Topic icon

पारंपरिक शिक्षण

1
पारंपारिक शिक्षणाच्या कथित मर्यादा आणि अपयशाच्या प्रतिक्रियेच्या रूपात काही प्रमाणात वैकल्पिक शिक्षण विकसित केले. पर्यायी शाळा , स्वतःची शिक्षण , गृहशिक्षण आणि कृती आधारित अनौपचारिक शिक्षण(अनस्कूलिंग) यासह शैक्षणिक दृष्टिकोनाची विस्तृत श्रृंखला उदयास आली.




पारंपारिक शिक्षणपर्यायी प्रणाली आहेत. याचा अर्थ असा की यापैकी कोणती प्रणाली "चांगली" आहे हे विचारणे निरर्थक आहे. अर्थात, एखादी व्यक्ती एक किंवा दुसर्या शिक्षण प्रणालीसह प्राप्त झालेल्या काही परिणामांची तुलना करू शकते - उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीत प्राप्त केलेल्या ज्ञानाचे प्रमाण आणि गुणवत्ता किंवा त्यांची विचारसरणी, स्मरणशक्ती इत्यादींच्या विकासाची पातळी. परंतु अशा तुलनेतून निघालेले निष्कर्ष हे या निष्कर्षासारखेच आहेत की जड होलरने ट्रॉटरपेक्षा जास्त भार वाहून नेला आणि ट्रॉटरने अंतरावर असलेल्या जड होलरला खूप मागे टाकले
उत्तर लिहिले · 10/6/2022
कर्म · 53750
8
या प्रश्नात भारत मागे का हा सर्वात महत्वाचा भाग आहे, कारण गुरुकुलातून बाहेर पडलेले विद्यार्थी देखील आता हयात नाहीत आणि गुरुकुल देखील नाही.
ज्ञान वाटल्याने वाढते - याचा पुरावा म्हणून अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशांनी कायम आपले ज्ञान संपूर्ण जगासमोर ठेवण्यात पुढाकार घेतला. यातून जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी त्या देशांत जाऊन संशोधने करायला गेली आणि आजही जातात. मग या देशांनी अशा हुशार लोकांसाठी राहण्यासाठी पूरक वातावरण बनवले आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर करून त्याला योग्य दिशा देऊन ते आज महासत्ता आहेत.

याउलट भारतात त्याकाळात गुरुकुले होती, विद्वत्ता होती त्याकाळात आपली समाजव्यवस्था अशी होती कि ज्ञान फक्त विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती. सगळे नॉलेज काही ठराविक लोकांकडेच सीमित असायचे. ते कधी वाटले गेले नाही. गोर गरीब समाजाला ज्ञानापासून दूर ठेवण्यात आले. यातून सर्व नॉलेज कालानुरूप नष्ट होत गेले. समाजाचा मोठा भाग त्यापासून वंचित राहिला. परिणामी देशात कुठलाही ब्रेन पॉवर तयार होऊ शकला नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून भारत देश या आधुनिक युगात मागे राहिला.
उत्तर लिहिले · 12/8/2017
कर्म · 283280