Topic icon

सर्प

0
इतिहास म्हणजे काय ?
उत्तर लिहिले · 14/9/2023
कर्म · 0
0

जगामध्ये सापांच्या 3,600 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. त्यापैकी काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  • विषारी साप: या सापांमध्ये विषग्रंथी असतात, ज्याद्वारे ते शिकार करतात किंवा स्वतःचा बचाव करतात.
    • नाग: हे अत्यंत विषारी असून फणा काढून हल्ला करतात.अधिक माहिती
    • मण्यार: हे निशाचर असून यांचे विष नागापेक्षाही जास्त potente असते.अधिक माहिती
    • फुरसे: हे साप त्यांच्याcharacteristic आवाजाने ओळखले जातात.अधिक माहिती
    • समुद्री साप: हे साप समुद्रात आढळतात आणि अत्यंत विषारी असतात.
  • बिनविषारी साप: ह्या सापांमध्ये विषग्रंथी नसतात. ते शिकार पकडण्यासाठी व तिला मारण्यासाठी शरीराचा उपयोग करतात.
    • अजगर: हे मोठे साप शिकारkilling साठी तिला पूर्णपणे विळख्यात घेतात.अधिक माहिती
    • धामण: हे साप बिनविषारी असून ते उंदीर आणि इतर लहान प्राणी खातात.अधिक माहिती

टीप: सापांबद्दल अधिक माहितीसाठी विश्वसनीय स्त्रोतांचा वापर करा आणि अंधश्रद्धा टाळा.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2200
7
विषारी सापांची नावे:
नाग
नागराज
मण्यार
फुरसे
घोणस
समुद्री साप
पोवळा
पट्टेरी पोवळा
चापडा


बिनविषारी सापांची नावे:
अजगर
धामण
तस्कर
गवत्या
वाळा सर्प
पाणसाप
हरणटोळ
दिवड
नानेटी
मांडोळ
खापरखवल्या
कवड्या
उत्तर लिहिले · 20/12/2020
कर्म · 34255
0
सापाच्या मृत पेशींच्या थराला कात म्हणतात.
सापांच्या शरीरावर शुष्क व खरबरीत खवल्यांचे आवरण असते. हे खवले केराटिनापासून तयार झालेले असतात. साप स्वतःची त्वचा नियमित बदलत असतो, यास कात टाकणे असे म्हणतात. कात टाकताना त्याच्या हालचाली मंद होतात व त्यास डोळ्याने दिसत नाही. वरची त्वचा पूर्णपणे निघून जाते व आतमध्ये नवीन त्वचा तयार होते. कात टाकण्याची क्रिया विशिष्ट काळानंतर पुनःपुन्हा होत असते. साप वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा कात टाकत असतात.
उत्तर लिहिले · 16/5/2019
कर्म · 15575
9
जगात सापांच्या सु. २,५०० जाती आहेत

भारतात ३४० जाती आढळतात.
त्यांपैकी फक्त ६९ जातींचे सापविषारी आहेत.

महाराष्ट्रात सापांच्या सु. ५२ जाती आहेत
त्यांपैकी १२ जाती विषारी आहेत.

साप प्रामुख्याने उबदार हवामानात आणि गवताळ व सुपीक प्रदेशांत आढळतात. साप जमिनीवर तसेच पाण्यातही आढळतात. समुद्रात आढळणारे सर्व साप विषारी, तर गोड्या पाण्यातील सर्व साप बिनविषारी असतात. न्यूझीलंड, आयर्लंड व बर्म्यूडा या प्रदेशांत साप आढळत नाहीत. प्वेर्त रीको, क्यूबा, हैती, हवाई, जमेका, मादागास्कर इ. प्रदेशांत विषारी साप आढळत नाहीत.

धन्यवाद
उत्तर लिहिले · 24/9/2018
कर्म · 20585
9
विषारी व बिन विषारी साप ओळखण्याची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्या सापामध्ये विषग्रंथी व विषदंत आहेत काही होय. भारतातील महत्त्वाचे विषारी सापखालील खुणांवरून ओळखता येतात.
(१) समुद्र साप : शेपटी दोन्ही बाजूंनीच पटी असते. (२) फुरसे (व्हायपर) : उदर शल्क मोठे, डोके त्रिकोणी आकाराचे व त्यावर लहान शल्क, डोळे व नासिका यांधील भागावर लोरियल शल्क अथवा खाच असते. (३) नाग : नासिका आणि डोळ्यांना स्पर्श करणारे तिसरे ऊर्ध्व ओष्ठ शल्क व फण्यासह मान असते. (४) मण्यार : काळसर रंग, पृष्ठमध्य शल्क मोठे व षट्‌कोनी तर पुच्छशल्क अखंड असते.
आ.२. विषदंत व विषग्रंथी दाखविणाऱ्या फुरसे सापाचा जबडा : (१)विषदंत, (२) विषदंताचा आतील बाजूस वळलेला पोकळभाग, (३) विषदंतावरील आवरण, (४) विषनलिका, (५) विषग्रंथी, (६)आतीलबाजूसवळलेलेदंत, (७)जीभ.
विषसाधन : विषारी सापाच्या वरच्या जबड्यात विष ग्रंथीव विषदंत असतात, यांस ‘विषसाधन’ म्हणतात. लालाग्रंथीचे रूपांतर विषग्रंथीत झालेले असते. विषग्रंथी डोळ्यांच्या मागील बाजूस असतात. या विषग्रंथींपासून निघालेल्या विषनलिका वरच्या जबड्याच्या पुढील बाजूस असणाऱ्या विषदंतांत उघडतात. विषदंत दोन असून ते जबड्यातील इतर दातांपेक्षा मोठे, पोकळ व आतील बाजूस वळलेले असतात. नागाचे विषदंत उभे तर फुरशाचे आडवे असतात. काही कारणाने विषदंत पडले, तर नवीन विषदंत तयार होतात.
दंश करण्यापूर्वी साप डोके उंच करून शरीर थोडे मागे घेतो व क्षणार्धात भक्ष्य किंवा शत्रूचा चावा घेतो. साप चावा घेताना विषदंताच्या साहाय्याने विषग्रंथीतील विष भक्ष्य किंवा शत्रूच्या शरीरात सोडतो. विष सोडताना खालचा जबडावरच्या दिशेने ओढला जातो. चावा घेताना जबड्याच्या हालचालीसाठी कवटीतील अस्थी व स्नायूयांची मदत होते. भक्ष्याच्या किंवा शत्रूच्या शरीरात विष सोडल्यावर सापाच्या मानेचे स्नायू शिथिल होतात व तो विषदंत बाहेर खेचून घेतो.
सापाच्या विषग्रंथीतील विष एका चाव्यात संपत नाही. तो अनेक चावे घेऊ शकतो. नागाचे विष फिकट पिवळसर, पारदर्शक व काहीसे चिकट असते. फुरशाचे विष कधी पिवळसर तर कधी पांढरे असते. या विषामुळे भक्ष्य बेशुद्घ पडते. त्यामुळे सापाला भक्ष्य पकडून खाणे सोपे जाते. विष पचनास मदत करते. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी सापाला विषाचा उपयोग होतो. विषारी सापाच्या पिलांमध्ये जन्मतः पहिल्या दिवसापासून विष असते. सुमारे ६५% सर्पदंश रात्री आणि ३५% दिवसा झाल्याचे..
उत्तर लिहिले · 8/10/2017
कर्म · 22090