
दिनचर्या व्यवस्थापन
3
Answer link
नोकरी करणारे बहुतेक बारा तास घराबाहेर असतात.त्यामुळे असे टिउम टेबल बनवायची वेळ त्यांच्यावर येत नाही.पण जे घरातच असतात किवा रिटायर्ड असतात त्यांना अशा टाईम टेबलची गरज (वेळ काढण्यासाठी)असते.जे व्रुद्ध अथवा रिटायर्ड आहेत त्यांनी लवकर उठून मोकळ्या हवेत फिरायला जावे.नंतर घरी परतून वर्तमानपत्र वाचावे.आंघोळ करून देवपूजा करावी.नाश्ता करावा.टीव्ही बघावा.घरात काही काम असेल तर त्यात मदत करावी.सकाळी शाळेत जाणारी मुलं असल्यास खाणेपिणे द्यावे.त्यांचे शाळेचे दप्तर लावण्यास.मदत करावी.बाहेरून दूध भाजी आणायची असल्यास घेऊन यावे.इतर काही वाचन करावे.तोपर्यत जेवणाची वेळ झाल्यास जेऊन घ्यावे.जेवल्यानंतर घरातल्या घरात फेऱ्या माराव्यात.परत थोडा वेळ टीव्ही बघावा किवा इतर काही काम करावे.दुपारची विश्रांती घ्यावी.मुलं शाळेतून घरी आली असतील तर त्यांच्या बरोबर खेळावे.संद्ध्याकाळी सहा वाजण्याच्या आसपास जवळपास फिरायला जावे.समवयस्क माणसांबरोबर गप्पागोष्टी कराव्यात.लायब्ररीत जावे.रात्री आठपर्यंत घरी परतावे.जेवणाची वेळ झाली असल्यास जेऊन घ्यावे .शतपावली मारावी.घरातील माणसांबरोबर बोलावे.रात्री दहा वाजता झोपावे.(व्यक्तीव्यक्तीगणीक या टाईमटेबलमधे फरक होऊ शकतो).
आता जे व्रुद्ध किंवा रिटायर्ड नसतील व घरीच असतील त्यांनी देखील अशाच प्रकारे टाईमटेबल आखून अभ्यास करणे,व्यायाम करणे,मित्रांबरोबर वेळ घालवणे,घरच्या/बाहेरच्या कामात मदत करणे वगैरे दिनचर्या आपपल्या वयानुसार, वेळेनुसार पार पाडावी.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही