Topic icon

वर्गीकरण

0

एका प्रकारच्या अनेक वस्तूंमध्ये एक समान तत्त्व असते, त्याला सामान्यता (Commonality) म्हणतात.

सामान्यता म्हणजे दोन किंवा अधिक गोष्टींमध्ये आढळणारे समान गुणधर्म, वैशिष्ट्ये किंवा लक्षणे.

उदाहरणार्थ:

  • सर्व माणसांमध्ये 'माणुसकी' हे समान तत्त्व आहे.
  • सर्व फळांमध्ये 'गोडवा' हे समान तत्त्व असू शकते.
  • सर्व प्राण्यांमध्ये 'श्वास घेणे' हे समान तत्त्व आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

कारण:

  • अस्वल, हरीण आणि घोडा हे तिन्ही प्राणी जमिनीवर राहणारे प्राणी आहेत.
  • कासव हा पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी आहे. त्यामुळे तो या गटात बसत नाही.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

वनस्पती जगत (Kingdom Plantae) खूप मोठे आहे आणि त्याचे वर्गीकरण अनेक गटांमध्ये केले जाते. येथे काही सामान्य वनस्पती जमाती (major plant divisions) आणि त्यांची वैशिष्ट्ये दिली आहेत:

1. शैवाल (Algae):
  • हे सर्वात प्राचीन वनस्पती मानले जातात.

  • त्यांच्यात खरे मूळ (true roots), खोड (stems) आणि पाने (leaves) नसतात.

  • ते प्रामुख्याने पाण्यात आढळतात.

  • उदाहरण: स्पायरोगायरा (Spirogyra), क्लॅमिडोमोनस (Chlamydomonas).

2. ब्रायोफायटा (Bryophyta):
  • या वनस्पतींना जमिनीवरील वनस्पतींचे पहिले गट मानले जाते.

  • त्यांना मूळ, खोड आणि पाने नसतात, परंतु त्यांच्यासारखी रचना असते.

  • ते ओल्या आणि दमट ठिकाणी वाढतात.

  • उदाहरण: मॉस (Moss), लिव्हरवर्ट (Liverwort).

3. टेरिडोफायटा (Pteridophyta):
  • या वनस्पतींमध्ये मूळ, खोड आणि पाने असतात.

  • त्यांच्यात व्हस्कुलर सिस्टम (vascular system) असते, ज्यामुळे पाणी आणि पोषक तत्वे वनस्पतीमध्ये वाहून नेली जातात.

  • उदाहरण: फर्न (Fern), हॉर्सटेल (Horsetail).

4. जिम्नोस्पर्म (Gymnosperms):
  • या वनस्पतींमध्ये बिया असतात, परंतु त्या फळांमध्ये बंदिस्त नसतात.

  • त्यांच्यामध्ये सुईसारखी पाने असू शकतात.

  • उदाहरण: पाइन (Pine), सायकस (Cycas).

5. अँजिओस्पर्म (Angiosperms):
  • या वनस्पतींमध्ये फळांच्या आत बिया असतात.

  • त्यांच्यात फुले येतात.

  • उदाहरण: आंबा (Mango), गुलाब (Rose), गहू (Wheat).

हे वर्गीकरण वनस्पतींच्या विकासाच्या आधारावर केले जाते, त्यांच्यातील रचना आणि पुनरुत्पादन (reproduction) करण्याच्या पद्धतीनुसार त्यांचे गट पाडले जातात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

या प्रश्नातील वेगळा पर्याय रशिया आहे.

स्पष्टीकरण:

  • भारत, पाकिस्तान आशिया खंडातील देश आहेत.
  • रशिया हा युरोप आणि आशिया दोन्ही खंडांमध्ये आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0
गाय, कुत्रा, मांजर हे भूचर प्राणी आहेत पोपट हे पक्षी आहे, तो उडतो.
उत्तर लिहिले · 7/8/2023
कर्म · 7460
2
वर्गीकरणाचे तीन मुख्य प्रकार आहेतः (१) विश्लेषणात्मक, (२) विकारक्षम आणि (३) संश्लेषणात्मक.
वर्गीकरणात तीन मुख्य प्रकार आहेतः (१) विश्लेषणात्मक, (२) विकारक्षम आणि (३) संश्लेषणात्मक.

१.विश्लेषमात्मक : विष्लेषमात्मक भाषांचे वैशिष्ट्य हे, की त्या एकार्थवाचक धातूंनी बनलेल्या असतात. या धातूंना अभिव्यक्तीच्या पातळीवरही कोणताच विकार होत नाही. ते जसेच्या तसे वापरले जातात. वाक्यातला त्यांचा क्रमच काय तो अर्थनिर्णायक असतो. शब्दांचे कार्यदृष्ट्या वर्गीकरण करता येत नाही. ज्याला आपण आपल्या व्याकरणात शब्दांचे वर्ग म्हणतो, तो या भाषांत नसतात. पूर्णपणे विकारशून्य परस्परभिन्न धातूंनी त्या बनलेल्या असतात. म्हणून त्यांना धातुभाषा किंवा विकारहीन भाषा असेही नाव देता येईल. या भाषांचे उत्तम उदाहरण ⇨चिनी भाषा हे आहे.

२.विकारक्षम : विकारक्षम भाषांत शब्द भिन्नभिन्न वर्गांत विभागलेले असतात. नाम, क्रियापद, विशेषण इ. त्यांच्या अर्थघटकांना त्यांच्या कार्यानुरूप विकार होतात. त्यामुळे अर्थघटकांचे मूळ रूपही कित्येकदा विकारक्षम बनते. मूळ रूपाला प्रत्यय किंवा उपसर्ग लागतात आणि कधीकधी ते धातूंशी एकजीव होतात. भाषातज्ञ त्याचा खुलासाही देतील, पण बाह्य रूपांचे हे विविध आविष्कार सामान्य माणसाला नियमाच्या पलीकडचे वाटतात. ⇨ संस्कृत भाषा, ⇨ लॅटिन भाषा, ⇨ ग्रीक भाषा इ. भाषा या प्रकारात येतात.

३.संश्लेषणात्मक : संश्लेषणात्मक भाषांत अर्थघटक, त्यांना प्रत्ययरूपाने जोडलेले कार्यघटक आणि इतर शब्द यांची, अजिबात गुंतागुंत नसलेली, प्रत्येक घटक मूळ स्वरूपात ठराविक स्थानी दिसेल अशी साखळी बनलेली असते. ⇨ तुर्की भाषा हे याचे उदाहरण आहे.

या वर्गीकरणात एका टोकाला पूर्णपणे विश्लेषण असणारी चिनी, तर दुसऱ्या टोकाला पूर्णपणे संश्लेषण असणारी तुर्की आणि त्या दोघींमधले जणू संक्रमणच अशी अंशतः विश्लेषण व अंशतः संश्लेषण यांचा उपयोग करणारी संस्कृत, असे चित्रे दिसते. म्हणजे खरे तर अभिव्यक्तीच्या प्रकारचे हे विशिष्ट प्रमाणदर्शक टप्पे आहेत.

अशा प्रकारचे वर्गीकरण हे अतिशय प्राथमिक स्वरूपाचे आहे आणि त्यामुळे कोणाचेच फारसे समाधान होणार नाही. शिवाय मुळात एका प्रकारात समाविष्ट होऊ शकेल अशी भाषा कालांतराने इतकी बदलते, की तिची रचना पुष्कळच वेगळ्या प्रकारची वाटू लागते. अत्यंत विकारक्षम इंडो-यूरोपियनची परिणती ⇨ इंग्रजी भाषेसारख्या काही अंशी विकारक्षम, काही अंशी विकारशून्य आणि काही अंशी क्रमप्रधान अशा भाषेत होऊ शकते आणि मग ही भाषा पूर्णपणे विकारक्षम या प्रकारात दाखवता येत नाही. ती विश्लेषणात्मक व विकारक्षम या प्रकारांच्या दरम्यान येईल.

म्हणजे असे म्हणता येईल, की विकार व विश्लेषण ही दोन मापे असून भाषेत त्यांचे मिश्रण एखाद्या भाषेत किती प्रमाणात आहे, यावर तिचे स्थान अवलंबून राहील.

सर्वांगीण वर्गीकरणात भाषेच्या ध्वनिघटकांचा, व्याकरणपद्धतीचा आणि अर्थघटकांचा विचार करावा लागेल. तरच तिचे रूप कसे बनले आहे, हे ठरवता येईल
उत्तर लिहिले · 23/2/2023
कर्म · 53715