Topic icon

उपलब्ध नाही

1
गोधडी मधून मायेची उब मिळते

   

 


मायेची ऊब गोधडी



 
वस्त्र जरतारी असो किंवा साधं, मात्र या वस्त्रातून साकारलेली आई-आजीच्या हातची गोधडी ही मायेची ऊब देणारी ठरते. आज गोधडीचं रूप बदललं आहे. गोधडी वापरणं हे जुनाट लक्षण मानलं जात आहे. याच्या जागी नव्या मऊशार चादर, ब्लांकेटचे नवे प्रकार बाजारात दाखल झाल्याने हात शिलाई केलेली गोधडी खरीतर आज कुणाकडे पाहायला देखील मिळणं तशी दुर्मीळच म्हणावी लागेल.

घरात जुनं वस्त्र असेल, नऊवारी, सहावारी साडी असेल तर ती साडी फेकून अथवा फाडून टाकण्यापेक्षा त्या साडीचं एक वस्त्र मायेने विणलं जात होतं. जाडसर धागा आणि जाडसर सुईने साडीचे चार फेरे करून किंवा त्यात अजून काही वस्त्र टाकून ती गोधडी तयार करण्याचं कसब घरातील गृहिणींना अगदी छान जमायचं.


 
फावला वेळ कसा घालवायचा, असा कधी त्यांच्यासमोर प्रश्न पडला नसावा सहसा. कारण, या गृहिणींच्या हाताला प्रचंड काम असायचं. गोधडी शिवतानाचा वेळ कसा जायचा तेही कळायचं नाही, शिवाय छानशी गोधडीही शिवून व्हायची.

मायेची ऊब दाटायची या गोधडीत. थंडी अलगद मावायची या गोधडीत. घरचं विणकाम, आईच्या हातची शिलाई, रंगांचा अनोखा नजराणा, ही गोधडी माझी, हा रंग माझा असं ठरवून आईने शिवलेली गोधडी शिलाई करण्याच्या आधीच घरातल्या घरात बुक होऊन जायची.

गोधडीचे टाके भुलवतात मनाला. टाक्यांचे एकसारखे प्रमाण त्या गोधडीवर एखाद्या नक्षीप्रमाणे उमटून जाते. एखादी कलाकुसरही या टाक्यांच्या मार्फत केली जाते.

अलीकडे गोधडीचे प्रमाण फारसे अनुभवास मिळत नाही. गोधडीची शिलाई करण्याचे, पण एक कसब आहे. टाक्यांचे प्रमाण एकाच प्रकारचे, एकाच टाईपमध्ये शिलाई केलेले दिसून येतात. गोधडीत एक ना अनेक प्रकारच्या वस्त्रांचा वापर केला जातो. कपडय़ांचे कटिंग करून वेगवेगळय़ा डिझाईन करून त्या गोधडीवर शिलाई केल्या जातात. हाती शिलाई करण्याचे कसब काही ठरावीक जणींनाच अवगत असते. त्यात वेळही भरपूर जातो. त्यामुळे झटपट गोधडी शिलाई करण्यासाठी मशीनचाही वापर केला जातो.

गोधडीवर सुंदर नक्षीकाम केलेले असेल, तर ती गोधडी अधिक आकर्षित दिसते. त्यावर कपडय़ांचे कट लावले जातात. तर काही वेळा त्यावर कापड कापून त्याची डिझाईन बनविली जाते. गोधडीवर चौकोनी, त्रिकोणी तुकडे कापून लावणे, किंवा दोन ते तीन रंगात गोधडी साकारणे, त्यावर कलाकुसर करणे आदीमुळे गोधडीचे नवे रूपही न्याहाळता येते.

आपल्याकडील जुनी वस्त्र टाकून देण्यापेक्षा त्याच्या गोधडय़ा शिलाई करून घेतल्या, तर गरिबांचा त्या आधार बनू शकतात. गरिबांना त्या गोधडीची ऊब मिळू शकते.

लहान बाळासाठी, तान्हुल्यासाठी काही ठिकाणी आजही छोटय़ा-छोटय़ा गोधडय़ा साकारल्या जातात. तर काही संस्थांमार्फतही गोधडी शिलाईची प्रशिक्षणे घेतली जातात. गरिबांना, निराधारांना या गोधडय़ा मायेची ऊब देणा-या ठरतात. सुरक्षितता प्रदान करणा-या ठरतात.

थंडीमध्ये विशेषत: गोधडीचा वापर केला जातो. एरव्ही त्यांची जपणूक करताना त्यांचे स्थान ट्रंकेमध्ये दिसून यायचे आणि थंडीची चाहुल लागली की, या गोधडय़ा पुन्हा काढल्या जायच्या.

आजच्या युगात फॅशनच्या जमान्यात गोधडीचे रूप हे साधेसे समजले जाते. जास्त वापर होताना दिसून येत नाही. त्याची जागा आता नव्या उबदार चादर, ब्लांकेटनी घेतल्याचे दिसून येते. गोधडीचं रूप हे जुनं असलं तरी मायेची ऊब त्यात सतत सामावलेली दिसून येते. अलीकडे घराघरात गोधडी दिसणं तसं दुर्मीळच! पण, वेळ घालवण्यासाठी, कलाकुसर करण्यासाठी, आपल्यासाठी नाही, तर गरिबांसाठी तरी या गोधडय़ा विणल्या गेल्या, तर थंडीपासून संरक्षणासाठी ओळख असलेली मायेची गोधडी ही गरीब निराधारांसाठी मायेने पांघरली जाईल हे नक्की!



 


उत्तर लिहिले · 13/4/2022
कर्म · 121765
0

तुमचा प्रश्न स्पष्ट नसल्यामुळे मी तुम्हाला नक्की काय मदत करू शकते हे मला समजत नाहीये. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला योग्य माहिती देऊ शकेन.

उदाहरणार्थ, तुम्ही 'वापरा' या शब्दाबद्दल अधिक माहिती विचारू शकता किंवा 'वापर' या शब्दाचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे विचारू शकता.

काही सामान्य वाक्ये जिथे 'वापरा' हा शब्द वापरला जातो:

  • हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरा.
  • पाणी जपून वापरा.
  • मोबाइलचा वापर जपून करा.

तुम्ही अजून काही प्रश्न विचारू इच्छित असाल तर नक्की विचारा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980
6
  हॉटेलमध्ये एकदा अर्धवट वापरलेल्या साबणांचं नंतर काय होतं?     ⭕*_

  .         *_जगातल्या मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये लोकांना वापरण्यासाठी नवीन साबण, शॅम्पू, मॉइश्चरायजर, टूथपेस्ट आणि अशा अनेक वस्तू दिल्या जातात. या मोठ्या हॉटेल्समधील शॅम्पू आणि साबण दररोज बदलले जातात. पण कधी विचार केलाय का की, हॉटेलमध्ये जे साबण, शॅम्पू वापरले जातात किंवा अर्धे वापरले जातात त्यांचं काय होतं?_*

*सामान्यपणे याचं उत्तर हे साबण किंवा शॅम्पू फेकले जात असतील असं मिळू शकतं. तसेच ज्या वस्तू वापरल्याच नाहीयेत त्या दुसऱ्या ग्राहकांना दिल्या जात असतील. ऐकायला हे खरंही वाटतं. पण हे खरं नाहीये.हे तर नक्की आहे की, लाखोंच्या संख्येने असलेल्या हॉटेल्सच्या रुम्समधून रोज अशा वस्तू निघत असतील. ९ वर्षांआधी पर्यंत जास्तीत जास्त हॉटेलवाले या वस्तू कचऱ्यात फेकत होते. म्हणजे दिवसाला हजारो टन कचरा पर्यावरणाचं नुकसान करत होता. यादरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एका रिपोर्ट आला. यात सांगण्यात आलं की, हॉटेलच्या रुम्समधून साबण, शम्पू आणि असेच दररोज वाया जाणारे प्रॉडक्टमुळे एकीकडे कचऱ्यांचा ढिग वाढतोय. तर याचा गरीबांच्या स्वच्छतेची समस्या दूर केली जाऊ शकते.आपण वाचत आहात ⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾ची पोस्ट,* *२००९ मध्ये काही संस्थांनी एकत्र येऊन एक मोहिम चालवली होती. एका रिपोर्टनुसार, भारतात दररोज लाखोंच्या संख्येने अशा वस्तू हॉटेलबाहेर निघतात. देशात १ ते १.५ लाख हॉटेल रुम आहेत. यावरुन कल्पना करु शकता की, दररोज किती वस्तू बाहेर पडत असतील.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ  या समस्येचं समाधान करण्यासाठी जगभरात 'क्लीन द वर्ल्ड' आणि अशाच काही संस्थांनी मिळून 'ग्लोबल सोप प्रोजेक्ट' नावाचा उपक्रम राबवला. या अंतर्गत अर्धे वापरले गेलेले साबण नवीन साबण तयार करण्यासाठी वापरले जातात. हेच कंडिशनर, शॅम्पू आणि मॉइश्चरायजरसोबत केलं जातं. हे रिसायकल केलेले प्रोडक्ट विकसनशील देशांमध्ये पाठवले जातात.*
*🔹गरीबांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन*
या उपक्रमाचा अभाव त्या क्षेत्रांमध्ये मिळतो, जिथे स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या सुविधांचा अभाव आहे. गरीब देशांमध्ये अस्वच्छतेमुळे अनेक लोक निमोनिया आणि डायरिया या आजाराचे शिकार होत आहेत. रिसायकल केलेले साबण-शॅम्पूने लोकांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहन मिळतं.
*🔹आधी शुद्ध केलं जातं*
या उपक्रमाला आता जगभरातील सर्वच देशांमध्ये पाठिंबा मिळत आहे. स्थानिय स्तरावरही अनेक संस्था काम करतात. जे हॉटेलमधील अशा वस्तू एकत्र करतात आणि ते रिसायकल करण्यासाठी पाठवले जातात. रिसायकल दरम्यान साबण, शॅम्पू, किंडश्नर या वस्तू किटाणूरहीत केलं जातं. आणि यांच्या शुद्धतेची चाचणीही केली जाते.

0

फिल्टर्ड (Filtered) आणि रिफाईन्ड (Refined) खाद्य तेलांमध्ये मुख्य फरक खालीलप्रमाणे आहेत:

फिल्टर्ड तेल (Filtered Oil):
  • प्रक्रिया: हे तेल तयार करताना तेलातील फक्त मोठे कण आणि अशुद्धता (Impurities) फिल्टर करून काढली जाते.
  • नैसर्गिक गुणधर्म: तेलातील नैसर्गिक गुणधर्म, चव आणि रंग बऱ्याच अंशी टिकून राहतात.
  • रासायनिक प्रक्रिया: यात रासायनिक प्रक्रिया (Chemical process) सहसा वापरली जात नाही.
  • उदाहरण: Filtered Groundnut Oil (फिल्टर्ड शेंगदाणा तेल)
रिफाईन्ड तेल (Refined Oil):
  • प्रक्रिया: हे तेल तयार करताना उच्च तापमान आणि रासायनिक प्रक्रियांचा वापर केला जातो, ज्यामुळे तेलातील अशुद्धता, वास आणि रंग पूर्णपणे काढले जातात.
  • नैसर्गिक गुणधर्म: रिफाईनिंगच्या प्रक्रियेत तेलातील काही नैसर्गिक गुणधर्म कमी होऊ शकतात.
  • चव आणि रंग: या तेलाला स्वतःची अशी चव आणि रंग नसतो.
  • उदाहरण: Refined Sunflower Oil (रिफाईन्ड सूर्यफूल तेल)

* सारांश:

फिल्टर्ड तेल कमी प्रक्रिया केलेले असते, त्यामुळे ते अधिक नैसर्गिक असते. रिफाईन्ड तेल जास्त प्रक्रिया केलेले असल्यामुळे ते दिसायला अधिक स्वच्छ आणि चवहीन असते.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980
0
तुम्ही तुमचा एचपी गॅस ग्रीन कनेक्शन पेपर हरवल्यास, डुप्लिकेट पेपर मिळवण्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता:

1. एचपी गॅस वितरकाशी संपर्क साधा:

तुमच्या क्षेत्रातील एचपी गॅस वितरकाशी संपर्क साधा. त्यांना तुमच्या नावाची नोंदणीकृत माहिती आणि पत्ता सांगा. वितरक तुम्हाला डुप्लिकेट कागदपत्रे मिळवण्यात मदत करू शकतील.

2. आवश्यक कागदपत्रे:

तुम्हाला काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाऊ शकते, जसे की:

  • ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड)
  • पत्त्याचा पुरावा (लाईट बिल, पाणी बिल, आधार कार्ड)
  • गॅस कनेक्शन नंबर

3. एफआयआर (FIR) नोंदवा:

जर वितरक डुप्लिकेट पेपर देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवू शकता. एफआयआरची प्रत वितरकाला सादर केल्यास, ते डुप्लिकेट पेपर देऊ शकतात.

4. ऑनलाइन प्रक्रिया:

एचपी गॅसच्या वेबसाइटवर ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध आहे का ते तपासा. काहीवेळा, तुम्ही ऑनलाइन अर्ज करून डुप्लिकेट कागदपत्रे मिळवू शकता.

5. ग्राहक सेवा:

एचपी गॅसच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधा आणि त्यांना तुमच्या समस्येबद्दल माहिती द्या. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.

टीप: डुप्लिकेट पेपर मिळवण्यासाठी काही शुल्क लागू होऊ शकते.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980