
गतिरोध
3
Answer link
बस इलेक्ट्रिक चालणारी असो किंवा डिझेलवर चालणारी, मळमळ, उलटी होण्याचा आणि बसच्या प्रकाराचा काही संबंध नाही.
चालू वाहनात मळमळ, उलटी होण्याचे कारण हे वैज्ञानिक आहे. ज्यात आपले शरीर एका जागेवर स्थिर असूनही आपण प्रचंड वेगाने पुढे जात असतो. अशा वेळेला मेंदूकडून एक विशिष्ट संप्रेरक पोटात सोडले जाते, ज्याने आपल्याला मळमळ झाल्यासारखे वाटते किंवा काही लोकांना उलटी देखील होते.
म्हणूनच ज्या लोकांचे मन घट्ट आहे, एकाग्र आहे किंवा आपण फार वेगाने जात आहोत अशी भीती ज्यांच्या मनात नसते, अशा लोकांना बसमध्ये काही त्रास होत नाही.
7
Answer link
मला देखील बरेच दिवस बस मध्ये प्रवास करताना मळमळ आणि उलटी होत असे.कालांतराने मात्र हा त्रास कमी झाला. मी कुठलेही औषध घेतले नाही.
या त्रासाला शास्त्रीय भाषेत Motion Sickness(हालचालीसंबंधी आजारपण) म्हणतात. याचे कारण असे कि, गाडीत बसल्यावर डोळे आणि कान मेंदूकडे वेगवेगळे आणि विरोधी संकेत पाठवतात. जसे कि कान म्हणतात तुम्ही एकाच जागेवर आहात. डोळे मात्र म्हणतात कि तुम्ही फार जोरात धावत आहात.
या विरोधाभासी संकेतांमुळे मेंदू एक प्रकारचे विषारी द्रव(Neurotoxin) शरीरात सोडतो. आणि कुठलाही विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकायचा नैसर्गिक मार्ग म्हणजे उलटी करणे होय. त्यामुळे आपल्याला मळमळ होऊन उलटी होते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही गाडीत बसाल तेव्हा मानसिकता प्रसन्न ठेवा. मोठा श्वास घेत चला. घाबरून जाऊन प्रवास करू नका. हळू हळू तुमचा त्रास कमी होईल.
