Topic icon

पाण्याची गुणवत्ता

0

टीडीएस (TDS) म्हणजे पाण्यात विरघळलेल्या घन पदार्थांची एकूण मात्रा. हे खालील गोष्टींवर अवलंबून असते:

  • पाण्याचा स्रोत:

    TDS चे प्रमाण नदी, तलाव, विहीर किंवा पुरवठा जल यानुसार बदलते.

  • भूगर्भ रचना:

    ज्या भागातून पाणी येते, तेथील भूगर्भातील खनिजे आणि रासायनिक घटकांनुसार TDS बदलू शकते.

  • प्रदूषण:

    औद्योगिक आणि मानवी क्रियांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे TDS वाढू शकते.

TDS चे प्रमाण खालीलप्रमाणे असते:

  • उत्कृष्ट पाणी: 0-300 ppm
  • चांगले पाणी: 300-600 ppm
  • साधारण पाणी: 600-900 ppm
  • निकृष्ट पाणी: 900-1200 ppm
  • पिण्यास अयोग्य पाणी: 1200 ppm पेक्षा जास्त

TDS मीटर वापरून तुम्ही तुमच्या पाण्याचे TDS तपासू शकता.

अधिक माहितीसाठी:

दैनिक भास्कर लेख

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 3480
6
 तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का…? मग हे नक्की वाचा…  

             *_मिनरल वॉटरच्या नावावर बाजारात या प्लास्टिक बॉटल मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. कुठल्याही हॉटलमध्ये गेलो की वेटर लगेचचं विचारतो, “सर, साधा पानी चलेगा या बिसलरी लाऊ…?” आणि –आपणही हाच विचार करतो की माहित नाही इथलं पाणी कसं असेल, कुठून येत असेल, म्हणून आपण मिनरल वॉटरची बाटली मागवतो. पण – हे पाणी मागवताना, आपण डोळे झाकून विश्वास करतो की, बाटलीतलं पाणी सुरक्षितच असणार! तसं लेबल असतं ना त्यावर…!_*

प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आणि ती बाटली किती वेळा रीयूज करता येऊ शकते.
*लेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतोवर टाळा. कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.आधी हे जाणून घ्या की, हे मिनरल वॉटर म्हणजे नक्की काय. तर मिनरल वॉटर म्हणजेच खनिज पाणी, ज्या पाण्यात काही उपयोगी खनिजे मिळविल्या जाते असं पाणी म्हणजे मिनरल वॉटर. खनिजांच्या उपस्थितीमुळे पाण्याची चव बदलतेच, तसेच त्याचे औषधीय महत्व देखील आहे. मिनरल वॉटर हे एखाद्या नैसर्गिक खनिजयुक्त झरा किंवा पिण्याच्या पाण्याच्या इतर स्रोतांद्वारे मिळवितात. खनिजयुक्त पाण्यात सल्फर आणि इतर साल्ट्स असतात.
मिनरल वॉटर विकणाऱ्या अनेक कंपन्या आपल्या पॅकेजिंगवर एखादा नयनरम्य झरा किंवा तलाव दाखवून ते पाणी तिथून येत असल्याचा भास तयार करतात. पण खरं तर त्या बाटलीतलं पाणी हे आपल्या घरच्या पिण्याच्या पाण्यासारखंच असतं. तुम्ही बाटलीवर स्वतः बघू शकता, सर्वसाधारणपणे एका छोट्याशा मजकुरात ते पाणी कुठ्न आलं हे लिहिलेलं असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक कंपनी ही पाणी स्त्रोत किंवा मुख्य पाणी पुरवठा पॅकेजिंगवर स्पष्ट करण्यास बांधील असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,दुसऱ्याने वापरलेल्या बाटलीने पाणी म्हणजे एखादी अस्वच्छ वस्तू चाटण्या सारखेच किंवा ते त्याहीपेक्षा वाईट असू शकते. कारण पृथ्वीवर जेवढी संख्या माणसांची आहे त्यापेक्षा जास्त जिवाणू एका माणसाच्या तोंडात असतात. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेलय बाटलीतून पाणी पिण्यास टाळावे. तसेच बाटली नेहमी कोमट पाणी, विनेगर किंवा अँटीबॅक्टेरिअल माऊथवॉशने स्वच्छ करावी. बाटली स्वच्छ करतो पण बाटलीचं तोंड आणि झाकण नीट स्वच्छ करत नाही, पण तुम्हाला माहितीये का, अर्ध्याहून जास्त जिवाणू हे त्या बाटलीच्या तोंडावरच असतात.
हे मिनरल वॉटर बनविणाऱ्या कंपन्या लोकांना तसेच युवा पिढीला आपल्या प्रोडक्टकडे आकर्षित करण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट त्यात ऍड करून त्यांची जाहिरात करतात आणि ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे असा दावा देखील करतात. पण, खरं बघता यात एवढी साखर मिसळविली जाते जेवढी सोड्यात असते, त्यामुळे नुसतं जाहीरांतींवर विश्वास ठेऊ नका, लेबल वाचूनच ते विकत घ्या.

0
वॉटर TDS म्हणजे काय?

TDS म्हणजे 'Total Dissolved Solids'. पाण्यात विरघळलेल्या घन पदार्थांचे प्रमाण दर्शवते. हे प्रमाण मिलीग्राम प्रति लिटर (mg/L) किंवा पार्ट्स पर मिलियन (PPM) मध्ये मोजले जाते.

TDS मध्ये काय काय असते?
  • कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियमसारखे क्षार.
  • कार्बोनेट, नायट्रेट, क्लोराईड आणि सल्फेटसारखी आयन.
  • थोडी प्रमाणात ज ऑर्गेनिक पदार्थ.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3480
5
साधारणतः पाणी जेवढे खोल तेवढे जास्त पदार्थ घेत खाली जाते त्यामुळे TDS वाढतो. अर्थात जमिनीतल्या क्षारांच्या प्रमाणावरदेखिल अवलंबून असते. कमी पावसाच्या क्षेत्रात जिथे जमिनीखालील पाणी देखिल अतिशय खोल असते तेथे TDS १०००-२००० देखिल आढळतो. अशा पाण्यात शिसे वगैरे जडधातूदेखिल (heavy metals) आढळतात. अशा पिण्याच्या पाण्यामुळे मेंदुचे रोगदेखिल उद्भवतात.
आता TDS जास्त म्हणजे पाणी कठीण (hard) असेलच असे नव्हे. पाण्याचा कठीणपणा हा त्यातल्या कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या प्रमाणावर ठरतो. पांढरे डाग पडणे, साबणाला कमी फेस येणे हे पाण्याच्या कठीणपणामुळे होते. एवढेच नव्हे तर केस गळणे, त्वचा खरखरीत होणे असे शरीरावर दुष्परीणाम होतात. कठीणपाण्यात धुवून कपडे लवकर खराब होतात. कपड्यांची झळाळी जाते.
💘आता यावर उपाय काय ..
क्लोरिनेशन, ओझोनेशन करुन किंवा UV लाइटमधून पास करून बॅक्टेरिया कमी करता येतात पण TDS कमी होत नाही.
1
केन्ट आरो सिस्टम बसवा, मिनरल वॉटर होईल. खर्च करण्याची तयारी नसल्यास प्रथम पाण्यात तुरटी फिरवा ज्यामुळे गाळ खाली बसेल, मग त्यात जीवन ड्रॉप घाला व 10 लिटर पाण्यात एक लिंबू पिळा, चव नक्की चेंज होईल.
उत्तर लिहिले · 21/7/2018
कर्म · 3580