Topic icon

कार्यक्रम

0
आयुष्य म्हणजे काय?
उत्तर लिहिले · 30/11/2023
कर्म · 0
1
आजी आजोबा दिवस दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस जगभरात साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी 'आजी आजोबा' दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी 10 सप्टेंबर, 2023 रोजी 'आजी आजोबा' दिवस आहे.

 : पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा वेळी त्यांची उणीव भरून काढतात ते आजी-आजोबा. आई-वडिलांपेक्षाही लहान मुलांना जवळचे वाटणारे आजी आजोबा आज त्यांचा दिवस. आजी-आजोबा खूप लहान मुलांच्या जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावतात. आजी-आजोबाही त्यांच्या जीवनानुभवातून अनेक गोष्टी मुलांना शिकवतात आणि नातवंडांना जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी ग्रँड पॅरेंट्स डे ) साजरा केला जातो. हा दिवस आजी-आजोबा आणि नातवंडांमधील बंध साजरा करतो.

 या दिवशी मुलं आपल्या आजी आजोबांबद्दल प्रेम व्यक्त करातत. त्यांना खुश ठेवण्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील आजी आजोबांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनेक भेटवस्तू देऊन आजी-आजोबांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.     



मुलांच्या आयुष्यातील आजी-आजोबांचं महत्त्व : 


खरंतर लहान मुलांच्या आयुष्यात आजी-आजोबांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण मुलांना जेव्हा बोलताही येत नाही तेव्हापासून आजी आजोबा त्यांच्या बरोबर असतात. त्यांना बोलायला, चालायला, कसं वागावं आणि कसं वागू नये या गोष्टी शिकवतात. त्याचप्रमाणे लहान मुलं अनेक गोष्टी मोठ्यांकडून शिकतात. त्यांचं अनुकरण करतात. लहान मुलांना संस्कार शिकवण्यापासून ते त्यांना भावनिक आधार देण्यापर्यंत आजी आजोबांचं मुलांच्या आयुष्यात फार मोलाचं स्थान आहे. 



उत्तर लिहिले · 4/2/2023
कर्म · 53720
0

आदर्श विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

नगर, दि. 3: आदर्श विद्यालय, नगर येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित भाषणे व नाटके सादर केली. अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध घटनांचे प्रभावीपणे सादरीकरण केले.

मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाला उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण प्रसार करून महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले.

कार्यक्रमाच्या शेवटी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजात चांगले काम करण्याची शपथ दिली.

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0
वसुंधरा दिन कार्यक्रम पत्रिका

वसुंधरा दिन कार्यक्रम पत्रिका

स्थळ: [स्थळाचे नाव]

दिनांक: [दिनांक]

वेळ: [वेळ]

कार्यक्रमाची रूपरेषा:

  1. सुरुवात: [वेळेनुसार]
  2. स्वागत भाषण: [व्यक्तीचे नाव]
  3. प्रमुख पाहुण्यांचे भाषण: [पाहुण्यांचे नाव]
  4. वृक्षारोपण: [स्थळ]
  5. पर्यावरण संवर्धन বিষয়ক माहिती: [वक्तेचे नाव]
  6. पथनाट्य: [पथनाट्याचे नाव]
  7. बक्षीस वितरण: [विजेत्यांची नावे]
  8. आभार प्रदर्शन: [व्यक्तीचे नाव]
  9. समारोप: [वेळेनुसार]

निमंत्रक: [आयोजकांचे नाव/संस्था]

उत्तर लिहिले · 16/10/2022
कर्म · 0
7
वाढदिवस कसा साजरा करावा
आपल्याकडे वाढदिवस म्हणजे अभीष्टचिंतन करण्याचा म्हणजेच शुभचिंतन करण्याचा दिवस असतो त्यामुळे अर्थातच मेणबत्तीच्या ज्योती विझवून नव्हे तर निरांजनाच्या ज्योती उजळवून आणि औक्षण करून साजरा करण्यात यावा. ज्याचा वाढदिवस आहे त्याला आणि घरातील सर्व सभासदांना कोणते मिष्टान्न आवडते ते करावे आणि सर्वांनी एकत्र बसून आनंद घ्यावा.

वाढदिवस कसा साजरा करावा

वाढदिवस कसा करावा
थोरा-मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी, त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा. तरी शाकंभरी देवी नवरात्राच्या काळात सर्व सेवेकर्यानी जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करून आपले जीवन सुखकर व शांतिमय करावे.

हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा. (इंग्रजी तारखेनुसार नको.) कारण आपली सर्व देव दैवते, साधू संत, ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई-वडिलांचे श्राध्द पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात, म्हणून वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा.वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशिर्वादाने साजरा करावा. ज्यांचा वाढदिवस असेल त्याला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे (हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे). त्या व्यक्तीला अभ्यंग व सचैल स्नान घालावे.
अभ्यंग: सुवासिक तेल लावून.
सचैल: ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान ावी. (स्वतः वापरू नये.), त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे. औक्षण करून ओवाळावे नंतरदोन्ही हातात तांदूळ (अक्षता) घेऊन श्री रामरक्षेतील पहिले ९ श्लोक (या ९ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे.) म्हणून त्या-त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे. समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा. फोटोला नैवे दाखवावा आणि विनंती करावी की, या मुलाला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर.ङ्घ उपस्थितांना गोडधोड खायला ावे. मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये. या पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.

टीप:

आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात. हे अशुभ आहे.केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्न शस्त्राने कापणे हे सुध्दा अशुभ. म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.
उत्तर लिहिले · 29/7/2022
कर्म · 53720
0

ज्ञानसंवर्धन विद्यालय, शिरूर येथे 5 मार्च रोजी आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संस्थेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळाली, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.

ठळक मुद्दे:

  • विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.
  • उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण.
  • विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढ.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1
वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


‘वहिनींचा सल्ला’ हा उषावहिनींचा कार्यक्रम लोकांच्या मनात रुजला आहे. उशावहिनींचे विचार शांत असून त्या सर्वांना नाते जोडायला सांगतात आणि सगळ्यांसोबत जमवून घ्यायला सांगतात. 




' वहिनींचा सल्ला ' हा एकमेव लोकप्रिय कार्यक्रम होता. 
या कार्यक्रमात उषावहिनींने अत्यंत सुंदर काम केले होते. 
त्यांच्या अशा कामामुळे कार्यक्रमाला इतकी लोकप्रियता प्राप्त झाली.



 ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : 
उषावहिनींचे व्यक्तिमत्त्व शांत व सौम्य होते. त्या समतोल असे सल्ला द्यायच्या. ' जोडा, जुळवा, जमवून घ्या, इतरांच्या नजरेतून बघायला शिका ' हेच सूत्र त्यांनी अवलंबिले आहे.







(२) ‘शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम. 


वहिनींचा सल्ला या कार्यक्रमासाठी उषावहिनी उपस्थित नसून त्यांच्या जागी निशावहिनी उपस्थित होत्या. निशावहिनींचे विचार ठोस असून त्यांना चुकीच्या गोष्टी अमान्य होत्या. त्या आत्मविश्वासाला सर्वात जास्त महत्त्व देत असत.




कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्या दिवसाचा खास व महत्वाचा कार्यक्रम दुरदर्शनाच्या स्टुडिओमद्धे न ठेवता शिवाजी मंदिरात आयोजित केला होता. 
त्या कार्यक्रमात समाजातले अनेक मान्यवर व्यक्ति निमंत्रित होत्या. उषावहिनींच्या सत्कार होणार होता. 
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उषावहिनींच्या पायाला जखम झाल्यामुळे त्यांची भूमिका निशाने साकारली होती.

शिवाजी मंदिर येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम याची वैशिष्टे पुढीलप्रमाणे:

शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमामध्ये निशा ही वहिनींच्या जागी उभी होती. ती सदेतोड विचारांची होती. तिला अन्याय खपत नसे. समानतेचा पुरस्कार करणारी होती. स्वतःला स्वतःच महत्त्व द्या. आत्मसन्मान जपा. तिचे विचार धक्कादायक होते, पण मनाला भिडणारे होते.









उत्तर लिहिले · 24/4/2022
कर्म · 1850