Topic icon

संगणक सुटे भाग

1
   आजच्या काळात सर्वांनाच कॉम्पुटर माऊस ची ओळख आहे. पण माऊस वापरताना तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की माऊस चे Uses नेमके कोणते आहेत. तर चला खाली मी माऊस चे काही महत्त्वाचे कार्ये दिली आहेत.
1) Movement of Mouse Cursor
    माऊस कर्सर ची हालचाल करणे हे माऊस चे प्राथमिक कार्य आहे. आपण जसे माऊस पॅड वर माऊस सरकवतो, तसे स्क्रीन वर असलेला कर्सर सरकतो.
माऊस कर्सर च्या मदतीने डेस्कटॉप स्क्रीनवर कोठेही जाणे शक्य होते. माऊस ची सर्व कामे कर्सर च्या मदतीनेच शक्य होतात, त्यामुळे कर्सर हा माऊस चा सर्वात मुख्य घटक आहे.
2) Selection
माऊस चा वापर करून यूजर कोणतेही Images, Text, Files आणि Folders, सिलेक्ट करू शकतो. व त्यांच्या वर काही क्रिया जसे Cut, Copy, Paste करू शकतो.
आपण कोणताही घटक सिलेक्ट केल्यावर त्याच्या बाजूला एक निळ्या रंगाचा बॉक्स तयार होतो. आणि पुढे आपण माऊस चे Right Click बटन चा वापर करून हवी ती क्रिया करू शकतो.
3) Drag- Drop
संगणकाच्या स्क्रीन वरील कोणतेही घटक आपण माऊस च्या मदतीने कोठेही नेऊ शकतो, या प्रक्रियेला Drag- Drop असे म्हणतात. ते घटक Software, Applications, Files, Folders, Images आणि Videos यापैकी कोणतेही असू शकतात.
Drag- Drop प्रक्रियेत प्रथम ते Object सिलेक्ट करावे लागते आणि हव्या त्या ठिकाणी नेऊन सोडायचे असते. कोणताही घटक सिलेक्ट केल्यावर Left Click बटन दाबून धरावे लागते आणि हव्या त्या ठिकाणी नेऊन सोडावे लागते.
4) Scrolling
आपल्याला जर मोठ्या वेबसाईट किंवा Document वर काम करायचे असेल तर आपल्याला माऊस च्या Scroll बटन ची गरज लागते. माऊस मध्ये दोन्ही क्लिक बटन च्या मध्ये एक उभी फिरकी असते, तिला Scroll बटन असे म्हणतात.
जसे ते Scroll बटन आपण बोटाने फिरवतो, त्यानुसार स्क्रीन वरील Document खाली-वर सरकते. या बटन चा उपयोग नुसता Document साठी नाही तर, Powerpoint, Word, Exel येथे मोठ्या Files बनवताना किंवा वाचताना होतो.
5) Hovering
माऊस कर्सर जेव्हा Clickable घटक जसे Link वर नेला जातो, त्यावेळेस आपल्याला त्याची माहिती दिसते. या क्रियेला Hovering असे म्हणतात.
जर Clickable घटक लिंक असेल तर आपल्याला लिंक चा रंग बदललेला पाहायला मिळेल किंवा लिंक कोणती आहे हि क्लिक न करता सुद्धा समजते.
माहिती श्रोत- माऊस ची माहिती मराठीत- Mouse Information in Marathi

उत्तर लिहिले · 16/4/2021
कर्म · 465
0

तुम्हाला चांगला मॉनिटर (computer monitor) घ्यायचा आहे, हे ऐकून आनंद झाला. मॉनिटर निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, जसे की तुमचा उद्देश काय आहे (गेमिंग, ऑफिस, डिझायनिंग) आणि बजेट किती आहे.

सर्वसाधारण वापरासाठी मॉनिटर:

  • Dell UltraSharp U2422H: हा मॉनिटर ऑफिसमधील कामासाठी उत्तम आहे. याची इमेज क्वालिटी (image quality) चांगली आहे.
  • BenQ GW2480T: हा मॉनिटर डोळ्यांसाठी आरामदायक आहे आणि यात ब्लू लाईट फिल्टर (blue light filter) आहे.

गेमिंगसाठी मॉनिटर:

  • ASUS ROG Swift PG279Q: हा मॉनिटर 144Hz रिफ्रेश रेट (refresh rate) आणि G-Sync तंत्रज्ञानासह येतो, ज्यामुळे गेमिंगचा अनुभव चांगला येतो.
  • BenQ ZOWIE XL2546K: हा मॉनिटर खासकरून eSports साठी डिझाइन (design) केला आहे, जो 240Hz रिफ्रेश रेट देतो.

डिझायनिंग आणि फोटो एडिटिंगसाठी मॉनिटर:

  • BenQ PD2700U: हा मॉनिटर 4K रिझोल्यूशन (resolution) आणि 100% sRGB कलर गॅमट (colour gamut) सह येतो, ज्यामुळे रंग अचूक दिसतात.
  • LG UltraFine 27UL850: हा मॉनिटर USB-C पोर्ट (port) आणि HDR सपोर्ट (support) सह येतो.

तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार निवड करू शकता. मॉनिटर खरेदी करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यू (review) आणि स्पेसिफिकेशन्स (specifications) नक्की तपासा.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980
1
मित्रा olx वर चेक करु शकतोस.......
.......................
उत्तर लिहिले · 19/4/2017
कर्म · 7940