Topic icon

क्षेत्रमापन

0

76 आर म्हणजे 0.76 हेक्टर (Hectare) आणि ते अंदाजे 1.87 एकर (Acre) असते.

हे रूपांतरण खालीलप्रमाणे केले जाते:

  • 1 आर = 0.01 हेक्टर
  • 1 हेक्टर = 2.471 एकर

त्यामुळे, 76 आर = 76 * 0.01 हेक्टर = 0.76 हेक्टर

आणि, 0.76 हेक्टर = 0.76 * 2.471 एकर = 1.87 एकर

हे रूपांतरण तुम्हाला जमिनीच्या क्षेत्राची गणना (Calculation) करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1080
6
१ हेक्टर = १०० आर (गुंठे ) /  2.५ एकर 
१ एकर  = ४० आर (गुंठे )
1 आर म्हणजे किती ?
1 आर म्हणजे 100 चौ मी
1 मी x 1 मी = 1 चौ मी
जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो
उदा - 10 मी x 10 मी ची जमीन
यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि
त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर
मध्ये काढून त्यास 100 ने भागले जाते.
आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ?
जेवढे चौरस मीटर मधील क्षेत्रफळ असेल त्यास 100 ने भागायचे
आर = चौरस मीटर / 100 
आर चे गुंठ्या मध्ये कसे रुपांतर करायचे ?
1 आर म्हणजे 100 चौ मीटर
जर आपण याचे चौरस फुटामध्ये रुपांतर केले तर आपल्याला 1076. 39 चौ फुट मिळतात .
1 गुंठा हा 1089 चौरस फुटाचा असतो
म्हणूण आर चे गुंठ्या मध्ये रुपांतर करण्यासाठी
 जेवढे आर असतील त्याला 1076.39 ने गुणायचे आणि 1089 ने भागायच.
आपल्याला आर मध्ये मोजमाप मिळेल.
गुंठा = आर x 1076.39 / 1089
जर आपल्याला एकर मध्ये पाहिजे असेल तर
 आर चे गुंठ्यात रुपांतर करून 40 ने भागायचे कारण 40 गुंठ्याचा एक एकर असतो.
चौरस मीटर = आर x 100
चौरस फुट = आर x 1076.39
गुंठा = आर x 1076.39 / 1089
एकर = आर x 1076.39 / 1089 / 40
1 गुंठा = 1089 चौ फुट
1 आर =1076.39 चौ फुट
1 एकर = 40 गुंठे 

८४आर म्हणजे 2 एकर ४ गुंठे म्हणजे ०.८४ हेक्टर अस लिहतात.


उत्तर लिहिले · 13/2/2022
कर्म · 11785
5
बघा,

1 गुंठा म्हणजे 1,089 square foot


म्हणजे

3 गुंठे म्हणजे

3×1089 = 3267 square foot

याठिकाणी आपण गुंठ्याचे रूपांतर foot मध्ये करत नाही. गुंठा हा चौरस असल्याकारणाने foot सुद्धा चौरस असायला पाहिजे. म्हणजे square foot मध्ये असायला पाहिजे. हे योग्य आहे.
उत्तर लिहिले · 14/10/2021
कर्म · 44255
0
एक गुंठा म्हणजे १०८९ वर्ग फूट. म्हणजे अंदाजे ३३ फूट रुंद आणि ३३ फूट लांब जागा.
उत्तर लिहिले · 25/9/2022
कर्म · 283280
0

क्षेत्र मोजण्यासाठी विविध पद्धती आणि एकके वापरली जातात, हे क्षेत्र कोणत्या आकाराचे आहे आणि ते कोणत्या संदर्भात मोजायचे आहे यावर अवलंबून असते. येथे काही सामान्य पद्धती आणि एकके दिली आहेत:

क्षेत्र मोजण्याच्या पद्धती:

  1. आयताकार किंवा चौरसाकार क्षेत्र:

    क्षेत्र = लांबी * रुंदी

  2. त्रिकोणीय क्षेत्र:

    क्षेत्र = 1/2 * पाया * उंची

  3. वर्तुळाकार क्षेत्र:

    क्षेत्र = π * r^2 (π = 3.14 आणि r म्हणजे त्रिज्या)

  4. अनियमित आकाराचे क्षेत्र:

    अनियमित आकाराचे क्षेत्र मोजण्यासाठी, त्या आकाराला लहान नियमित आकारात विभाजित केले जाते आणि त्या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ मोजून त्यांची बेरीज केली जाते.

  5. तंत्रज्ञानाचा वापर:

    आजकाल, जीपीएस (GPS) आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीचे क्षेत्र अचूकपणे मोजता येते.

क्षेत्राची एकके:

  • चौरस मीटर (Square meter): हे क्षेत्रफळ मोजण्याचे आंतरराष्ट्रीय SI एकक आहे.

  • चौरस फूट (Square foot): हे युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडममध्ये वापरले जाते.

  • एकर (Acre): हे विशेषतः जमीन मोजणीसाठी वापरले जाते (1 एकर = 43,560 चौरस फूट).

  • हेक्टर (Hectare): हेक्टर हेMetric पद्धतीत वापरले जाणारे एकक आहे (1 हेक्टर = 10,000 चौरस मीटर).

  • गुंठा: हे विशेषतः महाराष्ट्र आणि भारतातील काही भागांमध्ये जमीन मोजणीसाठी वापरले जाते.

तुम्हाला विशिष्ट क्षेत्राबद्दल माहिती हवी असल्यास, कृपया तपशील द्या.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080
0
100 गुंठे म्हणजे एक एकर.
उत्तर लिहिले · 1/4/2021
कर्म · 210
1
  • 3.10 आर म्हणजे 0.0766027 एकर.

(1 आर –> 0.0247105 एकर )
उत्तर लिहिले · 29/10/2020
कर्म · 10040