Topic icon

महिला आरोग्य

0
नाही, लघवी आणि योनी एकच नाहीत. त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
योनी:
  • योनी ही महिलांच्या जननेंद्रियाचा भाग आहे.
  • हे एक स्नायूंचे नलिका आहे जे गर्भाशयाला (uterus) बाह्य जननेंद्रियाशी जोडते.
  • योनीचा उपयोग लैंगिक संबंध आणि बाळ जन्माला घालण्यासाठी होतो.
मूत्रमार्ग:
  • मूत्रमार्ग ही एक नलिका आहे जी मूत्राशयाला (urinary bladder) शरीराच्या बाहेर जोडते.
  • मूत्रमार्गाद्वारे लघवी शरीराबाहेर टाकली जाते.
  • स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्येही मूत्रमार्ग असतो.
स्त्रियांमध्ये, मूत्रमार्ग योनीच्या वरच्या बाजूला असतो. त्यामुळे लघवी आणि योनी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
अधिक माहितीसाठी हे उपयुक्त स्रोत पहा:
Planned Parenthood
WebMD
उत्तर लिहिले · 21/6/2025
कर्म · 1780
4
📈गर्भधारणा झाल्यानंतर बाळ होईपर्यंत स्त्रीच्या शरीरात किती तरी बदल होत असतात. पहिला मोठा बदल म्हणजे पाळी येणं थांबतं. कारण जे रक्त पाळीवाटे बाहेर पडत होतं त्या रक्तावर आता गर्भाचं पोषण होत असतं. मग खरं तर बाळ जन्मल्यावर परत पाळी सुरू व्हायला पाहिजे. पण असं लगेच होत नाही. का ते समजून घेऊ या.

आपलं शरीर म्हणजे एक अतिशय जटिल यंत्रणा आहे. शरीरामध्ये एक अत्यंत महत्त्वाची यंत्रणा काम करत असते. तिचं नाव आहे – बायो फीडबॅक. म्हणजे काय तर शरीराला कोणत्या घटकाची, संप्रेरकाची गरज आहे ते मेंदूपर्यंत पोचवण्याची चोख व्यवस्था आपल्या शरीरात असते. मासिक पाळी आणि जननाच्या चक्रामध्ये ही बायो फीडबॅक यंत्रणा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.
बाळ जन्मल्यानंतर पाळीचं चक्र हळू हळू पूर्वपदावर यायला लागतं. पण पाळी लगेच सुरू होत नाही. काही स्त्रियांमध्ये बाळ झाल्यावर तीन ते सहा महिन्यांनी पाळी येते तर काही जणींना दोन वर्षं पाळीच येत नाही. याचा संबंध बाळ अंगावर दूध पितं त्याच्याशी आहे. बाळ जर पूर्णपणे अंगावर दूध पीत असेल तर शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं संप्रेरक तयार होतं ज्यामुळे पाळी चक्रासाठी आणि अंडोत्सर्जन होण्यासाठी आवश्यक इतर संप्रेरकं तयार होत नाहीत. बाळ जर दर दोन तासांनी अंगावर दूध पीत असेल तर मेंदूला निरोप मिळतो की अजून बाळ अंगावर पितंय त्यामुळे इतक्यात पुढच्या गर्भाची तयारी नको! जसजसं बाळ अंगावर कमी प्यायला लागेल तसं जनन चक्र हळू हळू पूर्वपदावर येतं आणि अंडोत्सर्जन होऊन पाळी येते. पाळी येते त्या आधी 12-16 दिवस अंडोत्सर्जन झालेलं असतं.
तरी याबाबत फार काळजी करू नये.