Topic icon

दत्तकविधान

0
मला तुमच्या प्रश्नाची नोंद आहे, परंतु मला नक्की कशाबद्दल माहिती हवी आहे, हे स्पष्ट होत नाही आहे. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा. "दत्तक पुत्र" म्हणजे नक्की कोणाबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे, हे सांगा.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2200
2
एकदा झालेले वैध दत्तकपत्र रद्द होणार नाही.  वैधपणे केलेले कोणतेही दत्तक पत्र वडील किंवा आई किंवा इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे रद्द केले जाऊ शकत नाही किंवा दत्तक घेतलेले मूल त्यांचा त्याग करून आपल्या जन्माच्या कुटुंबात परत येऊ शकत नाही.
ही हिंदू कायद्यातील तरतूद आहे, जिच्यात बदल होणे शक्य नाही.

जर केलेल्या दत्तक पत्रात काही त्रुटी असतील तर ते दत्तकपत्र दुरुस्त केले जाऊ शकते, या दुरुस्तीच्या वेळी तुम्ही पळवाट शोधू शकता. पण हे सगळे होण्याची शक्यता १ टक्क्याहूनही  कमी आहे. जर दत्तक पत्रात त्रुटी शोधायची असेल तर वकिलाची भेट घ्या, ते तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतील.
उत्तर लिहिले · 4/5/2021
कर्म · 61495
3
हिंदू दत्तकाचा कायदा 1956 मध्ये संसदेने मंजूर केला. या कायद्यातील दिलेल्या तरतुदींच्या आधारेच फक्त दत्तक घेता येईल. या कायद्यातील तरतुदीविरुद्ध दत्तक घेतले गेल्यास सदर दत्तकनामा/ पत्र हे पूर्णपणे बेकायदेशीर व मुळात झालेलेच नव्हते असे कायदा समजेल आणि असे झालेले दत्तक पत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे कोणतेही हक्क हिरावून घेऊ शकणार नाही.
*हिंदू पुरुषांची दत्तक घेण्यासाठी पात्रता*
कोणताही मानसिक दृष्ट्या व सज्ञान व जोमुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्यास पात्र आहे मात्र त्यासाठी त्याला त्याचे पत्नीची संमती आवश्यक मात्र अशी पत्नी हिंदू राहिली नाही किंवा तिने संन्यास घेतल्यास किंवा कोर्टाने वेडी म्हणून जाहीर केल्यास अशा संमतीची गरज पडणार नाही. तसेच एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास सर्वांनी संमती आवश्यक ठरते.
*हिंदू स्त्रीची दत्तक घेण्याबद्दल पात्रता* तंदुरुस्त मनाची व सज्ञान स्त्री.* अविवाहित वा घटस्फोटित वा विधवा.* किंवा जिच्या नवऱ्याने अंतिम संन्यास घेतला आहे.* किंवा जिचा नवरा हिंदू राहिलेला नाही.* किंवा जिचा नवरा कोर्टाने वेडा म्हणून जाहीर केला आहे.फक्त अशाच स्त्रीला मूल दत्तक घेता येईल.
*दत्तक पत्र करून देणाऱ्या व्यक्तीची पात्रता*
(अ) फक्त नैसर्गिक व कायदेशीर मुलाची आई, वडील व पालकासच दत्तक पत्र लिहून देता येईल किंवा मुलाला दत्तक म्हणून देण्याचा अधिकार असेल.(ब) फक्त वडिलांना मूल दत्तक धेण्याचा अधिकार असेल, मात्र त्यासाठी आईची संमती आवश्यक; मात्र अशी आई जिने कायमचा संन्यास घेतला आहे किंवा जी हिंदू राहिलेली नाही किंवा जिला कोर्टाने वेडे म्हणून जाहीर केले आहे. तिचे संमतीची गरज नाही.(क) मात्र वडील जिवंत असताना आई मुलाला दत्तक देऊ शकत नाही किंवा वडिलांनी कायमचा संन्यास घेतला असल्यास वा कोर्टाने वडिलांना वेडे म्हणून जाहीर केले असल्यास किंवा ते हिंदू न राहिल्यास आई मुलाला दत्तक म्हणून देऊ शकते.(ड) मात्र दोघेही नैसर्गिक आई-वडील मृत्यू पावल्यास किंवा दोघांनीही कायमचा संन्यास घेतल्यास किंवा दोघेही हिंदू न राहिल्यास किंवा दोघांनाही मुलाला कायमचे सोडल्यास किंवा दोघांनाही कोर्टाने वेडे म्हणून जाहीर केल्यास किंवा ज्या मुलाचे आई-वडील कोण हे माहिती नसल्यास अशा मुलास त्याचे कायदेशीर पालक दत्तक म्हणून देऊ शकतात. मात्र त्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने कोर्टाची परवानगी आवश्यक ठरते; मात्र अशी परवानगी देताना कोर्ट फक्त मुलाच्या भविष्याचा वा कल्याणाचाच विचार करेल व पालकाने याकामी दत्तक मुलासाठी कोणताही मोबदला स्वीकारला नाही याची खातरजमा करेल.
*कोणती व्यक्ती दत्तक म्हणून जाऊ शकते?*
(अ) फक्त हिंदू व्यक्ती.(ब) जी व्यक्ती पूर्वी दत्तक गेलेली नाही.(क) अविवाहित मात्र तशी रूढी, परंपरा सदर जाती/जमातीत असल्यास चालू शकते.(ड) 15 वर्षांचे आतील मूल मात्र तशी रूढी परंपरा सदर जाती जमातीतील असल्यास 15 वर्षांवरील चालू शकते.
*कायदेशीर दत्तकासाठी इतर तरतुदी*
- जर मुलाला दत्तक घेतल्यास दत्तक घेणाऱ्या आई किंवा वडिलास स्वतःचा वा दत्तकाचा मुलगा, नातू किंवा पणतू नसावा.- जर मुलीला दत्तक घ्यावयाचे असल्यास दत्तक घेणाऱ्या आई-वडिलास स्वतःची व दत्तकाची मुलगी किंवा नात नसावी.- जर स्त्रीने मुलाला दत्तक घ्यावयाचे असेल तर स्त्रीचे (दत्तक आईचे) वय मुलापेक्षा कमीत कमी 21 वर्षांनी जास्त हवे.- जर पुरुषांनी मुलीला दत्त घ्यावयाचे असेल तर दत्तक मुलीपेक्षा पुरुषाचे (दत्तक वडिलांचे) वय कमीत कमी 21 वर्षांनी जास्त हवे.- एकच मूल दोन पेक्षा वेगळ्या व्यक्तींना दत्तक घेता येत नाही. थोडक्यात, आई-वडील या व्यतिरिक्त नाते असलेल्या दोन व्यक्तींना एक मूल दत्तक घेता येत नाही.- दत्तक जाणारे मुलांचे हस्तांतरण जन्मदात्या आई-वडिलांनी वा व्यक्तीने प्रत्यक्षात करणे आवश्यक ठरते.
*दत्तकाचे परिणाम*
- दत्तक मूल, दत्तक घेणाऱ्या दत्तक आई-वडिलांचे दत्तक घेतल्यापासून कायदेशीर दत्तक मूल सर्व हक्कांस हित पकडले जाईल.-  दत्तक म्हणून गेल्यानंतरसुद्धा दत्तक जाण्यापूर्वीचे हिश्श्याचे मिळकतीचे हक्क त्यावरील बोजासहित शाबूत राहतात. अशा वेळी जन्मदात्याचे/नातेवाइकाचे जबाबदारीही त्यास कायद्याने सांभाळावी लागते.-
*_💖 माहिती  सेवा ग्रूप पेठवड़गाव  💖_*
दत्तक गेल्याने दत्तक कुटुंबातील हक्क मिळत असले तरी इतर मुलांचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही.- मूल दत्तक घेतल्यानंतर सुद्धा दत्तक आई-वडिलांचे त्यांची व त्यांचे हिश्श्याची मालमत्ता ते विकू शकतात किंवा मृत्युपत्र करू शकतात.- पत्नीने मुलास दत्तक घेतल्यास तो दत्तक माता ठरते. मात्र एका पेक्षा जास्त पत्नींचे संमतीने मुलास दत्तक घेतल्यास सर्वांत वरिष्ठ माता दत्तक माता ठरते.- विधुर किंवा अविवाहित पुरुषाने मूल दत्तक घेतल्यानंतर विवाह केल्यास त्याची पत्नी मुलाची सावत्र आई होते.- विधवेने किंवा अविवाहित स्त्रीने मूल दत्तक घेतल्यानंतर विवाह केल्यास तिचा पती मुलाचा सावत्र वडील ठरतो.- एकदा मूल दत्तक गेल्यावर दत्तकपत्र कोणासही रद्द करता येत नाही.- नोंदणीकृत दत्तकपत्राने केलेला दस्तकोर्ट ग्राह्य पुरावा धरते.दत्तकनाम्यास आर्थिक व्यवहारावर बंदीदत्तक मुलाच्या बदल्यात कुणालाही मोबदला स्वीकारता येणार नाही किंवा स्वीकारण्याचा करार करता येणार नाही. तसे आढळल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास वा दंड वा दोन्हीही शिक्षेस पात्र राहील. मात्र शासनाचे पूर्वपरवानगी शिवाय शिक्षेची अंमलबजावणी करता येणार नाही. दत्तकनामा व दत्तक विधी हे पवित्रतम मानले जाते. यात व्यवहाराचा भाग नसून भावनेचा संदर्भ असतो. मात्र अनिष्ट प्रवृत्तींनी याचा वृथा लाभ घेऊ नये म्हणून कायद्याचे सोपस्कार पाळणे आवश्यक.
वैध दत्तक पत्र कोण करू शकतो?-
जी व्यक्ती मूल दत्तक घेण्यास सक्षम असते व तसे अधिकार असतात.- जी व्यक्ती दत्तक देते तिला सदर कायदेशीर अधिकार असतात.- जी व्यक्ती दत्तक जाते ती दत्तकास पात्र हवी.- इतर कायदेशीर तरतुदींचे पालन होणे अनिवार्य.
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖 *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*✆ ░9░8░9░0░8░7░5░4░9░8░*
*_'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''_*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=340093689721894&id=100011637976439
0
तुम्ही तुमच्या लहान भावाची मुलगी दत्तक घेतली आहे, ही चांगली गोष्ट आहे. भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी खालील कागदपत्रे तयार करणे आवश्यक आहे:

1. दत्तक विधान पत्र (Adoption Deed):

  • दत्तक विधान पत्र हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे पत्र नोटरी (Notary) करून घेणे आवश्यक आहे.
  • यामध्ये दत्तक देणारे (तुमचा भाऊ आणि त्याची पत्नी) आणि दत्तक घेणारे (तुम्ही आणि तुमच्या पत्नी) यांची संपूर्ण माहिती, तसेच दत्तक घेण्याचा आणि देण्याचा हेतू स्पष्टपणे नमूद केला पाहिजे.
  • दत्तक घेण्या-देण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण तसेच दोन साक्षीदारांची नावे आणि सही असणे आवश्यक आहे.
  • 2. कोर्टाचा आदेश (Court Order):

  • high कोर्टात दत्तक घेण्यासाठी अर्ज करा. कोर्ट तुम्हाला मुलगी दत्तक घेण्यास परवानगी देईल.
  • 3. जन्म दाखला (Birth Certificate):

  • मुलीचा जन्म दाखला आवश्यक आहे.
  • दत्तक घेतल्यानंतर, महानगरपालिकेकडे (Municipal Corporation) अर्ज करून तुमच्या नावाचा जन्म दाखला मिळवा.
  • 4. आधार कार्ड (Aadhar Card):

  • मुलीच्या आधार कार्डवर तुमच्या नावाचा पत्ता अपडेट करा.
  • 5. शाळा प्रवेश (School Admission):

  • शाळेत प्रवेश घेताना, तुम्ही मुलीचे कायदेशीर पालक आहात हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करा.
  • 6. इतर कागदपत्रे:

  • तुम्ही ज्या ठिकाणी राहता, त्या ठिकाणचा पत्ता पुरावा (Address Proof) द्या.
  • तुमचे ओळखपत्र (Identity Proof) जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, Voter ID कार्ड इत्यादी.
  • तुमच्या भावाचे संमती पत्र (Consent Letter).
  • टीप:

  • तुम्ही कोणत्याही वकिलाचा सल्ला घेऊन ह्या कागदपत्रांची पूर्तता करू शकता.
  • हे सर्व कागदपत्रे कायदेशीर पूर्तता करण्यासाठी आवश्यक आहेत आणि भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मदत करतील.
  • उत्तर लिहिले · 20/3/2025
    कर्म · 2200
    4
    हे बघा मुलीचे आडनाव बदलायचा आणि तुम्ही सांगितलेल्या कहाणीचा काही संबंध नाही.
    लग्न झालं म्हणजे तुमच्याकडे लग्नाचे प्रमाणपत्र असायला पाहिजे, नसेल तर ग्रामपंचायत मध्ये जाऊन काढून घ्या.
    लग्न प्रमाणपत्र हा पुरावा देऊन शिधा पत्रिकेवर तुमच्या बायकोचे आडनाव बदलून घ्या. व शिधा पत्रिका दाखवून नंतर आधार, मतदान, इत्यादी कागदपत्रे बदलून घ्या. आणि मामाला समजून सांगा व भांडण मिटवून घ्या...
    उत्तर लिहिले · 16/4/2019
    कर्म · 61495