Topic icon

ज्ञानेश्वरी

0
भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन १२९० साली लिहिला.
उत्तर लिहिले · 25/9/2022
कर्म · 283280
0

ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती इ.स. 1290 मध्ये झाली.

हे ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे लिहिलेले भगवतगीतेवरील भाष्य आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2840
0

ज्ञानेश्वरी ही एक अखंड रचना नाही.

ज्ञानेश्वरी, जिला 'भावार्थदीपिका' म्हणूनही ओळखले जाते, ही भगवतगीतेवरील ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली टीका आहे. हे १८ अध्यायांमध्ये विभागलेले आहे, ज्यामध्ये एकूण ९०३३ ओव्या आहेत. त्यामुळे, अध्यायांमध्ये विभागणी असल्यामुळे ती अखंड नाही.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2840
6
अमृतानुभव (मराठी: अमृतानुभव) ही संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे.ती मराठी साहित्यात एक मैलाचा दगड आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांचा स्व-रचित स्वतंत्र ग्रंथ असून त्याला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

'अमृतानुभव' हा ग्रंथ ज्ञानोत्तर भक्तीच्या म्हणजेच भागवत धर्माच्या पायाभूत सिद्धान्ताच्या सिद्धीसाठी लिहिला आहे. 'ज्ञानेश्वरी' नंतर काही दिवसांनी ज्ञानदेवांनी 'अमृतानुभव' हा ग्रंथ लिहिला. त्याचा कालखंड निश्चित स्वरूपात कोणता असावा याविषयी मतभेद असतील. परंतु 'अमृतानुभव' हा ग्रंथ इ. स. १२९० ते १२९६ या कालावधीत लिहिला असावा. ज्ञानेश्वरी हे गीतेचे एक भाष्य आहे. गीतेच्या तत्त्वचिंतनावर स्वत:च्या प्रज्ञेचा स्वतंत्र आविष्कार घडवून 'ज्ञानेश्वरी'च गीता होऊन नटली आहे; पण अमृतानुभवाचे तसे नाही. 'अमृतानुभव' हा ज्ञानदेवांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा स्वतंत्र ग्रंथ आहे. त्याची ओवीसंख्या ८०६ इतकी असून, दहा प्रकरणांत त्याची विभागणी केली आहे. महाराष्ट्र शारदेला तत्त्वविवेचनात्मक ग्रंथाचे जे अलंकार समर्पित केले त्यात 'अमृतानुभव' हा ग्रंथ शिरपेचाप्रमाणे शोभतो.
ब्रह्मसाम्राज्यदीपिका । वर्णियेली गीतेची टीका ।।

या नाथमहाराजांच्या वर्णनाप्रमाणे त्यांनी 'ज्ञानेश्वरी' नावाची गीतेवरील टीका लिहून आपले गुरू निवृत्तीनाथांच्या पुढे ठेवली. निवृत्तीनाथांना मोठा आनंद होऊन त्यांनी ज्ञानदेवांना सांगितले, 'तू गीतेवर उत्तम टीका लिहून 'बोली अरूपाचे रूप दावीन,' ही प्रतिज्ञा पूर्ण केलीस. या ग्रंथाचा जगाला खूप मोठा उपयोग होईल. पण त्या अमृतरूप परमात्म्याचा तुला स्वत:ला काय अनुभव आला, ते तू मला सांग.' ही निवृत्तीनाथांची आज्ञा शिरसावंद्य मानून अमृतरूप परमात्म्याचा जो अनुभव ज्ञानदेवांनी सांगितला, त्याचेच नाव 'अमृतानुभव' होय. या ग्रंथाच्या निर्मितीचे प्रयोजन सांगताना ज्ञानदेवांनी अमृतानुभवाच्या दहाव्या प्रकरणात अनेक ओव्या लिहिल्या आहेत.

परि महेशे सूर्याहाती। दिधली तेजाची सुती।
तया भासा अंतर्वर्ती। जगची केले।।१०-२।।

ईश्वराने तेजाने आणि प्रकाशाचे सूत्र सूर्याच्या हाती दिले; पण त्याने ते केवळ स्वत:पुरते न ठेवता त्या तेजाने सर्व जगाला प्रकाशित केले. तसे माझ्या गुरूंनी माझे निमित्त करून हा ब्रह्मानुभाव जगाला दिला आहे. १) शिव-शक्ती समावेशन, २) श्रीगुरुस्तवन, ३) वाचाऋण परिहार, ४) ज्ञानाज्ञानभेदकथन, ५) सच्चिदानंदपदत्रयविवरण, ६) शब्दखंडन, ७) अज्ञानखंडन, ८) ज्ञानखंडन, ९) जीवनमुक्तदशाकथन, १०) ग्रंथपरिहार या दहा प्रकरणांत ग्रंथाचे विभाजन केले आहे.

अमृतानुभ ग्रंथाच्या आरंभी ज्ञानदेवांनी
यत‌् अक्षरम‌् अनाख्येयम‌् आनंदम‌् अजम‌् अव्ययम‌्।

या श्लोकाने सुरुवात करून संस्कृतचे पाच श्लोक नमनात्मक केले आहेत. ते पाच श्लोक म्हणजे संपूर्ण अमृतानुभवच आहे. या पाच श्लोकांत सद‌्गुरू, ब्रह्मविद्या, प्रकृतिपुरुष (शिव-शक्ती) आणि स्वरूपेकरून परिपूर्ण शंभू यांना वंदन केले आहे. पहिल्याच प्रकरणात देवो-देवी, अर्थात प्रकृतिपुरुष यांचे ऐक्य वर्णन केले असून, अद्वैत सिद्धान्ताच्या पायावर पुढील सर्व ग्रंथाची निर्मिती झाली आहे. अमृतानुभवात ज्ञानदेव अज्ञान न मानता जगाची उत्पत्ती मांडतात. हे एक वेगळेपण आहे. शाब्दिक तत्त्वज्ञानाला त्यात प्राधान्य नाही, तर स्वानुभवाला आहे. अनुभव आणि तत्त्वचिंतन या दोन्ही भूमिकांतून ज्ञानदेवांच्या सिद्धान्तानुभवाचा गाभाच अमृतानुभवातून प्रगट झाला आहे.

धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 29/11/2019
कर्म · 19610
2
३ जून २०१७ रोजी निरुपणाऐवजी ग्रुप डीस्कशन झाले.
खालील प्रश्नांवर चर्चा झाली
१. आत्मा आणि अनात्मा म्हणजे काय ?
२. स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर म्हणजे काय ?
3. पंचकोश म्हणजे काय?
४. व्यष्टी आणि समष्टी म्हणजे काय?
५. मृत्युनंतर नेमके काय होते?
६. जन्म- मृत्यू च्या चक्रात आपण का सापडतो? त्यातून बाहेर येण्यासाठी काय केले पाहिजे?
७.मन सगळ्यात जास्त महत्वाचे का? त्याचे दोष कोणते? त्या दोषांचे निवारण कसे करायचे?
८. साधना करायची म्हणजे नेमके काय?
९. गुरुनी देह ठेवल्यावर ते आपल्याला कसे मदत करतात? गुरुतत्व म्हणजे काय?
१०. जर गुरुतत्व एकाच आहे तर मार्ग भिन्न का?
११. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्ग म्हणजे का?

ह्या सर्व प्रश्नांची चर्चा म्हणजे ज्ञानेश्वरी साधक वर्ग होय
उत्तर लिहिले · 17/12/2017
कर्म · 45560
3
↙धार्मिक  पुस्तके मिळतात त्या  ठिकाणी  मिळतील.
या विषयावर भरपूर पुस्तके उपलब्ध  आहेत.