कृषी डिप्लोमा
4
Answer link
कृषी शास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या फार मागणी यायला लागली आहे. कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये एक मोठे परिवर्तन झालेले आहे. शेती व्यवसाय तंत्रज्ञानाच्या अंगाने केला तर तो फायदेशीर ठरू शकतो याची जाणीव होत आहे. परंतु शेतीचे तंत्रज्ञान सर्वांनाच माहीत नसते आणि शेतकरीवर्ग आपल्याला माहीत असलेल्या परंपरागत ज्ञानाच्या आधारे जमेल तशी शेती करत असतात.
शेतीला जोडधंद्याची जोड दिली आणि तो व्यवसाय नीट केला तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते हे आता सर्वांनाच जाणवत आहे. त्यामुळे मोठे आणि मध्यम शेतकरी अकुशल शेतमजुरांना शेतात नोकरी देण्याऐवजी असे तांत्रिक ज्ञान घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना प्राधान्य देत आहेत. शेतमजुरांची चणचण भासत असल्यामुळे त्यांच्या पगारीही भरपूर झालेल्या आहेत. म्हणजे कृषी शास्त्रामध्ये बारावीनंतरची पदविका मिळवून अनेक जणांना अशा नोकर्या मिळणे शक्य झाले आहे.
फळबागायती करणारे अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेती शास्त्रातील पदवी आणि पदविकाधारकांना नोकरी देण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी पदविका अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. कर्नाटकात सुद्धा अॅग्रीकल्चर अॅन्ड व्हेटर्नरी युनिव्हर्सिटी या विद्यापीठाने राज्याच्या विविध भागांमध्ये दोन किवा तीन वर्षांचे कृषी पदविका अभ्यासक्रम असलेली तंत्रनिकेतने सुरू केली आहेत. या तंत्रनिकेतनामध्ये आणि महाराष्ट*ातल्या कृषी पदविका विद्यालयांमध्ये शेती, फळबागायती, कुक्कुट पालन, दुग्धव्यवसाय, रोपवाटिका व्यवस्थापन, जल व्यवस्थापन अशा अनेक विषयांचे तांत्रिक ज्ञान दिले जात आहे.
●पुढे काही अभ्यासक्रमांची नावे आहेत.:-
■कृषी पदविका अभ्यासक्रम ■
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद कृषी पदविका अभ्यासक्रम प् करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असतात.
:-अभ्यासक्रमाचे नाव :
1) कृषी तंत्र पदविका ( मराठी माध्यम ) - 02 वर्षे
2) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्ध इंग्रजी माध्यम ) - 03 वर्षे
3) मत्स्य अभितांत्रिकी पदविका ( इंग्रजी माध्यम ) - 3 वर्षे
4) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्धे इंग्रजी माध्यम ) - 2 वर्षे
5) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्धे इंग्रजी माध्यम ) - 1 वर्ष
पात्रता ( Qualification ) :
1) कृषी तंत्र पदविका ( मराठी माध्यम ) - 02 वर्षे - 10 वी उत्तीर्ण
2) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्ध इंग्रजी माध्यम ) - 03 वर्षे - 10 वी उत्तीर्ण
3) मत्स्य अभितांत्रिकी पदविका ( इंग्रजी माध्यम ) - 3 वर्षे - 10 वी उत्तीर्ण
4) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्धे इंग्रजी माध्यम ) - 2 वर्षे - 12 वी विज्ञान
5) कृषी तंत्रज्ञान पदविका ( अर्धे इंग्रजी माध्यम ) - 1 वर्ष - कृषी तंत्र पदविका 2वर्षे कालावधीचा

3
Answer link
⚀म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि.नगर येथे खालील कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-स्र् कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम – कालावधी दोन वर्षे (मराठी माध्यम)स्र् कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम – कालावधी तीन वर्षे (सेमी इंग्रजी माध्यम)आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थी शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत.निवड पद्धती : अर्जदार विद्यार्थ्यांपैकी पात्रताधारक विद्यार्थी- उमेदवारांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणेतर्फे संगणकीय पद्धतीवर आधारित प्रवेशपरीक्षा द्यावी लागते.संबंधित विद्यार्थ्यांची दहावीच्या पद्धतीतील गुणांची टक्केवारी व संगणकीय निवड पद्धतीच्या गुणांकावर आधारित जिल्हानिहाय प्रवेश देण्यात येईल.अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक २५ रु. रोखीने भरल्यास महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या संबंधित जिल्ह्य़ातील अधिकृत केंद्रावर उपलब्ध होईल.अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासहभरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ३०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी १५० रु.) रोखीने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या अधिकृत केंद्रावर भरणे आवश्यक आहे.अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क: अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिकाऱ्यांशी दूरध्वनी क्र. ०२१६७-३०४२०४ वर संपर्क साधावा अथवा महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या http:oasis.mkcl.org/ agridiploma या संकेतस्थळाला भेट द्यावी.