Topic icon

पुरुष आरोग्य

0

पुरुषांच्या नसबंदीला 'पुरुष नसबंदी' किंवा 'व्हॅसेक्टॉमी' (Vasectomy) म्हणतात. या शस्त्रक्रियेमध्ये शुक्राणू वाहून नेणाऱ्या नलिका (vas deferens) कापल्या किंवा बांधल्या जातात, ज्यामुळे वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या शून्य होते.

'सक्रिय नसबंदी' हा शब्दप्रयोग सामान्यतः वापरला जात नाही. त्यामुळे पुरुषांच्या नसबंदीला सक्रिय नसबंदी म्हणणे योग्य नाही.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220
8
वाढत्या वयात प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होतेच व त्याचा बहुतेक वृद्धांना त्रासही होतो. पण म्हणून त्यावर इलाज करून घेण्याची गरज नाही, असा मोठा गैरसमज जनमानसात आहे. शरीरात कोठेही, कसलाही त्रास असेल तर तो वैद्यकीय मदतीने दूर केलाच पाहिजे. अन्यथा, आजार बळावण्याची शक्‍यता असते. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झालेली असेल, तर त्यावरही इलाज केलाच पाहिजे.

तरुण वयात प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीचा त्रास होऊ लागला तर वैद्यकीय मदत घेतली जाते.मात्र वाढत्या वयात असा त्रास झाला तर वैद्यकीय मदत घेण्याचे शक्‍यतो टाळले जाते किंवा विलंबावर टाकले जाते.वाढत्या वयातील प्रोस्टेट ग्रंथीची वाढ हा एका परीने आजार नाही.वाढत्या वयात घडून येणारा तो एक बदल आहे.अनेक पुरुषांना याचा त्रास होतो.अनेकांना त्रास होतो म्हणजे तो सर्वसामान्यपणे दुर्लक्ष करता येण्याजोगा आहे, असे समजू नये.

त्रास सुरू झाला की त्यावर इलाज हा केलाच पाहिजे.कारण वेळीच इलाज केला नाही, तर आजार बळावण्याची व गुंतागुंत होण्याची शक्‍यता वाढते.पण निदान झाले तर डॉक्‍टर लगेच शस्त्रक्रिया करायला सांगतील या भीतीने अनेक जण युरॉलॉजिस्टकडे जाणे टाळतात.मात्र एक वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे, की प्रोस्टेट वाढलेल्या नव्वद टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडत नाही.दररोज घेण्याच्या औषधानेच यातून सुटका होते.फक्त दहा टक्के रुग्णांना विविध कारणांनी औषधांमुळे काही गुण येत नाही.अशांनाच शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते.

प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होण्याची किंवा लघवीसंबंधी त्रास होण्याची कारणे थोडी विस्ताराने पाहू.लघवी अडखळत होणे, लघवी पूर्ण झाल्याचे समाधान न होणे असा अनुभव येतो आणि लघवी इतकी घाईची लागते, की त्यावर नियंत्रण न राहता कपडे ओले होतात, असाही अनुभव येतो.लघवी जास्त व्हावी या हेतूने वापरलेल्या (डाययुरेटिक) औषधांनी अचानक कपडे ओले झाल्यासारख्या तक्रारी वाढतात.काही औषधे आपल्या अनैच्छिक मज्जासंस्थेवर काम करण्याकरिता वापरतात.सहसा ॲसिडिटी कमी करण्याकरिता, दमा ताब्यात येण्याकरिता दिलेली औषधे, पोटात दुखू नये किंवा कळ थांबावी याकरिता दिलेल्या औषधांमुळे मूत्राशयाच्या स्नायूंचे आकुंचन मंदावते.या औषधांना अँटिकोलेनर्जिक औषधे म्हणतात.या औषधांच्या वापराने प्रॉस्टेट ग्रंथी वाढण्याने होणारे त्रास वाढतात.सर्दीवर वापरण्यात येणाऱ्या बऱ्याच औषधात सूडोएफिड्रिन नावाचे द्रव्य असते.या द्रव्यामुळे लघवी सुटण्यास अडथळा येऊ लागतो.म्हणून लघवीसंबंधींचा त्रास नेमका कशामुळे होत आहे, हे आधी पाहायला हवे आणि हे मूत्रविकारतज्ज्ञच नेमकेपणाने सांगू शकतो.मूत्राशयात लघवी थोडीफार साचत राहण्याने लघवीत जीवाणू वाढू लागतात.रुग्णाला वारंवार लघवीत जीवाणूजन्य दाह होऊ लागतो.मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग वाढत जाऊन प्रोस्टेट ग्रंथीला त्याची लागण होण्याची शक्‍यता अधिक असते.प्रोस्टेट ग्रंथीत जंतुसंसर्ग झाला , तरीही वृषणात संसर्गबाधा पोचू शकते. तरुण वयात योग्य काळजी न घेता ठेवलेल्या मुक्त लैंगिक संबंधांमुळे जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो. मात्र प्रोस्टेटच्या जंतुसंसर्गाचे हेच एकमेव कारण असेल असे नाही. अनेक प्रकारच्या जंतूंचा संसर्ग या ग्रंथीला होऊ शकतो आणि त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मूत्रमार्गाचा दाह होण्यासारख्या काही लक्षणांवरून याचे निदान करता येऊ शकते. पुरुषांतील ‘क्रॉनिक पेल्व्हिक पेन सिन्ड्रोम’चे ९५ टक्के रुग्ण प्रोस्टेटशी संबंधित विकारांनी ग्रस्त असतात, असे अमेरिकेत २०१७ मधील एका पाहणीत दिसून आले. त्यामुळे अशा वेदना हेही निदानाचे साधन होऊ शकते.

एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे, की प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीकडे दुर्लक्ष करता कामा नये. या ग्रंथीच्या वाढीमुळे मूत्रवाहिनीवर दाब येऊन मूत्रवहनात अडथळे निर्माण होतात, त्याचा एक परिणाम म्हणून मूत्राशयात खडे होण्याची शक्‍यता वाढू लागते. प्रॉस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रनलिकेतील रक्तवाहिन्या रुंदावतात, त्या फुटू शकतात व लघवीतून रक्त जाऊ लागते. लघवी बाहेर पडण्याला येणारा अडथळा वाढत जातो. अखेर मूत्रपिंडावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो व मूत्रपिंडाचे कार्य नीट होईनासे होते. अखेर मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात.

लघवी पूर्णतः होत नसल्याने शरीरातून बाहेर टाकावयाची उत्सर्जक द्रव्ये शरीरामध्येच साचून राहतात. त्यामुळे रक्त दूषित होऊ लागते. अशा वेळी युरिमिया हा विकार होण्याचा धोका असतो. म्हणून रक्तात दोष पसरण्यापूर्वीच त्यावर इलाज करण्याची गरज असते.

निदान पद्धती प्रोस्टेट गाठीची वृद्धी झाली किंवा नाही याचे निदान करण्यासाठी दिवसभरात रुग्णाला कशाप्रकारे लघवी होते, याचा एक तक्ता (प्रोस्टेट सिम्टन स्कोअर) केला जातो.वेगवेगळ्या सात प्रश्नांच्या उत्तरांची येथे नोंद घेतली जाते.या तक्‍त्याचे डॉक्‍टर परीक्षण करतात, त्यावरून आजाराचे प्राथमिक निदान तज्ज्ञ डॉक्‍टर लगेच करू शकतात.

पर रेक्‍टल (पी.आर.) तपासणी - मूत्रविकार तज्ज्ञ अथवा शल्य चिकित्सक गुदद्वारात बोट घालून प्रोस्टेटची तपासणी करतात.यात प्रोस्टेटचा वाढलेला आकार, सूज लक्षात येते.बोटाने केलेल्या तपासणीत बी.पी.एच.झालेल्या रुग्णांची प्रोस्टेट गुळगुळीत आणि रबराप्रमाणे लवचिक लागते.

सोनोग्राफी - या तपासणीत रुग्णाचे मूत्राशय पूर्ण भरलेले असताना प्रथम पोटाची सोनोग्राफी केली जाते आणि मूत्राशयात असलेली लघवी मापली जाते. त्यानंतर त्याला मूत्रविसर्जन करायला सांगून पुन्हा मूत्राशयात शिल्लक राहिलेली लघवीचे मोजमाप केले जाते. ग्रंथीच्या आकाराचा, वजनाचा अंदाजही सोनोग्राफीत येतो. प्रोस्टेटच्या आकारमानात झालेली वाढ, मूत्र विसर्जन केल्यावर जास्त प्रमाणात मूत्राशयात शिल्लक राहिलेली लघवी यावरून बीपीएचचे निदान केले जाते. अलीकडे प्रोस्टेटची अधिक माहिती मिळण्यासाठी ट्रान्स रेक्‍टल सोनोग्राफी केली जाते.

प्रयोगशाळेतील चाचण्या - यात बी.पी.एच.चे निदान झाले नाही तरी, बी.पी.एच.मुळे होणाऱ्या त्रासांचे निदान मात्र नक्की होते. लघवीच्या तपासणीत लघवीतील जंतुसंसर्ग, रक्तातील क्रिएटिनिन, युरिया यांची माहिती मिळते. जीएफआर या चाचण्यांमध्ये मूत्रपिंडांच्या कार्यावर प्रकाश पडू शकतो. रक्तातील पीएसए (प्रॉस्टेट स्पेसेफिक अँटिनेन) पातळीचे मापन केल्यामुळे रुग्णाला हा त्रास प्रोस्टेटच्या कर्करोगामुळे असू शकेल का, याचा अंदाज येतो. कर्करोग नसणाऱ्या व्यक्तीत ते ०.२ ते ४ एवढे असते. ४ ते १० प्रमाण असल्यास कर्करोगाची थोडी शक्‍यता असते. १० किंवा जास्त प्रमाण असल्यास कर्करोग असण्याची शक्‍यता अधिक बळावते.

इतर तपासण्या - युरोफ्लोमेट्री या तपासणीमध्ये लघवीच्या धारेतील तीव्रता मोजली जाते. सिस्टोस्कोपी आणि युरेथ्रोग्रामसारख्या विशिष्ट तपासण्या केल्यास मूत्राशयातील आणि मूत्रसंस्थेतील इतर त्रास कळू शकतात. मूत्राशयाचे शैथिल्य, अधिक संवेदनक्षम होणे असे मूत्राशयाचे विकार (विशेषत्न: ओव्हर अक्‍टिव्ह ब्लॅडर) सिस्टोमेट्री या तपासणीत समजतात.

विविध उपचार पद्धती

वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे सध्या विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांच्या आजाराची स्थिती लक्षात घेऊन या उपचार पद्धतींचा अवलंब करता येऊ शकतो. औषधोपचार सुरू असताना मूत्रविकार तज्ज्ञाकडून नियमित तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. गरजेनुसार शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय असू शकतो.

औषधोपचार - एकेकाळी प्रोस्टेटच्या त्रासावर शस्त्रक्रिया हा एकच इलाज समजला जायचा. मात्र बी.पी.एच.मुळे जर लघवीला खूपदा आणि वारंवार होण्याचा त्रास होत नसेल आणि कोणतीही गंभीर गुंतागुंत नसेल, तर काही औषधे घेऊन त्यावर उत्तम प्रकारे नियंत्रण आणता येते. अल्फा ब्लॉकर्स किंवा फिनास्टेराइड, ड्युटास्टेराइड अशा औषधांमुळे मूत्रमार्गातला अडथळा कमी करता येतो. यासाठी प्रथम काही औषधांचा वापर केला जातो. मूत्रमार्गाचे स्नायू शिथिल करण्यासाठी औषधे देऊन रुग्णाच्या तक्रारींवर काय परिणाम होतो, हे पाहिले जाते.

फिनास्टेराईड हा रेणू प्रॉस्टेट ग्रंथीतील अँड्रोजेन (टेस्टास्टेरॉन) संप्रेरकांची पातळी कमी करतो. या रेणूने प्रॉस्टेट ग्रंथीचा आकारच कमी होतो; परंतु या औषधांचा फायदा व्हायला वेळ लागतो. साधारण तीन ते सहा महिने एवढा कालावधी लागू शकतो. मात्र जे पुरुष फिनास्टेराइड घेतात, त्यांना शस्त्रक्रियेची गरज लागण्याची शक्‍यता कमी होते. या औषधांचा एक दुष्परिणामही लक्षात घेतला पाहिजे. टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचा स्राव व परिणाम कमी करण्याकरता हे औषध असल्याने कामेच्छा कमी होणे आणि शिश्नाच्या कर्मी स्थितीत ताठरपणा कमी होणे (erectile dysfunctions) असे नको असणारे परिणाम होणे संभवते. ज्यांचे यकृत खराब अथवा अशक्त असते, त्यांनीही हे औषध घेणे टाळावे.

आल्फा ब्लॉकर्स नावाचे अनेक रेणू (प्रॅझोसिन, टेराझोसीन डॉक्‍साझोसीन, टॅमस्युलोसिन, ॲफ्लूझोसिन, सिलोडोसिन) बाजारात उपलब्ध आहेत.या रेणूंच्या परिणामामुळे मूत्रमार्गाचे स्नायू सैल होतात.वाढलेल्या प्रॉस्टेट ग्रंथीमुळे लागणारी घाई किंवा लघवी रोखण्यावरचा ताबा सुटणे अशा तक्रारी या औषधांच्या वापराने कमी होतात.या रेणूंमुळे पहिल्या डोसनंतर अकस्मात रक्तदाब कमी होण्याची शक्‍यता असते.आल्फा ब्लॉकर्स घेणाऱ्या सत्तर टक्के पुरुषांना थोड्या दिवसांत किंवा काही आठवड्यांतच आराम पडू लागतो;परंतु या पुरुषांत थकवा जाणवण्याचे प्रमाण जास्त असते.अशा औषधांचा वापर करणाऱ्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्‍टारांच्या नजरेखालीच औषधे घ्यावीत.

प्रॉस्टेटायटिस (Prostatits) हा प्रॉस्टेट ग्रंथीचा जीवाणूजन्य दाह असतो.अनेकदा तो लैंगिक संबंधातून पुरुषाला होऊ शकतो.लघवीच्या तपासणीत जीवाणूचा संसर्ग झाल्याचे दिसते.डॉक्‍टरांनी केलेल्या ’रेक्‍टल एक्‍झामिनेशन’मध्ये प्रॉस्टेट ग्रंथीवर हलकासा दाब दिल्यावर रुग्णाला वेदना होतात व लघवीच्या वाटेने स्राव बाहेर पडतो.योग्य प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्‍स) वापर केल्याने आजार बरा होऊ शकतो.

कोणतीही औषधे पूर्णतः वैद्यकीय तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली व नियंत्रणाखालीच घ्यावीत.कित्येकदा थोडे बरे वाटले, की औषध घेण्याची गरज नाही, असे रुग्णच ठरवतो.पण त्याचा दोष पूर्णतः दूर झालेला नसतो.त्यामुळे परस्पर औषधे घेऊही नयेत किंवा डॉक्‍टरांनी सुचवल्याशिवाय बंदही करू नयेत.औषध कोणते, किती प्रमाणात व कधीपर्यंत घ्यायचे हे डॉक्‍टरांना ठरवू द्या.

औषधांनी सुधारणा नसेल तर...?
ज्या रुग्णांना योग्य औषधे देऊनही त्यांच्या लक्षणात सुधारणा होत नाही, त्यांना विशिष्ट उपचारांची गरज भासते.काही लक्षणे याबाबत महत्त्वाची ठरतात.यामध्ये
    ज्यांना प्रयत्न करूनही बराच काळ लघवी करता येत नाही.
    ज्यांना कॅंथेटरच्याच मदतीनेच लघवी होते.
    ज्यांना वारंवार लघवीत जंतुसंसर्ग होतो.
    ज्यांना लघवीतून रक्त जाण्याचा त्रास होतो.
    लघवी केल्यानंतरही ज्यांच्या मूत्राशयात खूप प्रमाणात लघवी शिल्लक राहते.

मूत्राशयात जास्त प्रमाणात लघवी साठल्याने ज्यांच्या मूत्रपिंडाचा आणि मूत्रनलिकेचा आकार फुगून वाढतो.

लघवी साठल्यामुळे ज्यांना मूतखडे होत राहतात
अशांना टीयूआरपी, पोटाची शस्त्रक्रिया किंवा इतर विशिष्ट पद्धतीच्या उपचारांची गरज भासते.

टीयूआरपी (ट्रान्स युरेथ्रल रिसेक्‍शन ऑफ प्रोस्टेट) - वाढलेल्या पूरःस्थ ग्रंथीमुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होत असल्यास तो दूर करण्यासाठी मूत्रमार्गावर उच्छेदन (टीयूआरपी) ही शस्त्रक्रिया करतात.यासाठी एक दुर्बीण शिश्नाद्वारे मूत्रमार्गात सारतात व वाढलेल्या ग्रंथींचे तुकडे कापून मूत्रमार्ग मोकळा केला जातो.बीपीएचच्या उपचारांसाठी ही सर्वांत परिणामकारक आणि सर्वाधिक प्रचलित पद्धत आहे.औषधोपचारांचा विशेष फायदा न होणाऱ्या नव्वद टक्के रुग्णांसाठी हा उपचार वापरला जातो.

या पद्धतीत चिरफाड करणारी शस्त्रक्रिया किंवा शरीरावर कुठलीही जखम नसते.सामान्यपणे रुग्णाला पूर्ण भूल न देता मणक्‍यात इंजेक्‍शन देऊन स्पायनल ॲनेस्थेशियाद्वारे कमरेच्या खालचा भाग बधिर केला जातो.या उपचारात मूत्रनलिकेतून दुर्बीण घालून प्रोस्टेट ग्रंथीचा अडथळा निर्माण करणारा भाग काढला जातो.ही प्रक्रिया दुर्बीण अथवा व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारा दुर्बिणीत पाहून केली जाते. त्यामुळे प्रोस्टेटचा अडथळा निर्माण करणारा भाग काढला जातो. यामुळे रक्तस्राव खूपच कमी होतो.

या शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे तीन ते चार दिवस रुग्णालयात राहावे लागते. या क्रियेत पूर्ण प्रॉस्टेट ग्रंथी काढत नाहीत. काहींना डायलरेशन परत परत करावे लागते. विशेषतः ज्या रुग्णांना स्ट्रिक्‍चरचा त्रास असतो, त्यांना डायलरेशन पुन्हा पुन्हा करण्याची गरज भासू शकते. अशा रुग्णांत मूत्रमार्गात कुरुपासारखा भाग वारंवार वाढतो. हा कुरुपासारखा भाग वाढल्यानंतर तो दुर्बिणीच्या साह्याने काढून टाकला जातो. काही वेळा यासाठी शस्त्रक्रियाही करावी लागते.

शस्त्रक्रिया - जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीची वाढ खूप जास्त प्रमाणात झालेली असते आणि त्याचबरोबर मूत्राशयात मूतखडे वाढलेले असतात तेव्हा शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते.कारण या परिस्थितीत दुर्बिणीच्या मदतीने परिणामकारक उपचार होऊ शकत नाहीत.अशावेळी मूत्रवाहक नलिकेवर येत असणारा दाब शस्त्रक्रियेने दूर केला जातो.या शस्त्रक्रियेत सामान्यपणे जांघेचा भाग आणि मूत्राशयावर चीर घेऊन प्रोस्टेट बाहेर काढली जाते व वाढलेला भाग कापून काढला जातो.

अन्य पद्धती - याशिवाय लेझरद्वारे, औष्णिक पद्धतीद्वारे (थर्मल ॲब्लेशन), मूत्रमार्गात विशेष प्रकारची नळी (स्टेंट) घालून प्रोस्टेटचा इलाज केला जातो.बायपोलर, वॉटर ॲब्लेशन अशाही नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत.शरीराची चिरफाड केली जात नसल्याने रक्तस्राव कमी होतो व सुरक्षितता वाढते हा या पद्धतींचा मोठा फायदा आहे.

प्रतिबंधात्मक उपाय आपल्या आयुर्वेदीय परंपरेमध्ये आहारापासून तणावमुक्तीपर्यंत विविध परिणाम देणारे अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यांच्या साह्याने प्रोस्टेट ग्रंथीसंबंधीचे काही विकार दूर ठेवता येऊ शकतात. - आयुर्वेदातील संकल्पनेनुसार ‘उष्ण’ आहार टाळणे, पचनक्रियेवर विपरीत परिणाम होणार नाही, बद्धकोष्ठता होणार नाही असा आहार ठेवणे, सतत वातानुकूलित वातावरणात बसून न राहणे, आखडून किंवा एकाच स्थितीत बराचकाळबसून न राहणे, योगामध्ये वर्णन केलेल्या अश्विनीमुद्रेचा नित्य अभ्यास करणे, प्राणायामाचा अभ्यास करणे अशा उपायांद्वारे ही व्याधी दूर ठेवता येऊ शकते.

वयाच्या पन्नाशीनंतर आहारात फळे, फळांचा रस, विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा.  धान्यक, गोक्षुर, शतावरी, उशीर, श्वेतचंदन, पंचकोल, अनंतमूळ यांसारख्या औषधांपासून बनवलेली शास्त्रशुद्ध तूप, गुटी-वटी वैद्यांच्या सल्ल्याने घेतल्यास प्रोस्टेटची वाढ कमी होत जाते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. सिंगापूर येथील नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये आणि कैरोमधील नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ड्रग्ज कंट्रोल अँड रिसर्च येथील प्रयोगात गोक्षुर म्हणजे गोखरूचा वापर करण्यात आला होता. उंदरांना गोखरूचा अर्क दिल्यानंतर त्यांच्या टेस्टोस्टेरॉन संप्रेरकात वाढ झाल्याचे आणि रक्तातील अँड्रोजेन्सची पातळी वाढल्याचे आढळले.

मूग, कुळीथ, उडीद, जुने लाल तांदूळ यांपासून बनवलेले वेगवेगळे सूप, यवागू, खजूर, हिरडा, लाह्या अशा प्रकारचा पचण्यास हलका आहार घ्यावा, असे सुचवण्यात आले आहे.

औषधी मात्रेमध्ये नित्य स्नेहपान (औषधीसिद्ध तुपाचे सेवन) घेतल्यास त्या औषधी तुपाने प्रोस्टेटची वाढ कमी होऊ शकते.याशिवाय नित्य चंदनबला लाक्षादी यांसारख्या तेलांचा अभ्यंग, पंचकोलसिद्ध औषधी, बस्ती, उत्तरबस्ती यांसारखे पंचकर्म वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावे, असे आयुर्वेदात सुचवण्यात आले आहे.


स्रोत :- सकाळ वृत्तपत्र 25 नवं 2018, प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, संतोष शेणई.
उत्तर लिहिले · 4/11/2020
कर्म · 0
2
04/10/2020...

( डॉक्टर च्या सल्ल्यानुसार काही गोष्टी केलेल्या बऱ्या)

■ गायनकोमास्टियाची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार - स्त्रीरोगतज्ञतेची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार......



★ गिनेकोमास्टिया मॅन बूब्स म्हणून देखील ओळखले जाते.  पुरुषांमध्ये ही एक समस्या आहे जी बहुतेक रुग्णांना माहिती नसते.  कदाचित हेच कारण आहे की पुढे ते त्यांच्या मित्रांमध्ये विनोद बनतात आणि कधीकधी त्यांना लज्जास्पद सामोरे जावे लागते.  संशोधनात असे दिसून आले आहे की भारतातील जवळजवळ 50% पुरुष या समस्येने ग्रस्त आहेत.  या समस्येचे प्रमाण इतके जास्त होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांना या आजाराबद्दल माहिती नसते.  घरी स्त्रीरोगतत्व उपचार कोणालाही या समस्येबद्दल कोणतीही माहिती किंवा जागरूकता नसते आणि म्हणूनच या आजाराने ग्रस्त रूग्ण त्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतात.


★  ही समस्या टाळण्याचा पहिला टप्पा आहे त्याबद्दल योग्य माहिती.  हा रोग काय आहे, ते कसे घडते, ते का होते, त्याची लक्षणे कोणती आहेत आणि त्यावर उपचार कसे केले जातात.  प्रिस्टाईन केअरच्या या ब्लॉगमध्ये, आज स्त्रीरोगतज्ञ ट्रीटमेंट अॅट होम इन मराठी आपल्याला गिनेकोमास्टियाबद्दल तपशीलवार सांगेल.  हा ब्लॉग पूर्णपणे वाचल्यानंतर आपल्याला कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचारांबद्दल चांगली समज आणि ज्ञान मिळेल.

★ जेव्हा इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्समध्ये असमतोल असतो तेव्हा नर बबच्या ऊती फुगू लागतात.  ज्यामुळे पुरुषांच्या स्तनांचा आकार स्त्रियांच्या स्तनांप्रमाणे वाढू लागतो.  स्त्रीरोगतत्व महिलांच्या स्तनांसारखे नसते परंतु तरीही ते यासारखेच असते आणि बर्‍याच प्रकरणांमध्ये त्याचे आकार देखील असते.  गीनेकोमास्टिया ट्रीटमेंट अॅट होम इन हिंदीमध्ये, तिला स्त्रीरोगतज्ञ म्हणतात.  यामुळे पुरुषाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही गोष्टी प्रभावित होतात. 

★ स्त्रीरोगतज्ञतेने ग्रस्त असलेल्या माणसाला बर्‍याच वेळा पेचचा सामना करावा लागतो.  बहुतेक प्रकरणांमध्ये लोकांना याची जाणीव नसते की आपण या समस्येपासून ग्रस्त आहात.  म्हणून त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले.  परंतु जेव्हा हे एक गंभीर स्वरुपाचे रूप धारण करते आणि यामुळे स्तनांचे आकारमान खूप वाढते, तेव्हा त्यांना समस्या येऊ लागतात.  वेळेवर उपचार करून यातून सुटका करता येते.

★ गिनेकोमास्टियाची कारणे - गिनेकोमास्टिया के करण

★ स्त्रीरोगतज्ज्ञांच्या कारणांवर लक्ष केंद्रित केल्यानंतर, आम्ही या समस्येपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो.  या समस्येची काही विशिष्ट कारणे आहेत जी आपण खाली सांगत आहोत.

★ तज्ञांचा असा विश्वास आहे की औषधांच्या दुष्परिणामांमुळेही ही समस्या उद्भवू शकते.  या व्यतिरिक्त, जे लोक औषधांचे सेवन करतात त्यांना देखील अडचणीत येण्याची शक्यता जास्त असते कारण यामुळे शरीराच्या ऊतींची वाढ खूप वेगवान होते.

★ अल्कोहोलचे सेवन केल्याने गायनकोमास्टिया होण्याची अधिक शक्यता असते.  जर आपल्याला ही समस्या टाळायची असेल तर अल्कोहोलचे सेवन थांबवले पाहिजे.  मद्यपान केल्याने स्त्रीरोगतज्ञांव्यतिरिक्त अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

★  डॉक्टर म्हणतात की मूत्रपिंड किंवा यकृत रोगासारख्या आरोग्याशी संबंधित आजारांमध्येही स्त्रीरोगतत्व होण्याचा धोका वाढतो.  आपण या आजारांनी ग्रस्त असल्यास, नंतर आपण आपल्या डॉक्टरांना भेटावे आणि त्यांची तपासणी करुन उपचार करावेत.

★ पुरुषांच्या स्तनांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे छातीच्या ऊतींचे अत्यधिक विकास होते ज्यामुळे स्तनांचे आकार वाढते.

★ गिनेकोमास्टियाची लक्षणे - गिनेकोमास्टिया के लक्षणे

★ इतर कोणत्याही रोगाप्रमाणेच अशीही काही लक्षणे आहेत जी रुग्ण स्वत: मध्ये अनुभवू शकतात.  या लक्षणांच्या मदतीने आपण किंवा आपल्या डॉक्टरांनी आपण स्त्रीरोगतज्ञेत पीडित आहात की नाही याचे मूल्यांकन करू शकता.  त्याची लक्षणे खालीलप्रमाणेः

● स्तन आकारात वाढ

● स्तनामध्ये ढेकूळ

● छातीभोवती सूज येणे

● काही प्रकरणांमध्ये इंफेचन

● स्तन कोमलता

● स्तनामध्ये सौम्य वेदना

● पुढे झुकणे

● अधूनमधून स्तन स्त्राव

★ जर आपल्याला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर आपण ताबडतोब डॉक्टरांशी बोलावे व त्याविषयी बोलले पाहिजे.  आपली तपासणी केल्यावर, योग्य उपचारांच्या मदतीने ते या समस्येवर कायमचा विजय मिळवू शकतात.

गिनेकोमास्टियासाठी घरगुती उपचार - स्त्रीरोगतज्ञ चा  घरचा इलाज

★ गायनकोमास्टिया ही फार गंभीर समस्या नाही.  म्हणून आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही.  यावर उपचार करण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु काही घरगुती उपचारांच्या मदतीने ते घरी देखील बरे केले जाऊ शकते.  घरी स्त्रीरोगतज्ञ उपचारः ही समस्या जेव्हा पुरुष वयात किंवा वयस्क असतात तेव्हा ही समस्या उद्भवते.  खाली आम्ही आपणास घरगुती उपचारांबद्दल सांगत आहोत ज्याचा उपयोग आपण अगदी कमी वेळात या आजारापासून मुक्त होण्यासाठी करू शकता.

अधिक वाचा: पायलोनिडल सायनस - कारणे, लक्षणे, जोखीम आणि घरगुती उपचार

  ■ रॉक मीठ ही स्त्रीरोगतज्ञतेसाठी एक समस्या आहे - स्त्रीरोगतज्ज्ञांसाठी रॉक मीठ हा एक उत्तम उपचार पर्याय आहे

■  रॉक मीठामध्ये मॅग्नेशियम असते जे शरीराला डिटॉक्सिफाई करते.  आंघोळ करण्याच्या काही मिनिटांपूर्वी पाण्यात खारट मीठ घालून त्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीर पूर्णपणे बिघडते, ज्यामुळे स्त्रीरोग शरीरातील लक्षणे अदृश्य होऊ लागतात आणि आपण या रोगापासून मुक्त होऊ शकता.  घरी स्त्रीरोगतत्व उपचारः परंतु हे लक्षात ठेवा की ज्या लोकांना रक्तदाब किंवा ह्रदयाचा डिसऑर्डर संबंधित समस्या आहेत, त्यांनी सेंधा किंवा ही पद्धत वापरु नये.  कारण असे केल्याने त्यांचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो.

ओमेगा 3 फॅटी idsसिडस् आणि झिंकमुळे स्त्रीरोगतज्ज्ञांची लक्षणे कमी होतात - ओमेगा 3 आणि झिंक हे गायनकोमास्टियाची लक्षणे कमी करतात.

■ ओमेगा 3 फॅटी idsसिडस् आणि जस्त स्त्रीरोगतज्ञतेसाठी खूप फायदेशीर असतात.  हे पुरुष शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढविण्याचे कार्य करते, ज्यामुळे स्त्रीरोगतज्ञतेची लक्षणे कमी होतात आणि ही समस्या स्वतः हळूहळू नष्ट होते.  घरी स्त्रीरोगतत्व उपचार जर आपल्याला या समस्येपासून मुक्त होऊ इच्छित असेल तर आपण आपल्या आहारात माशाचा समावेश केला पाहिजे कारण त्यात ओमेगा 3 फॅटी idsसिडस् भरपूर प्रमाणात आढळतो.

अलसी के तेल से स्त्रीरोगतत्व बरे होऊ शकते - अलसी के तेल से गायनेकोमास्टिया को थेक क्या जा जा सकता है

■ फ्लॅक्ससीडमध्ये काही विशेष औषधी गुणधर्म आहेत जे स्त्रीरोगतज्ज्ञांची लक्षणे कमी करण्यासाठी कार्य करतात.  जर आपण आपल्या समस्येमुळे त्रस्त असाल आणि यामुळे आपल्याला खूप पेच सहन करावा लागला असेल तर आपण फ्लॅक्ससीड घेऊन या समस्येपासून स्वत: ला वाचवू शकता.  घरी स्त्रीरोगतत्व उपचार हे स्त्रीरोगतज्ञतेची लक्षणे अतिशय प्रभावी मार्गाने कमी करते आणि रोगास त्याच्या मुळापासून दूर करते.

पुढील वाचा: फ्लॅक्ससीडचे फायदे आणि तोटे

सोया स्त्रीरोगतत्व काढून टाकते - सोया स्त्रीरोगतज्ञतेच्या उपचारासाठी

★  दुग्धजन्य दुधाऐवजी सोया दूध वापरुन आपण स्त्रीरोगतत्वपासून मुक्त होऊ शकता.  सोयामध्ये काही घटक असतात जे गायनकोमास्टिया बरा करण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉलचे संतुलन साधतात.  घरी स्त्रीरोगतत्व उपचार जर आपण या समस्येने ग्रस्त असाल तर आपण आपल्या आहारात सोयाचा समावेश केला पाहिजे.

★ हळद गीनेकोमास्टिया बरा करते - हळद गिनेकोमास्टिया बरा करते

★ हळद हे आयुर्वेदिक औषध आहे जे खाण्यापिण्यास व चवदार बनविण्यासाठी, अनेक आजार, लक्षणे व अशक्तपणापासून मुक्त होण्यासाठी वापरले जाते.  त्यात असे औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे पुरुष शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण वाढते.  घरी स्त्रीरोगतत्व उपचार ज्यामुळे पुरुष स्त्रीरोगतज्ञांपासून संरक्षित असतात.  स्त्रीरोगतत्व टाळण्यासाठी आणि तो बरे करण्यासाठी हळद हा एक उत्तम घरगुती उपचार आहे.  आपण ते वापरणे आवश्यक आहे.

हेही वाचा: लैंगिक सामर्थ्य वाढविण्याचा उत्तम मार्ग

गोगल्सचा उपयोग स्त्रीरोगतज्ञात फायदेशीर आहे - गुग्गुल का इस्टेमल गायनेकोमास्टिया मी फायेमंद होता है

★ गायनकोमास्टियाच्या समस्येवर मात करण्यासाठी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.  घरी स्त्रीरोगतत्व उपचार ट्रीटमेंटचा वापर पुरुष शरीरात इस्ट्रोजेन संप्रेरक पातळी वाढवते आणि पुरुष संप्रेरक पातळी वाढवते.  काही दिवस नियमितपणे ते वापरल्याने स्त्रीरोगतज्ज्ञांची समस्या संपते.

निष्कर्ष

गायनकोमास्टिया ही एक सामान्य समस्या आहे ज्याबद्दल आपल्याला घाबरून जाण्याची किंवा घाबरू नका.  त्याचे उपचार शक्य आहेत आणि आपण अगदी थोड्या वेळातच या समस्येपासून मुक्त होऊ शकता.  आपल्याला त्याबद्दल प्रथम माहित असावे जेणेकरुन आपण वेळेत तपासणी करुन त्यावर उपचार करू शकाल.  जर आपल्याला त्याची लक्षणे स्वत: ला वाटत असतील तर आपण वर नमूद केलेल्या घरगुती उपचारांच्या मदतीने त्यावर उपचार करू शकता.  जर घरगुती उपचारांचा काही फायदा नसेल तर आपण जवळच्या एखाद्या चांगल्या डॉक्टरांशी बोलावे आणि त्याबद्दल बोलले पाहिजे.

उत्तर लिहिले · 4/10/2020
कर्म · 14865
3
अनियमित लाईफस्टाईलमुळे पुरूषांमध्ये कमजोरी असते. त्यामुळे त्यांना स्पर्म काऊंट वाढवण्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र असे अनेक फूड आहेत ज्याच्या खाण्यामुळे तुमच्या शरीरातील स्पर्म काऊंटमध्ये वाढ होऊ शकते.काही लोकांना लग्नानंतर सुद्धा अद्याप एकही आपत्य नाही , ज्या लोकांना तज्ज्ञांनी शुक्राणूंची कमतरता सांगितली आहे अशा लोकांनी ही माहिती नक्की वाचा.
🔖लसूण :- लसूणच्या वापराने सर्वांनाच आराम मिळतो. घरातील प्रत्येक मोठी व्यक्ती लसूणचा सहभाग अन्नात करण्यात सांगत असते. तसेच लसूण स्पर्म काऊंट वाढवण्यास देखील मदत करतो. दररोज सकाळी दोन लसणाच्या पाकळ्या ताज्या पाण्यासोबत घेतल्याने स्पर्म काऊंट नक्कीच वाढेल. तसेच यामुळे तुमचे लिव्हर देखील सुदृढ राहते.
🔖केळं :- केळं तर दररोज सहज उपलब्ध होणारं फळ आहे. त्यामुळे दररोज केळं खाल्याने तुम्हाला शारीरिक स्वास्थ लागेल. तसेच स्पर्म काऊंट वाढवण्यात देखील मदत केल. केळ्याने शरिरात एनर्जी निर्माण होते.
🔖भोपळ्याच्या बिया :- त्याचसोबत भोपळ्याच्या बिया देखील तुम्ही खाऊ शकता. जेणे करून तुमचा स्पर्म अकाऊंट वाढू शकतात. याला देखील तुम्ही दररोज जेवणात वापरू शकता.
🔖खारका :- याला गोजी जामून देखील बोलले जाते. हे खाल्यामुळे देखील स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते. याला दररोज आपल्या आहारात समाविष्ट करून घ्या. जेणे करून उत्तम सेक्सचा आनंद तुम्ही चिरंतर घेऊ शकता.
🔖अक्रोड :- अक्रोड खाण्यास जरी कडक असेल तर त्याचा उपाय तुम्हाला फायदाच देखील. स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी दररोज अक्रोडाचा समावेश करा. आणि सेक्स लाईफचा आनंद घ्या
0

टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी काही उपाय:

1. जीवनशैलीत बदल:

  • व्यायाम: नियमित व्यायाम, विशेषतः वेट ट्रेनिंग (Weight training) टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास मदत करते.
  • पुरेशी झोप: दररोज रात्री ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे.
  • तणाव कमी करणे: तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.

2. आहार:

  • पौष्टिक आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. फळे, भाज्या, प्रथिने (proteins) आणि हेल्दी फॅट्स (healthy fats) आहारात असावेत.
  • व्हिटॅमिन डी: व्हिटॅमिन डी टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारण्यास मदत करते.
  • झिंक: झिंक टेस्टोस्टेरॉन उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी नट्स (nuts) आणि बिया (seeds) आहारात घ्या.

3. डॉक्टरांचा सल्ला:

  • जर टेस्टोस्टेरॉनची पातळी खूपच कमी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते योग्य उपचार आणि औषधे देऊ शकतात.

4. काही नैसर्गिक उपाय:

  • अश्वगंधा: अश्वगंधा टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास मदत करते, काही अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. संशोधन पहा

हे उपाय केवळ माहितीसाठी आहेत. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5220
0

पुरुषांमध्ये, टेस्टोस्टेरॉन (Testosterone) नावाचे संप्रेरक तयार व्हायला लागल्यावर, साधारणपणे वयाच्या 12 ते 16 वर्षांच्या दरम्यान पुरुषबीज तयार व्हायला सुरुवात होते. पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत वाढ होते आणि त्यामुळे पुरुष प्रजननक्षम होतात.

पुरुषांमध्ये शुक्राणू (Sperm) तयार होण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालू राहते, तरीही वयानुसार शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होऊ शकते.

साधारणपणे, 40 वर्षांनंतर टेस्टोस्टेरॉनची पातळी हळूहळू कमी होऊ लागते, ज्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तरीसुद्धा, अनेक पुरुष 60, 70 किंवा त्याहून अधिक वयापर्यंत मुलांना जन्म देण्यास सक्षम असतात.

म्हणून, पुरुषबीज साधारणपणे वयाच्या 12 ते 16 वर्षांपासून तयार व्हायला सुरुवात होते आणि ते आयुष्यभर प्रजननक्षम राहू शकतात, पण वयानुसार त्यांची क्षमता कमी होण्याची शक्यता असते.


उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220
4
नाही, कारण आपण वयोवृद्ध होऊ पर्यंत वीर्य तयार होते, प्रत्येक ४ तासाने ४ml तयार होते, पण सारखे वीर्य बाहेर गेल्याने दुष्परिणाम दिसून येतो, थकवा, लवकर केस पांढरे होणे, आळस वाढू लागतो, हाडे दुखणे.
उत्तर लिहिले · 14/3/2018
कर्म · 300