Topic icon

ड्रोन

2
*‘Cockroach drone’ बद्दल तुम्हाला माहित आहे का?*

*🔰📶महा डिजी | विशेष*

_डोंगर, जंगलात, बंकरमध्ये लपलेल्या शत्रूचा अचूक शोध घेण्यासाठी आयआयटी कानपूर व भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड यांच्या सहयोगातून एक छोटेसे ड्रोन तयार केले आहे._

_आर्टिफीशीयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनचा नाव कॉक्रोच अर्थात झुरळ ड्रोन असे असून त्याला इंसेक्ट कॉप्टर असे म्हणतात. त्याद्वारे शत्रूला फसवून हे शत्रूवर नजर ठेवता येते._

_ड्रोन भारत इलेक्ट्रोनिक्सकडे टेस्टिंगसाठी सोपवून जूनपर्यंत त्याच्या चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर ते सेना, निमलष्करी दले, अंतरिक सीमा सुरक्षा या विभागाला दिले जाईल._

*🔹ड्रोनची वैशिष्ट्ये :*
👉🏻ड्रोन रेल्वेट्रॅक, वीज तारा, रेस्क्यू ऑपरेशन, पूर, आग निरीक्षणासाठीही फायदेशीर आहे.
👉🏻पूर्वी ड्रोनचे वजन 40 ग्रॅम होते, आता ते 22 ग्रॅमवर आले असून ते तळहातावर सहज मावते.
👉🏻हे ड्रोन भिंतीला एखाद्या किड्याप्रमाणे दीर्घकाळ चिकटून राहू शकते, शिवाय दोन तासापर्यंत व्हीडीओ घेऊ शकते.
👉🏻हे ड्रोन भिंतीवर चिकटते त्यावेळी त्याची मोटर बंद होते, त्यामुळे बॅटरी बॅकअप वाढतो. 👉🏻ड्रोनला किड्यासारखे 8 पाय असून त्यामुळे त्याची पकड मजबूत आहे. ते रात्रीही काम करू शकते.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 27/2/2020
कर्म · 569245
0
नक्कीच, ड्रोनबद्दल माहिती, किंमत, कॅमेरा आणि इतर गोष्टींविषयी तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे:

ड्रोन (Drone) म्हणजे काय?

ड्रोन हे एक प्रकारचे मानवरहित विमान आहे. यात कॅमेरा, सेन्सर्स आणि इतर उपकरणे बसवलेली असतात. यांचा उपयोग अनेक कामांसाठी होतो.

  • उदाहरणे: व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, सुरक्षा, शेती, इत्यादी.

ड्रोनची किंमत (Drone Price)

ड्रोनची किंमत त्याच्या वैशिष्ट्यांनुसार बदलते.

  • किंमत श्रेणी:
  • Entry-level ड्रोन: ₹3,000 ते ₹20,000
  • Mid-range ड्रोन: ₹20,000 ते ₹1,00,000
  • High-end ड्रोन: ₹1,00,000+

कॅमेरा (Camera)

बहुतेक ड्रोनमध्ये कॅमेरा असतो, पण काही बेसिक मॉडेल्समध्ये तो वेगळा घ्यावा लागतो.

  • कॅमेरा सोबत: अनेक ड्रोनमध्ये कॅमेरा असतो.
  • वेगळा कॅमेरा: काही ड्रोनमध्ये चांगल्या कॅमेऱ्यासाठी वेगळा कॅमेरा लावण्याची सोय असते.

मेगा पिक्सल (Mega Pixel)

कॅमेऱ्याचा मेगा पिक्सल तुम्ही निवडू शकता. चांगल्या फोटोंसाठी जास्त मेगा पिक्सल असलेला कॅमेरा चांगला असतो.

  • किती मेगा पिक्सल: 12MP ते 20MP चा कॅमेरा चांगला मानला जातो.
  • निवड: तुम्ही तुमच्या गरजेनुसार मेगा पिक्सल निवडू शकता.

बॅटरी (Battery)

ड्रोनची बॅटरी लाईफ त्याच्या आकारमानावर आणि मॉडेलवर अवलंबून असते.

  • बॅटरी लाईफ: साधारणपणे 15 ते 30 मिनिटे.
  • जास्त बॅटरी लाईफ: काही ड्रोनमध्ये जास्त वेळ उडण्याची क्षमता असते.

कमी किमतीत चांगला ड्रोन (Best Drone in Low Price)

कमी किमतीत चांगला ड्रोन निवडताना खालील पर्याय उपयुक्त ठरू शकतात:

  • Ryze Tello: हा ड्रोन लहान आणि स्वस्त आहे, तसेच तो वापरण्यासही सोपा आहे.
  • DJI Ryze Tello: डीजेआय रायझ टेललो (अधिकृत वेबसाईट)
  • Potensic A20 Mini Drone: हा मिनी ड्रोन लहान मुलांसाठी आणि नवशिक्यांसाठी चांगला आहे.

ड्रोन घेताना काय पाहावे? (Things to Consider Before Buying a Drone)

ड्रोन खरेदी करताना खालील गोष्टी तपासा:

  • कॅमेरा क्वालिटी: चांगल्या व्हिडिओ आणि फोटोंसाठी चांगला कॅमेरा महत्त्वाचा आहे.
  • बॅटरी लाईफ: जास्त वेळ उडण्यासाठी चांगली बॅटरी लाईफ आवश्यक आहे.
  • जीपीएस (GPS): जीपीएसमुळे ड्रोनला स्थिर राहण्यास मदत होते.
  • सेफ्टी फीचर्स: ऑटो रिटर्न, Obstacle Avoidance यांसारखे सेफ्टी फीचर्स असावेत.
  • Controller: कंट्रोलर वापरण्यास सोपे असावे.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1200
0
हा कॅमेरा वापरायचा असल्यास सात दिवस अगोदर स्थानिक पोलीस ठाण्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 25/9/2019
कर्म · 0
7
ड्रोन म्हणजे पायलटविरहित छोटेखानी विमान. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हे विमान उडवलं जातं.

 मुळात ड्रोन्सचा वापर हा लष्करी मोहिमांसाठी केला जायचा. म्हणजे तसा तो अजूनही होतो.
छायाचित्रण, चित्रीकरण यांचं आकर्षण आजही कायम आहे. हातात डीएसएलआर कॅमेरा घेऊन रस्ते-वाटा तुडवणारे उत्साही कलाकार डोंगरमाथ्यांपासून ते घनदाट जंगलांपर्यंत कुठेही दिसतात. वेगवेगळ्या अँगलने, एक्स्पोजर, शटरस्पीडचा खेळ करीत फोटा काढणारे हे कलाकार कॅमेरांच्या दुनियेतल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. अर्थात आजकाल जो उठतो, तो गळ्यात डीएसएलआर लटकवून स्वत:ला निष्णात फोटोग्राफर समजतो हा भाग निराळा. पण ज्यांना खरोखरच या क्षेत्राची जाण आहे आणि या क्षेत्रात काही तरी हटके करण्याची आवड आहे, अशी मंडळी सतत काही ना काही तरी करीत असतात, नवीन मार्ग शोधत असतात. ड्रोन कॅमेरा हा याच हटके वाटेवरचा लोकप्रिय झालेला गडी.

वायरलेस रिमोट कंट्रोलचा वापर करीत भोवऱ्याप्रमाणे आकाशात भिरभिरणारा हा कॅमेरा लग्नापासून ते सिनेमापर्यंत सगळ्या सत्कार समारंभांमध्ये हमखास वापरला जातो. त्यातून टिपल्या जाणाऱ्या व्हिडीओचा दर्जाही चांगला असतो. एखाद्या दृश्याचं जरा उंचीवरून छायाचित्रण किंवा चलत्चित्रण करायचं असेल तर ड्रोनचा वापर केला जातो. फारपूर्वी क्रेनचा वापर करून अशा प्रकारची दृश्यं चित्रित केली जायची. बजेट असेल तर मग हेलिकॉप्टरचाही वापर केला जायचा. पण हेलिकॉप्टर हे एका ठरावीक उंचीवरून उडवायची मर्यादा असल्याने चित्रीकरणात अडचणी येतात. आत्ताच्या घडीला मात्र हय़ा सर्वाची जागा ड्रोन कॅमेराने घेतलीये.
उत्तर लिहिले · 10/2/2019
कर्म · 1235
0

ड्रोन कॅमेऱ्याची रिमोट रेंज (Drone camera remote range) विविध घटकांवर अवलंबून असते, जसे की ड्रोनचा प्रकार, रिमोट कंट्रोलची क्षमता, आणि वातावरणातील अडथळे.

सर्वसाधारणपणे, ड्रोन कॅमेऱ्याची रिमोट रेंज खालीलप्रमाणे असू शकते:

  • Standered(स्टँडर्ड ड्रोन: हे ड्रोन साधारणतः 2 ते 10 किलोमीटर पर्यंत उडू शकतात.
  • High range ड्रोन: हे ड्रोन 10 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरापर्यंत उडू शकतात. काही व्यावसायिक ड्रोन 80 किलोमीटर पर्यंत उडू शकतात.

रेंजवर परिणाम करणारे घटक:

  • वातावरणातील अडथळे: इमारती, झाडे, आणि इतर वस्तू सिग्नलमध्ये व्यत्यय आणू शकतात.
  • हवामान: खराब हवामान, जसे की पाऊस आणि वारा, रेंज कमी करू शकतात.
  • बॅटरी लाईफ: ड्रोनच्या बॅटरीची क्षमता देखील रेंजवर परिणाम करते.

त्यामुळे, ड्रोन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या स्पेसिफिकेशन्स (specifications) आणि रेंजची माहिती घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1200
13
वृत्तपत्रात तर रोज या बद्दल जाहिराती असतात.पण सावधान मशीन कंपनी वाले तुमचा तयार माल घ्यायची हमी दाखवतात व त्यांचे मशीन खपवतात. 
 तुम्हाला OLX वर सेकण्ड वापरलेली मशीन मिळु शकेल.व ज्याच्याकडुन मशीन घ्याल तीच व्यक्ती तुम्हाला माहिती देईल.परंतु तयार केलेल्या मालाचे मार्केटिंग तुम्हालाच करावे लागेल.
उत्तर लिहिले · 2/6/2017
कर्म · 13225