
मुगल साम्राज्य
1
Answer link
बाबर : (१४ फेब्रुवारी १४८३ - २६डिसेंबर १५३॰). हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला मोगल बादबाह. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता.
बाबर : (१४ फेब्रुवारी १४८३ - २६डिसेंबर १५३॰). हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला मोगल बादबाह. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता. त्याचा जन्म फर्घाना (कझाकस्तान) येथे झाला. अकरा वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले व तो फर्घाना प्रांताचा राजा झाला. सुरुवातीपासून त्याला त्याच्या आप्तेष्टांच्या कट्टर विरोधास तोंड द्यावे लागले. मध्य आशियात साम्राज्य स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याने दोन वेळा आपल्या पूर्वज्यांनी राजधानी समरकंद जिंकली; पण दोन्ही वेळा ती त्याला गमवावी लागली. इतकेच नव्हे, तर फर्घान्यासही त्यास मुकावे लागले. परिणामत: मध्य आशिया सोडून त्याने १५॰४ साली काबूल जिंकले. १५११ साली पुन्हा त्याने इराणच्या शाहच्या मदतीने समरकंद व फर्घाना घेतले; पण उझबेक नेता उबैदुल्लाखान याने दोन्ही परत घेतले (१५१२). १५२६ पर्यंत बाबर काबूलला होता. त्या काळात त्याने शाह बेग अर्घुनकडून कंदाहार घेतले. (१५१९-२४) दरम्यान बाबरने हिंदुस्थानावर चार स्वाऱ्या केल्या; पण त्या निर्णायक ठरल्या नाहीत. १५२६ साली पानिपत येथे दिल्लीचा त्या वेळेचा सुलतान इब्राहिमखान लोदीबरोबर झालेल्या लढाईत त्याला तोफखान्यामुळे यश मिळाले. नंतर त्याने दिल्ली व आग्रा घेतले. याच सुमारास ग्वाल्हेरच्या राजाकडून त्याला प्रख्यात कोहिनूर हिरा भेट म्हणून मिळाला.
बाबर हिंदुस्थानात कायमचा राहणार असल्याचे समजल्यावर मेवाडचा राण संग्रामसिंह याने त्याच्याशी मुकाबला करण्याचे ठरविले. आग्र्याच्या पश्चिमेस सु. ६॰ किमी. अंतरावर खानुवाच्या मैदानावर दोघात तुंबळ युद्ध झाले. बाबरने मद्य सोडल्याची व मुसलमानांवरील नमधा कर रद्द केल्याची घोषणा करून एक स्फूर्तिदायक भाषण केले. त्यामुळे सैन्याचे मनोधैर्य वाढले. अखरे बाबरचा विजय झाला (१५२७). नंतर त्याने चंदेरीच्या मेदिनीरायाला शरण आणले, अयोध्येचा अफगाण उमराव बिब्बनचा पराभव केला व गंगा व गोग्रा यांच्या संगमाजवळील धाग्रा येथे नुसरतशाहच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या अफगाणांना पराजित केले (१५२९). त्यानंतर त्याने गाझी हे बिरुद धारण केले. त्याच्या राज्याचा विस्तार मध्य आशियातील अमूदर्या नदीपासून पूर्वेस बिहारपर्यंत व उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस माळवा-राजस्थानपर्यंत झाला.
सततच्या युद्धांमुळे तसेच दारूच्या अतिसेवनामुळे अखेरच्या दिवसांत तो नेहमीच आजारी असे. हुमायून व हिंदाल यांपैकी ज्येष्ठ मुलगा हुमायून याने आपल्यानंतर तख्तावर बसावे, असे त्याने शेवटच्या आजारात सुचविले.
मध्ययुगीन काळातील बाबर हा अत्यंत बुद्धिमान, रसिक, मुत्सद्दी व कर्तबगार राजा समजला जातो. हिंदुस्थानात राज्य स्थापण्याचा प्रयत्न त्याच्या पूर्वजांना जमला नाही. तो बाबरने आपल्या पराक्रमाने प्रत्यक्ष कृतीत आणला. सततच्या लढायांमुळे त्याला प्रशासनात सुधारणा करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही; तथापि एक कुशल सेनापती आणि मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले. त्याला सृष्टिसौंदर्याची आवड होती. तो विद्वान व कलेचा भोक्ता होता. तुर्की व फार्सी भाषांत त्याने काही कविता केल्या होत्या. तुर्की भाषेत त्याने दीवान हा काव्यसंग्रह रचला आणि मसूनवी हे उपदेशात्मक खंडकाव्य मुबय्यिन या नावाने लिहिले. तुझक-इ-बाबरी हे त्याचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचे आहे.
तो कट्टर सुन्नी पंथी मुसलमान असला, तरी धर्मवेडा नव्हता. हुमायून यास कोणाच्याही धर्मात हस्तक्षेप न करण्याचा उपदेश त्याने दिला. इतर जातीजमातींशी सलोख्याने व उदारतेने वागण्याचा त्याचा उपदेश होता.
4
Answer link
औरंगजेब
औरंगजेब (इ.स. १६१८ - इ.स. १७०७) हा मोगल सम्राट होता. त्याने त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता.[ संदर्भ हवा ] गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारा तो पहला मुसलमान राज्यकर्ता होता.तसेच त्याने जिझिया कर परत लागू केला.[ संदर्भ हवा ] त्याने आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नांत घालवला.
औरंगजेब
बादशाह
Aurangzeb reading the Quran.jpg
औरंगजेब कुराण पठण करताना, इसवी सनाच्या १८ व्या शतकातील अनामिक चित्रकाराने रंगविलेले चित्र
अधिकारकाळ
१६५९-१७०७
पूर्ण नाव
अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर
जन्म
नोव्हेंबर ३, १६१८
दाहोद, भारत
मृत्यू
मार्च ३, १७०७
अहमदनगर, महाराष्ट्र, भारत
पूर्वाधिकारी
शाह जहान
उत्तराधिकारी
पहिला बहादुर शाह
वडील
शहाजहान
पत्नी
रबीया दुराणी, दिलरास बानो बेगम
संतती
* पहिला बहादूर शाह, पुत्र
आझम शाह, पुत्र
सुलतान मुहम्मद अकबर, पुत्र
मुहम्मद कामबक्श, पुत्र
झेबुन्निसा, कन्या
राजघराणे
मुघल
राजकीय कारकिर्दीची सुरुवात संपादन करा
१६३४ मधे शाहजहानने औरंगजेबास मुघल प्रथेनुसार दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. औरंगजेबाने मराठवाड्यातील खडकी या शहराचे नाव बदलून ते औरंगाबाद केले. इ.स.१६३७ साली औरंगजेबाने रबीया दुराणीशी लग्न केले. त्या दरम्यान शहाजहानने थोरला मुलगा दाराशुकोहला मुघल दरबारातील कामकाजात लक्ष घालण्यास सांगितले. जहानआरा बेगम ही औरंगजेबाची थोरली बहीण. इ.स.१६४४ मध्ये औरंगजेबाची दुसरी एक बहीण एका दुर्घटनेत जळून मरण पावली. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी औरंगजेब आग्रा येथे आला, यामुळे शहाजहान बादशहा भयंकर संतापला आणि त्याने औरंगजेबाला दख्खनच्या सुभेदारीवरून पायउतार केले. यानंतर तो सात महिने दरबारात आला नाहीँ. नंतर शहाजहानने त्याची नियुक्ती गुजरातच्या सुभेदारपदी केली. येथे त्याने आपल्यातील कसब पणाला लावून काम केले. फलस्वरूपी त्याला बदख्शान (अफगाणिस्तान) बाल्ख येथील सुभेदारीही देण्यात आली.
सत्तासंघर्ष संपादन करा
सन् १६५२ मध्ये शाहजहान आजारी पडला. त्याचा मृत्यू जवळ आला आहे असे वाटू लागले. दाराशुकोह, शाह सुजा आणि औरंगजेब यांच्यांत सत्तासंघर्ष सुरू झाला. ज्याने स्वतःला बंगालचा गव्हर्नर म्हणून घोषित केले होते त्या शाह सुज़ाला औरंगजेबाकडून हार पत्करून बर्मायेथील अराकानक्षेत्री जावे लागले. १६५९ साली औरंगजेबाने शाहजहानला कैद करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला; दारा शिकोहचा शिरच्छेद करवला. अशी वदंता आहे की शाहजहाँला मारण्यासाठी औरंगजेबाने दोनदा विष पाठवले होते. पण ज्या वैद्यांकरवी विष पाठविले होते ते इतके स्वामिनिष्ठ होते की त्यानी शाहजहाँला विष न देता ते स्वतःच पिऊन टाकले.
मराठ्यांविरुद्ध युद्ध संपादन करा
मुघल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे, आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा काल्पनिक दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
सुरतेचा पहिला छापा संपादन करा
इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या छापामुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेचा छापा ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
मिर्झाराजे जयसिंहाची मोहीम संपादन करा
इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले. आग्ऱयाहून सुटका
शिवाजी महाराजांची आग्र्यातील नजरकैद संपादन करा
इ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे
साभार विकिपीडिया
15
Answer link
मुघल सत्तेचा संस्थापक बाबर होय.
मुघल साम्राज्य हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मूलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ.. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली ब्रिटिशांनी मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
मुघल साम्राज्य हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे बाबराने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायुनने शेरशाह सूर बरोबरच्या लढाईत गमावले.पुढे हुमायुनला १४ वर्षाच्या वनवासात रहावे लागले. नंतर पानिपतच्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मूलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ.. स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली. १८५८ साली ब्रिटिशांनी मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला.
1
Answer link
औरंगजेबाला ५ मुले आणि ५ मुली अशी एकुण १० अपत्ये होती
खालील लिंकवर क्लिक करुन त्यांची नावे वाचू शकता.
औरंगजेब आणि त्याचा परिवार
खालील लिंकवर क्लिक करुन त्यांची नावे वाचू शकता.
औरंगजेब आणि त्याचा परिवार
9
Answer link
औरंगजेबाला 5 मुले होती
१. बहादूर शाह पहिला
२. मुहम्मद आझम शाह
३. सुलतान मुहम्मद अकबर
४. मुहम्मद कम् बक्ष
५. मुहम्मद सुलतान
१. बहादूर शाह पहिला
२. मुहम्मद आझम शाह
३. सुलतान मुहम्मद अकबर
४. मुहम्मद कम् बक्ष
५. मुहम्मद सुलतान
4
Answer link
औरंगजेब हा मोगल सम्राट होता. त्याने त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा) लागू केला होता.गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारा तो पहला मुसलमान राज्यकर्ता होता. आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नांत घालवला. अधिकारकाळ १६५९-१७०७
पूर्ण नाव
अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर
जन्म
नोव्हेंबर ३, १६१८
दाहोद, भारत
मृत्यू
मार्च ३, १७०७
औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
पूर्वाधिकारी
शाह जहान
उत्तराधिकारीपहिला बहादुर शाह
वडील शहाजहान
पत्नी रबीया दुराणी, दिलरास बानो बेगम
संतती *
पहिला बहादूर शाह, पुत्र
आझम शाह, पुत्र
सुलतान मुहम्मद अकबर, पुत्र
मुहम्मद कामबक्श, पुत्
झेबुन्निसा, कन्या
राजघराणे मुघल
पूर्ण नाव
अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर
जन्म
नोव्हेंबर ३, १६१८
दाहोद, भारत
मृत्यू
मार्च ३, १७०७
औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
पूर्वाधिकारी
शाह जहान
उत्तराधिकारीपहिला बहादुर शाह
वडील शहाजहान
पत्नी रबीया दुराणी, दिलरास बानो बेगम
संतती *
पहिला बहादूर शाह, पुत्र
आझम शाह, पुत्र
सुलतान मुहम्मद अकबर, पुत्र
मुहम्मद कामबक्श, पुत्
झेबुन्निसा, कन्या
राजघराणे मुघल