Topic icon

कायदेशीर बाबी

0

तुमच्या प्रश्नानुसार, अतिवृष्टी आणि पावसामुळे घर पडल्यास पंचनामा करतेवेळी पंच म्हणून कोणत्या व्यक्ती असाव्यात, याबद्दल काही नियम आहेत. त्या संदर्भात माहिती खालीलप्रमाणे:

पंच कोण असावेत:

  • पंचनामा करण्यासाठी ज्या दोन व्यक्तींची निवड केली जाते, त्या गावातील प्रतिष्ठित आणि নিরপেক্ষ नागरिक असाव्यात.
  • पंच या नात्याने त्यांची भूमिका निष्पक्ष असावी.
  • पंच म्हणून निवडलेल्या व्यक्ती पीडित कुटुंबातील सदस्य किंवा एकाच आडनावाच्या नसाव्यात. कारण त्यामुळे पंचांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

नियमांचे पालन का करावे:

  • पंचनामा हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तावेज असतो.
  • त्यामुळे तो योग्य आणि निष्पक्षपणे होणे आवश्यक आहे.
  • पंचांची निवड নিরপেক্ষSelection of Panchas व्यक्तींमधून केल्यास, पंचनाम्याची विश्वासार्हता वाढते.

या माहितीमुळे तुम्हाला योग्य पंच निवडण्यास मदत होईल.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5400
5
1. सेकंड गाडी घेताना सर्वात पहिले त्या गाडीचा चेसी नंबर पहा आणि तोच चेसी नंबर त्या व्यक्तीकडून आर. सी. बुक घ्या आणि त्या आर. सी. बुकवर पहा. जुळत असेल तर काही प्रॉब्लम नाही. बरेचशे प्रकरण असे आहेत की गाडीवर नंबर आणि आर. सी. बुक वरील नंबर सेम असतो पण चेसी नंबर मात्र वेगळा असतो. त्या गाड्या चोरीच्या असतात आणि दुसरे डॉक्युमेंट जोडतात. 2. त्या गाडीचा इन्शुरन्स पहा. 3. त्या गाडीचा टॅक्स पहा. धन्यवाद!
उत्तर लिहिले · 23/3/2019
कर्म · 625
2
कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात व्यवसाय परवान्याने होते. व्यवसाय करताना व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे व्यवसाय परवाना होय. दुकानाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यासाठी व व्यावसायिक कर्ज प्रकरणे करण्यासाठी हा परवाना महत्त्वाचा असतो. म्हणून कसा काढावा हा परवाना व आवश्यक कागद पत्रे कोणती त्याची माहिती देत आहे
परवान्याची गरज

विविध शासकीय व खाजगी टेंडर/निविदा भरण्यासाठी.

विविध कंपनीच्या तालुका स्तरावरील एजन्सीज मिळविण्यासाठी व्यवसाय दाखला व कमर्शिअल गाळे, दुकानाचा विमा इ.सेवांचा लाभ घेण्यासाठी.

सदर परवानाधारकांनाच मूल्यवर्धित कर नंबर काढता येतो.

ग्रामपंचायत क्षेत्रात शॉप अधिनियमाची आवश्यकता नसते, परंतु गावाची लोकसंख्या 10 हजारपेक्षा जास्त असल्यास शॉप अधिनियम लागते

@प्रक्रिया@

👉 खाली दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून कामगार सहायक आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.

👉 अचूक प्रस्ताव असल्यास किमान नऊ दिवसात व्यवसाय परवाना मिळतो.

👉 दर वर्षी 15 डिसेंबर पूर्वी व्यवसाय परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असते.

👉 नूतनीकरण करताना मूळ परवाना जवळ असावा.

         _*आवश्यक कागदपत्रे*_

👉 जेथे व्यवसाय सुरू आहे किंवा करावयाचा आहे. त्या ठिकाणचे/जागेवरील घेतलेले वीजदेयक/भ्रमणध्वनी तसेच  जागा स्व-मालकीची असेल तर जागेचा उतारा.

👉 जागा भाडेतत्त्वावर असल्यास 100 रुपये स्टॅम्पवर मालकाचे संमतीपत्र.

👉 अर्जदाराचे कूपन झेरॉक्स, दोन फोटो

👉 पॅनकार्ड झेरॉक्स

उत्तर लिहिले · 28/7/2017
कर्म · 210095
1
आपण प्रश्नामध्ये खूप कमी माहिती दिली आहे, तरीही आपण ज्या कोणत्याही प्रकारची कंपनी टाकणार आहेत त्या बाबत थोडं मार्केटमध्ये (बाजारात) चौकशी करा जेणेकरून तुम्हाला त्यातील संधी किती आहे ह्याची माहिती मिळेल, व तुम्हाला काहीतरी एक करावे लागेल कारण जर कंपनी सुरू करणार असाल तर त्याच्या वृद्धीसाठी तुम्हाला संपूर्ण लक्ष त्यामध्ये दिले पाहिजे.
उत्तर लिहिले · 17/4/2017
कर्म · 0