Topic icon

खाद्यसंस्कृती

0
मराठी जेवण इतर पदार्थांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे ठरते. ते खाताना तुम्हाला खालील अनुभव येऊ शकतात:
  • चव आणि मसाले: मराठी जेवणात विशिष्ट मसाल्यांचा वापर केला जातो, जसे - गोडा मसाला, काळा मसाला, आणि आगरी मसाला. त्यामुळे पदार्थांना एक खास चव येते जी इतर जेवणांमध्ये सहसा आढळत नाही.
  • पदार्थांची विविधता: मराठी जेवणात विविध प्रकारच्या भाज्या, डाळी, आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश असतो. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते आणि ती जिभेला एक वेगळा अनुभव देते.
  • नैसर्गिक घटक: मराठी जेवणात ताजे आणि नैसर्गिक घटक वापरले जातात. त्यामुळे जेवण अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी वाटते.
  • साधेपणा: मराठी जेवण सहसा साधे असते, पण ते चवीला उत्कृष्ट असते. तेल आणि मसाल्यांचा वापर बेतानेच केला जातो, ज्यामुळे जेवण पचायला हलके वाटते.
  • प्रादेशिक विविधता: महाराष्ट्रात प्रत्येक प्रदेशानुसार जेवणात बदल आढळतो. उदाहरणार्थ, विदर्भातील जेवण थोडे मसालेदार असते, तर कोकणातील जेवणात नारळाचा वापर जास्त असतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळी चव अनुभवायला मिळते.

मराठी जेवण खाल्ल्यानंतर एक वेगळी तृप्ती मिळते, कारण ते चविष्ट असण्यासोबतच आपल्या संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले असते.

उत्तर लिहिले · 11/5/2025
कर्म · 980
0

जेवणासाठी पंक्तीत साधारणपणे स्टील चे ताट वापरले जाते.

steel ची ताटे टिकाऊ असतात आणि ती स्वच्छ करणे सोपे असते. त्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी जेवण वाढण्यासाठी स्टीलची ताटे अधिक सोयीस्कर ठरतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
0

जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणाऱ्या पाटाला मांडणी म्हणतात.

मांडणी हे आसन म्हणून वापरले जाते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
4
आपण कोठे ही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन "पेशवाई थाट" असा सहज करतो. पण प्रत्यक्षात "पेशवाई थाट" एवढा सोपा नव्हता!

कसा होता "पेशवाई थाट"?
पेशवाईतील भोजन व्यवस्थेचा थाटमाट ...

पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत. नित्य, नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात.

पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत. त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, केळीच्या पानावर वाढल्या जात. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप, ताक, दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत. दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत.
सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरु केली. पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरडया व खीर पुरण असे. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या, आमट्या, सार, सांबार, व पक्वान्ने, पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या व भाताचे प्रकार. ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात बरीच वर्षे टिकून आहे.

ब्राम्हण भोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान, दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण, पानाभोवती रांगोळ्या, बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी (एक पक्वान् खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी), पानात १० भाज्या त्यात तोंडली, परवरे (पडवळ), वांगी या भाज्या नित्य असत. तुरीचे वरण, २ प्रकारची सांबारे, आमटी, १० प्रकारची लोणची (त्यातील एक साखरेचे गोड) असे. ३-४ प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढीवडे, साजूक तूप, माध्यम गोड मठ्ठा, २ प्रकारच्या खिरी (शेवयाची व गवल्याची), सपिठाच्या पूर्ण पोळ्या (पुरण पोळ्या), खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे, चिकवड्या, मिरगोंडे (मिरगुंडे), फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, २० प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या, पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी, चाकवताचे सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा, मेथी किंवा आंबाडीची भाजी, चटण्या, कोशिंबिरीत कोथिंबीर लसण, आले, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारले, आमसुले, हरभऱ्याची डाळ, लिंबे याचा वापर करीत. तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घीवर, आमरस, श्रीखंड ( हे पक्वान्न शे बाजीराव ( दुसरे ) यांनी प्रचारात आणले. बासुंदी, केशरी साखरभात, जिलेबी ( हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले.) लाडू, पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते.) भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी विडा दिला जाई. ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती.)

पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राम्हण भोजनाचा मक्ता ६९०० रु चा असे. त्यात २६ दिवस रोज ५०० ब्राम्हण भोजन करीत असत. यावरून दरपात्री साडे आठ आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना येत असे. सन १८०७ मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज ५०० ब्राम्हण याप्रमाणे दिला होता. तसेच नेवैद्य व थोरले पंगतीसाठी १२५ भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा १००० पात्रे मिळून भोजनाचा २९ हजार रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता. या मक्त्यात वार्षिक ३७ हजार पात्रे होत असल्याने पात्री १२ आणे प्रमाणे भोजनखर्च होत असे !

-
उत्तर लिहिले · 1/9/2021
कर्म · 121765
5
कोल्हापुरातला माणूस भेटला की, पहिला प्रश्न विचारणार, जेवला काय... आणि कोल्हापुरात जेवायचं म्हटलं की, ठसका तर लागणारच. झणझणीत या विशेषणाशिवाय कोल्हापुरी माणूस जेवणारच नाही... मग तो कोणत्याही जाती-उपजातींतला असो.


प. महाराष्ट्राची शान कोल्हापूर. इथल्या तांबड्या-पांढऱ्या रश्श्याशिवाय महाराष्ट्राची खाद्यपरंपरा सुरूच करता येत नाही. इथल्या मिसळ, कटवड्याने खवय्यांना पार नादावलंय. पण घराघरांतल्या पदार्थांमध्येही इतकं वैविध्य आहे की, त्याची नोंद घेणं भाग पडतं. कोल्हापुरी माणसांत कमालीचा रांगडेपणा आणि हळवेपणा अशी दोन कमालीची टोकं एकत्रित असतात, त्याचप्रमाणं इथली तिखटजाळ मिरची आणि मधाळ गूळ अशा टोकाच्या चवीही प्रसिद्ध आहेत. त्यामुळं कोल्हापुरी माणसं आपल्या मधाळ आग्रहानं झणझणीत जेवण आपल्या पावण्याच्या असं काही गळी उतरवतो की, त्याच्या डोळ्यात त्याच्या आपुलकीनं आणि मिरचीच्या ठसक्यानं पाणी आल्याशिवाय राहत नाही.मुळात कोल्हापुरी म्हणजे तिखटजाळ, असा काही समज आहे, तो मात्र इथल्या जेवणावर अन्याय करणारा आहे. कारण इथल्या जेवणासाठी थेट मिरचीची पूड वापरण्याची पद्धत नाहीच. आजकाल कोल्हापुरी मसाला म्हणून चाखला जातोय, तोच इथे रोजच्या स्वयंपाकात वापरला जातो. त्याला मसाला न म्हणता सर्रास चटणी म्हटलं जातं. ही चटणी बनवणं आणि ती बनवताना येणारा भूक खवळायला लावणारा वास, ही खास अनुभवण्याची गोष्ट आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,कांदा, लसूण, आलं कोथिंबीर, गरम मसाला आणि मिरचीची पूड विशिष्ट प्रमाणात एकत्र करून ही चटणी तयार केली जाते. कोल्हापुरात जशा गल्लीगल्लीत तालमी दिसतात, तसे मसाल्याचे डंग (खास मसाले बनवण्याची गिरणी) आहेत. आता तर तयार ओला मसालाही मिळायला लागला आहे. तयार चटणीवर गरम करून थंड केलेलं थोडं तेल मिसळलं जातं, त्यामुळेच रोजच्या जेवणात जरी कमी तेल वापरलं तरी लालभडक तवंग भाजी किंवा रश्श्याला येणारच.
कोल्हापुरी माणूस खाण्याच्या बाबतीत ऐसपैसच. रोजच जेवण साधं असलं तरी चटणीमुळे प्रत्येक भाजीला व्यवस्थित तवंग आलेला असतो. भाज्यांमध्ये रोज वाटूनघाटून मसाले वापरले जात नाही. कांदा, चटणी परतून वर कोणत्याही भाज्या घातल्या की, झाला इथला रोजचा स्वयंपाक. चटणीमुळे रोजच्या जेवणात लसूण-आलं वरून घालणंही फार नसतंच. वरण हा प्रकार इथल्या जेवणात आजारी माणसांसाठीच. आमटी... तीही भुरकून खायची. त्यासाठी जिरे-मोहरीची फोडणी, इतर ठिकाणी असते तशीच असते, पण मोहरी अगदी बारीक असावी, असा आग्रह इथल्या गृहिणींचा असतो. कोल्हापूर सोडून अन्य कुठेही स्थायिक झालेल्या घरांमध्ये खास कोल्हापुरातून बारीक मोहरी, बारीक चवळी आणि मसूर खरेदी करून नेला जातो. याशिवाय कांद्याचा यथेच्छ वापर. ओल्या मसाल्यातही नारळाऐवजी सुकं खोबरंच वापरणार. वाटणात तीळ, खसखस भरपूर घातलं जातं. त्या तुलनेत अन्य खड्या मसाल्यांना फार महत्त्व नसतंच. उगाच कोथिंबीरी, खोबरं घालून सजवण्याचा नाजुकपणाही इथल्या जेवणाला मानवत नाही.
कोल्हापुरी ठेचा बनवताना तव्यावर खमंग भाजलेल्या मिरच्यात फक्त मीठ घालून सरसरीत वाटतात. त्यात आणखी काही घालून तिखटपणा घालवत नाही. झुणकाही खासच. ज्याला इतर ठिकाणी बेसन, पिठलं असं म्हणतात, त्याच चण्याडाळीच्या पिठाचा झुणका कोल्हापुरातल्या घरात खावा. ज्वारीत मापटभर तांदूळ घालून केलेल्या पिठाच्या भाकरीबरोबर हा झुणका म्हणजे स्वर्गसुखच. भरपूर कांदा, चटणी घालून परतलेल्या कांद्यात गरम पाणी घालून वर बेसन मिसळत घट्ट केलेला हा झुणका कधी थोडा पातळ करून भाताबरोबरही खाल्ला जातो. दुधदुभतं असलेला भाग असल्याने गोडसं दही, ताक रोजच्या जेवणात असतंच. शाकाहारात झुणक्याबरोबरच तूरडाळ भिजवून केलेलं डाळवांगं हे भरल्या वांग्या इतक्या इतकंच चविष्ट असतं.माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,अख्खा मसूर तर इतका आवडीचा की मुंबईत जशी चायनीज हॉटेल्स तशी अख्खा मसूर अशी स्पेशालिटी सांगणारी छोटी-मोठी हॉटेल्स आहेत.


ज्वारीच्या भाकरी, भाजी, ताक किंवा दही, थोडासा भात, कच्चा कांदा असा रोजचा बेत असला तरी भाज्यांवरचा तेलाचा तवंग जास्त आवडीचा. ज्याला कट म्हणतात. भाज्या, मटण आणि मिसळीवरचा कट म्हणजे कोल्हापुरी माणसाचा वीक पॉइंट. चटणी तेलावर परतली की त्यातल्या कांदा, गरम मसाल्यामुळे तेल सुटतं, त्यामुळे लालबुंद तवंग येतो. पण मिसळीवरचा कट वेगळा असतो, त्यासाठी थोडं तेल गरम करायचं त्यात लाल तिखट टाकायचं. ते जळू न देणं ही एक कसोटीच असते. त्यात थोड्या वेळाने पाणी मिसळायचं. गरम तेलात तिखट आणि पाणी घालून कट बनवणं हे एक कौशल्याचंच काम आहे. मग पळीपळीने हा कट मिसळीत वाढला जातो. छोट्या बटाटेवड्यांवर हा कट घातला की झाला कट वडा.
विशेष म्हणजे, कोल्हापुरी माणूस जेवणासाठी घराबाहेर पडला की, मटणच खाणारच. चिकन, मासे तुलनेने कमी पण बकरं म्हटलं की कोल्हापुरचा गडी खूश. तरीही मिसळ आणि कट वडा खाण्यासाठी सकाळी रांगाही लावणार. मिसळ म्हटलं की मटकी किंवा पांढऱ्या वाटण्याची पातळ भाजी, त्यावर फरसाण आणि त्यावर कांदा असा साधारण समज झालाय. पण कोल्हापुरी मिसळ वेगळी असते. मटकीची मीठ, हळद घालून उकडून भाजी बनवायची. उकडलेल्या बटाट्यांची भाजी बनवायची. कट बनववायचा. पोहे बनवून घ्यायचे. वाढताना खाली बटाट्याची भाजी वर मटकीची उसळ, त्यावर पोहे मग त्यावर कट आणि मग त्यावर थोडी जाड शेव घालायची (फरसाण नाही) त्यानंतर कांदा-कोथंबीर. अशी मिसळ घरी बनवताना मटकीची उसळही वाटल्या मसल्यात बनवतात. अशाप्रकारे तयार झालेली मिसळ खाल्ल्यावर अन्य मिसळी तुच्छ वाटू लागतात.
कोल्हापुरी जेवण म्हटलं की तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असणारच. पण सुकं हा प्रकारही असतो. तो अनेकांना माहिती नसतो. मटण आणलं की, ते आलं-लसूण, हळद, कोथंबीर घालून उकडून घ्यायचं. उकडलेल्या मटणापैकी निम्मं मटण हे कांदा, ओला मसाला परतून फारसं पाणी न घालता शिजवायचं. त्याला सुक्कं म्हणतात, तर भरपूर तवंग आलेल्या रश्शाचं निम्मं मटण करायचं. त्याला तांबडा रस्सा म्हणतात. तर फक्त मटणाचा स्टॉक वापरून पांढरा रस्सा बनवतात. खसखस आणि काजूची पेस्ट घालून बनवल्याने त्याला पांढरा रंग येतो.
-अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
कोरा लिंक-http://bit.ly/3eUYb44
0

पंगत ही पारंपरिक भारतीय पद्धतीत जेवणासाठी लोकांना एका ओळीत बसण्याची व्यवस्था आहे.

पंगत खालील कारणांसाठी मांडली जाते:

  • सण आणि उत्सव: दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी यांसारख्या सणांमध्ये आणि लग्नसमारंभात पंगत मांडली जाते.
  • धार्मिक कार्यक्रम: धार्मिक कार्यक्रमांमध्ये, उदाहरणार्थ सत्यनारायण पूजा किंवा भागवत कथा, पंगत आयोजित केली जाते.
  • सामाजिक कार्यक्रम: गावांतील यात्रा, जत्रा किंवा इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये सामुदायिक भोजनासाठी पंगत बसते.
  • मृत्यूविधी: काही ठिकाणी, मृत्यूविधीनंतर लोकांसाठी पंगत आयोजित केली जाते.

पंगतीत लोकांना जमिनीवर एका ओळीत बसवले जाते आणि त्यांना पारंपरिक पद्धतीने जेवण वाढले जाते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980
0

केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. याचे काही महत्त्वाचे सांस्कृतिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणात्मक फायदे आहेत:

1. सांस्कृतिक महत्त्व:
  • परंपरा: भारतीय संस्कृतीत केळीच्या पानाला शुद्ध आणि पवित्र मानले जाते. त्यामुळे धार्मिक कार्ये आणि विशेषतः जेवणावेळी याचा वापर केला जातो.

  • आदर: पाहुण्यांना आदरपूर्वक जेवण देण्यासाठी केळीच्या पानाचा उपयोग केला जातो.

2. आरोग्यदायी फायदे:
  • अँटीऑक्सिडंट्स: केळीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात. पानावर गरम अन्न वाढल्याने हे अँटीऑक्सिडंट्स अन्नात मिसळतात आणि ते आपल्या शरीरात जातात.

  • स्वच्छता: केळीचे पान वापरण्यापूर्वी धुवून स्वच्छ केले जाते, त्यामुळे ते अधिक स्वच्छ आणि सुरक्षित मानले जाते.

  • जंतुनाशक: केळीच्या पानात जंतुनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.

3. पर्यावरणात्मक फायदे:
  • नैसर्गिक: केळीचे पान नैसर्गिकरित्या उपलब्ध होते आणि ते पर्यावरणाला हानिकारक नाही.

  • biodegradable: हे पान वापरल्यानंतर लवकर कुजते, त्यामुळे कचरा कमी होतो आणि पर्यावरणाचे रक्षण होते.

  • रसायनांचा वापर नाही: प्लेट्स बनवण्यासाठी ज्या रसायनांचा वापर होतो, तो केळीच्या पानात टाळला जातो.

त्यामुळे, केळीच्या पानावर जेवण करणे हे केवळ एक पद्धत नाही, तर ती एक आरोग्यदायी, पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980