शल्यचिकित्सा
3
Answer link
वैद्यक शास्त्रातील पदवी ही MBBS ची असते म्हणजे Bachelor of Medicine and Bachelor of Surgery. ही पदवी असलेले डॉक्टर औषधे देणे आणि सर्जरी करणे या दोन्ही गोष्टींना पात्र असतात.
परंतु औषधे देणारा डॉक्टर आणि शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर हे वेगळे असतात हे आपण रोज पाहतो. ज्याने एमबीबीएस केले आहे, पण एमडी (म्हणजे औषधे देण्यात पदव्युत्तर) केलेले नाही असे डॉक्टर मेडिसिनची प्रॅक्टिस करताना दिसतात. पण एमएस (शस्त्रक्रियेत पदव्युत्तर) न करता नुसते एमबीबीएस डॉक्टर सर्जरी करताहेत, असे सहसा आढळत नाही. कारण सर्जरीसाठी लागणारा अभ्यास आणि सराव हा अगदी वेगळा आणि प्रदीर्घ आहे.
2
Answer link
जर्मनीतील अल्पोडा गावात कार्ल फ्रेडरिक लुईस डॉबरमन हा सरकारी कर वसुलीदार कार्यरत होता. गावातील भटक्या कुत्र्यांना पकडून निवारा केंद्रात ठेवण्याची जबाबदारीही त्याच्याकडे होती.
लुईसने कुत्र्यांना यासाठी प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. मात्र, ताकद, चपळाई, प्रामाणिकपणा, सोशिकता आणि हुशारी असे सर्व गुण असलेला श्वान आपल्याकडे असावा, अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली. यातूनच मिश्र प्रजातीच्या संगमातून नव्या श्वानाचा जन्म झाला. तोच डॉबरमन. लुईसने संकरित केलेल्या या वंशाच्या कुत्र्यांना मागणी वाढत गेली. वेगासाठी ग्रेहाउंड, जड डोके आणि लहान पाय यासाठी रॉटव्हीलर, ओल्ड जर्मन पिन्श्चर, वेमार्नर, ब्लू डेन, मॅन्चेस्टर पेरियर, इंग्लिश ग्रेहाउंड यांसारख्या निरनिराळ्या जातीपासून हे डॉबरमन जातीचे श्वान बनले आहे.
⚛लुईसकडे डॉबरमन मादीने जन्म दिलेल्या एका पिल्लाला जन्मत:च शेपूट नव्हती. हे शेपूट नसलेले पिल्लू दिसायला आकर्षक होते. तेव्हापासून लुईसने या कुत्र्यांची शेपूट कापण्यास सुरुवात केली आणि आपल्या नावाने शेपूट नसलेल्या कुत्र्यांचा हा ट्रेड मार्क तयार केला. इतरांनी सुद्धा याचे अनुकरण केले आणि आता जगभरात या कुत्र्यांचे शेपूट कापण्याचा ट्रेंड तयार झाला आहे.

0
Answer link
भारतातील सुश्रुत (Sushruta) या वैद्याने मेंदूवरील शस्त्रक्रिया (Brain surgery) पद्धतीची मांडणी केली. सुश्रुत हे प्राचीन भारतीय शल्यचिकित्सक (surgeon) होते आणि त्यांना 'शल्यचिकित्सा जनक' मानले जाते. त्यांनी 'सुश्रुत संहिता' नावाचा एक ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये विविध शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचारांचे तपशीलवार वर्णन आहे.
सुश्रुत संहितेमध्ये, मेंदूवरील शस्त्रक्रियेचे (Brain surgery) वर्णन आढळते, ज्यामुळे त्यांच्या प्रगत वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते.
अधिक माहितीसाठी:
0
Answer link
लॅप्रोक्टॉमी (Laparotomy) ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये ओटीपोट उघडून तपासणी केली जाते.
लॅप्रोक्टॉमी खालील कारणांसाठी केली जाते:
- ओटीपोटात दुखण्याचे कारण निदान करण्यासाठी.
- ओटीपोटातील अवयवांची तपासणी करण्यासाठी.
- काही विशिष्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी, जसे की ट्यूमर (tumor) काढणे किंवा रक्तस्त्राव थांबवणे.
लॅप्रोक्टॉमी ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे आणि ती सामान्य भूल देऊन केली जाते. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस रुग्णालयात राहावे लागते.
5
Answer link
⚀हर्निया झाला म्हणजे नक्की काय झाले हे माहीत नसते. हर्निया या मूळच्या लॅटिन शब्दाचा अर्थ काहीतरी फुटून बाहेर येणे, असा होतो. त्याची सरधोपट व्याख्या एखादा अवयव किंवा त्याचा भाग नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांमधून बाहेर येणे अशी आहे. बहुतांश हर्निया पोटाशी संबंधित असतात. आपल्या पोटातील आतडी किंवा त्याचा भाग त्याच्यावरील मेदाच्या आवरणासहित (omentum) पोटाच्या स्नायूंमधून बाहेर येतो. पोटाच्या खालच्या भागात हर्निया जास्त प्रमाणात आढळून येतात. उदा. जांघेत (७५ टक्के), मांडीच्या अगदीवरच्या भागात (१५ टक्के) आणि बेंबीत (८ टक्के) क्वचित फुप्फुस, मेंदू, स्नायू किंवा चरबी यांचा हर्निया होऊ शकतो.
☙शस्त्रक्रिया मुख्यत: दोन प्रकाराने केल्या जातात.१) पारंपरिक पद्धतीने- ओटीपोटावर छेद घेऊन.
२) लॅप्रोस्कोपिक पद्धतीने.* पारंपरिक पद्धत –ओटीपोटावर खालच्या बाजूने २-३ इंचांचा आडवा छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. यात प्रथम हर्नियाची पिशवी आजूबाजूच्या आवरणापासून सोडवली जाते. पिशवीतील आतडी आणि ओमेंटम सोडवून पोटात पूर्वस्थितीत ठेवलीजातात आणि पिशवीचे तोंड शिवून बंदकेले जाते.कमकुवत स्नायूंना मजबूती आणण्यासाठी हर्नियाच्या पिशवीमुळे दूर गेलेले स्नायू मूळपदावर आणले जातात. (Anatomical Repair) किंवा डबल प्रेस्टिंग केलेजाते आणि हल्ली प्रोलीन मेश बसविली जाते.* लॅप्रोस्कोपिक पद्धत-दुर्बिणीच्या साहाय्याने बेंबीजवळ आणि ओटीपोटात छेद घेऊन अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. पोटाच्या आतून हर्नियाचे छिद्र बुजवून ‘प्रोलिन मेश’ घातली जाते. हर्निया फार मोठा असल्यास किंवा डबलसॅक असल्यास अथवा हर्नियात आतडी अडकून काळीनिळी पडली असल्यास शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते. अडकलेल्या हर्नियात आतडय़ांचा रक्तप्रवाह अडकून ती काळीनिळी पडल्यास, गँगरीनचा भाग कापून काढून आतडी पुन्हा जोडावी लागतात.हर्निया काही कारणाने पुन्हा झाला, तर शस्त्रक्रिया अवघड होऊ शकते. काही वेळा हर्नियाच्या पिशवीत लघवीची पिशवी, मोठे आतडे, अपेंडिक्स, स्त्रियांमध्ये अंडकोष टय़ूब्स हे अवयव येऊ शकतात. याला स्लायडिंग हर्निया असे म्हणतात. शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या हर्नियामध्ये आतील टाकेतुटले असण्याची शक्यता असते, तसेच आतील अवयव व्रणाला चिकटले असण्याची शक्यता असते. यामुळे ही ऑपरेशन्स अतिशय सावधपणे करावी लागतात. पूर्वीच्या ऑपरेशनमुळे स्नायू अशक्त झाल्यामुळे ‘प्रोलीन मेश’ वापरणे अनिवार्य ठरते.
आपण लेप्रोस्कोओपिक पध्दतीने शस्त्रक्रिया करा