्ये काढलेल्या शुभ गोष्टींच्या पाण्याने सर्वांना अभिषेक करावा. आपले आयुष्य वाढावे, या हेतुने सुहासिनीकडून औक्षण करुन घ्यावे. त्यांना मान द्यावा. ह्या पद्धतीने पुण्याहवाचन केले जाते.
-मातृकापूजन,
मातृकापूजन - मातृका म्हणजेच देवी. यामध्ये गणपती, कुलदेवतासहित सोळा देवतांचे पूजन केले जाते. १. गणपती २. गौरी ३. पद्मा ४. शची ५. मेधा ६. सावित्री ७. विजया ८. जया ९. देवसेना १०. स्वधा ११. स्वाहा १२. मातरा १३. लोकमातरा १४. ध्रुती १५. पुष्टी १६. तुष्टी १७. कुलदेवता. या त्या देवता होय. यांची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर सात घृत मातृकांचे पूजन केले जाते. नैवेद्य दाखवून देवीची स्तुती केली जाते. यजमान पत्नीकडून वायनदान केले जाते.
आयुष्यमंत्रजप - यजमानांना आरोग्यसहित दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे, यासाठी हे मंत्र म्हणून यजमानांना आशिर्वाद दिले जातात.
-नांदीश्राध्द
नांदीश्राद्ध - नांदी म्हणजे शुभ, मंगल. या मंगलमय वातावरणात होणारे श्राद्ध म्हणजेच नांदीश्राद्ध होय. प्रारंभी जसे आपण देवांचे, उपस्थितांचे आशिर्वाद घेतले तसेच या ठिकाणी पूर्वजांचे स्मरण केले जाते. कितीही झाले तरी नांदीश्राद्ध हे अशुभ असते म्हणून यजमानांनी धारण केलेले पवित्रक काढून हात-पाय धुवावे. पुन्हा नवीन पवित्रक धारण करावे.
- गुरुजींना शांतिकर्म चालवण्यासाठी अधिकार (वर्ण) देणे
ब्राह्मणवरण - मंत्रिमंडळामध्ये ज्याप्रमाणे पदाधिकारी असतात. त्यांना त्यांची कामे आखून दिलेली असतात. त्याचप्रमाणे या कार्यामध्ये १. आचार्य २. ब्रह्मा ३.गाणपत्य ४. सादस्य असे पदाधिकारी नेमलेले असतात. ब्राह्मणांना मानसन्मान देऊन त्यांची प्रार्थना केली जाते आणि या शांतीची जबाबदारी ते ब्राह्मण वृतोस्मि असे म्हणून स्विकारतात.
- शांतीच्या जागेची शुध्दी
दिग्रक्षणम - यजमानांच्या हातामध्ये पिवळी मोहरी देऊन ती दाही दिशांना टाकावी, त्यामुळे आपल्या वास्तुमध्ये अद्रुश्य स्वरुपात काही तांत्रिक देवता असल्यास त्या निघून जाव्या, किंवा त्यांचा नाश व्हावा हा हेतू असतो.
- गौ दान (रजक गौ), पंचगव्य
पंचगव्यकरण - गाईपासून उत्पन्न झालेले गोमूत्र, गोमय, दूध, दही, तूप हे कांस्यपात्रात एकत्र करून त्यात दर्भाचे पाणी घालावे. ते अभिमंत्रीत करून जागाशुद्धीसाठी सर्वत्र प्रोक्षण केले जाते. देहशुद्धीसाठी प्राशन केले जाते.
- भुमि पुजन,पंच भु संस्कार
हवनकुंडाजवळ जमीनीवर भूमी, कूर्म, अनंत या तीन देवतांची पूजा केली जाते, कुंडामध्ये भूसंस्कार करून अग्नीस्थापना करतात.
- अग्निस्थापना व पुजन झाल्या वर
(वास्तु शालाकर्म करणे म्हणजे वास्तु
शांती कर्म )
यात घरातील सर्व वास्तुच्या भितीवर पुजन कारून सौभाग्यवती स्त्रीयाच्या दोन्ही हाताने हळद कुकु चे प्रतिमा उमटल्या जातात, या सोबत वास्तु भितीना रेशम वस्त्रचे वेटन केले जाते. व
वास्तुचे मुख्य 4 पिलर (स्तंभांचे) पूजन. यात अच्युताय, भौमाय अषा आहुती देतात. 'भो स्तंभ अस्म्नि गृह संरक्षणार्थ त्वं स्थिरोभव, अचलोभव, संतुष्टो, सुखदो वरदो भव' याप्रमाणे पूजन करुन स्तंभ प्रार्थना करतात.
- मुख्य देवता पुजन
चौरंगाच्या कडेला खैराच्या लाकडाचे चार शंकू मातीच्या गोळ्यात उभे करून सूत्राने वेष्टन केले जाते. शंकूमध्ये नागाची स्थापना केली जाते. त्यांची पूजा करतात. वास्तुमंडलावर सोन्याच्या काडीने १० उभ्या व १० आडव्या रेषा आखल्या जातात. निर्माण झालेल्या ८१ चौरस
प्रधान वास्तुमंडल स्थापन, पूजन, व प्रधान देवता वास्तुपुरुष प्रतिमा व ध्रुव देवता म्हणजे स्थिरता
( ध्रुव देवतापूजन यासाठी करतात की जसा ध्रुव तारा उत्तर दिशेला स्थिर असतो तसा वास्तु ही आपल्या मालकीचा स्थिर रहावा)व शेष या देवतांची प्राणप्रतिष्ठा, अभिशेक पुजन,
नवग्रह मंडल,
यामध्ये ग्रहांची स्थापना केली जाते. एकुण ९ ग्रह, त्यांच्या अधिदेवता ९, प्रत्याधिदेवता ९, पंचलोकपाल वास्तु, क्षेत्रपाल ७, दहा दिशांच्या १० देवता अश्या एकुण ४४ देवतांची स्थापना केली जाते. यथाशक्ती पूजन करुन नवग्रहांची प्रार्थना करतात.
-ईशान्य रुद्र पीठ स्थापन पूजन
- हवन
- यजमानासाठी (आयुष्य-वर्धनार्थ व आरोग्यासाठी) काही वैदिक मंत्र व सूक्ते म्हणणे,
- आहुती (स्विष्टकृत)
- प्रायश्चित्तहोम
- क्षेत्रपालबली
- शांतिसूक्त
- पूर्णाहूति
- होमाचे उत्तरांग
-वास्तुनिक्षेप
घराचया अग्नेय कोपऱ्यात आकाराचा खड्डा करुन त्यात गौमय, गौमुत्र किंवा पंचगव्य, शेवाळ टाकावे. छोटा कलश त्या सप्तधान्य, पंचरत्न, शेंवाळ (शेंवाळ या वास्तु मध्येसदा हिरवळ राहावी यासाठी) सव्वारुपया याबरोबर सुवर्ण नाग खाली
ठेवावा त्यावर वास्तुप्रतिमा पालथी ठेवावी. कोणत्या महिनयात वास्तुशांती केली त्या प्रमाणे डोके ठेवायचे असते. पण ईशान्य डोके व नैऋत्येला पाय करवे एक दिवा लावावा या सर्वाचे पुजन करून
त्या कलशावर छोटे पेल्ट ठेवावी यावरते
रेती व पाणी टाकून(यावर फरशी लाउन
बंद करवे) पुन्हा पुजन करून घरातील सर्वानी श्रीवास्तुला शाष्टांग नमस्कार करावा यानंतर सर्वानी पुर्ण वास्तुला (1,7,9,11,) प्रदक्षिणा करावी या नंतर
-गृहप्रवेश
(प्रथम पुजन करण्यापूर्वी गृहप्रवेश करावा नंतर वास्तु निक्षेप झाल्यावर पुन्हा एकदा गृहप्रवेश करवा)
कलश घेऊन वेदघोषात, वाद्यघोषात आचार्यांच्या परवानगीने घेऊन सहकुटुंब, परिवार प्रवेश करणे,
प्रथम द्वारदेवतेचे पूजन करुन स्वस्तिक, शुभ-लाभ काढावे. गणपती, कलश पूजन करावे. यजमानांनी देव हातात घ्यावे. यजमान पत्नींनी कलश डोक्यावर घेउन वास्तुप्रवेश करावा त्यापूर्वी मुख्य सिंहद्वार दरवाजाच्या चौकटीचे पूजन यात देवाची स्थापना करावी नवीन फॅशन प्रमाणे मुख्य दारास देखील उंबरा नसतो.
(उंबरा का असावा या विषयावर लेख अधि दिला आहेत) अशा वास्तुत सुख, समृद्धी, शांती, आनंद, प्रसन्नता टिकत नाही. ज्या घरात देव नाही ते घरच नाहीत . म्हणून प्रत्येक घरात गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, कुलस्वामिनीचे टाक महादेव, नंदी, दक्षिणावर्ती शंख, घंटी,
अवश्यक आहेत. गृहिणीचया डोक्यावर पाण्याने भरलेला कलष- वास्तुमध्ये सर्व भैतिक, पारमार्थिक सुख भरलेले असावे यासाठी तुळषीची कुंडी- तुळसीला ''हरिप्रियाय'' म्हणतात. प्रत्येक घरात/ दारासमोर तुळस असली पाहिजे. ज्या दारात अथवा घरात तुळस आहे, त्या ठिकाणी नारायणाचा वास असतो. ज्या हिकणी नारायण आहे तिथे लक्ष्मी कायम स्वरुपी स्थिर असते. कोरडा शिधा-वास्तुतील निवासीयांना, अतिथी, अभ्यागतांना अन्नाची कमतरता भासू नये. अन्न हे पूर्णब्रह्म स्वरुप असल्याने त्यासोबत प्रवेष करावा. पुर्ण वास्तु मध्ये
कलश फिरवावा.
- स्थापितदेवतांची उत्तरपूजा
- यजमान व कुटुंबीयांवर आर्शिवचन
- अग्निदेवतेची प्रार्थना करून होमविभूति धारण करणे
- गुरुजींना पीठदान व
- दशदाने देणे( कोणतेही हवन अथवा यज्ञ झाले असता 10 वस्तुचे दान केल्याने
पुर्ण फल मिळते
दशदाने
जन्म, मृत्यूपूर्व, मृत्यूपश्चात, शांति-प्रयोग, विविध हवने इ. साठी प्रमुख १० प्रकारची दाने सांगितली आहेत.
१) गो (गाय)
२) भू (जमिन)
३) तिल (काळे तीळ)
४) हिरण्य (सुवर्ण)
५) वस्त्र (धोतरपान, उपरणे इ.)
६) धान्य (गहू/तांदूळ इ)
७) गुड (गूळ)
८) मीठ (लवण)
९) लोह (लोखंडाची वस्तू - तवा/कढई)
१०) ऊर्णावस्त्र (लोकरीचे वस्त्र)
- वास्तुशांतीसमाप्ति
- ब्राह्मणभोजन
- विडादक्षिणा
- गुरुजींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेणे
- ३ वेळा विष्णूस्मरण करून सर्व कर्म भगवंताला अर्पण करणे
उत्तर लिहिले · 15/3/2022
कर्म · 121765
0
काय
उत्तर लिहिले · 21/3/2023
कर्म · 0
2
या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबड्या रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमेयुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते.