महिला स्वातंत्र्य
8
Answer link
स्वातंत्र्य दिन हा सर्व जण त्या विरांचा, महात्माचा,आणि विजयाचा विशेष दिन साजरा केला जातो. त्याचप्रमाणे हा दिन समस्त स्त्रियांच्या मान सन्मानाचा देखील असतो. कारण खरे स्वातंत्र्य हे स्त्रियांनाही मिळाले आहे. बालविवाह पासून पुनर्विवाह आणि शिक्षण-धर्म-जात-परंपरा-रीती-रिवाज यांपासून स्त्रियांना पूर्वी बरेच काही जाच एखाद्या शिक्षेप्रमाणे सोसावे लागे. कालांतराने बुद्धिमत्तवादि, थोर विचारवंत यांनी स्त्रियांसाठी लढ़ा दिला. आणि आज आपल्या महिलांना या बंद कोठडीतून सुटका मिळाली आहे. आज आपला स्त्री वर्ग हां चंद्रावर देखील पोहोचला आहे. घरातील संपूर्ण जबाबदारी सोबत ते व्यवसाय, नोकरी, शिक्षण सुद्धा कुशलतेने कामकाज पार पाडतात. एवढे असून तरीही देखील आजही स्त्रियांवर मानसिक शारीरिक अत्याचार होतात. आणि याला जबाबदार ही नको असलेली जुनाट विचारांची मूळ परंपरा, स्त्रियांवर बळजबरी करणारी ही रीती रिवाज. हुंडा मागणे, स्त्रियांचा सतत अपमान करणे, स्त्री भ्रूण हत्या,काही ठिकाणी स्त्रियांना वैश्यव्यवसायसाठी प्रवृत्त करणे, अशा अनेक घटना आजही काही लहान मोठ्या गावांत स्त्रियांच्या बाबतीत घडताना दिसतात. म्हणूनच स्वातंत्र्यदिनानिमित्त वारंवार आम्ही सांगू इच्छीतो, स्त्रियांच्या आदर नेहमी असावा. कारण स्त्री देखील नेहमी सतत आपल्या वडिलांचा, भावाचा, पतिचा, मुलाचा नेहमी मान सन्मान ठेवते. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले असल्या कारणाने काही स्त्रीया त्यांच्या आरक्षणाचा गैरफायदा उचलत आहे हे देखील कटु सत्य आहे तरीही यामुळे इतर सामान्य स्त्रियांवर विनाकारण दोष लादले जातात. तसेच समाजात अश्या घटनांमुळे चुकीचे संदेश पसरले जाते. म्हणून अश्या घटनांवर प्रतिबंध बसणे गरजेचे आहे. स्त्री ही दुर्बल नसून शक्तिशाली आहे.