Topic icon

शिकाऊ परवाना

0
आपण कृपया RTO Exam हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून ह्याचा अभ्यास करावा.
उत्तर लिहिले · 30/9/2019
कर्म · 25
0

लर्निंग लायसन्स (Learning Licence) डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

लर्निंग लायसन्स साधारणपणे अर्ज केल्यापासून 24 तासांनंतर डाउनलोडसाठी उपलब्ध होतो. काहीवेळा जास्त वेळ लागू शकतो.

लर्निंग लायसन्स डाउनलोड करण्याची ऑनलाइन प्रक्रिया:

  1. परिवहन विभागाच्या वेबसाइटला भेट द्या:

  2. ऑनलाइन सेवा (Online Services) निवडा:

    • वेबसाइटवर 'Online Services' विभागात जा आणि 'Driving Licence Related Services' हा पर्याय निवडा.

  3. राज्य निवड:

    • पुढच्या पृष्ठावर आपले राज्य निवडा.

  4. लर्निंग लायसन्स प्रिंट करा (Print Learning Licence):

    • 'Print Learning Licence' चा पर्याय निवडा.

  5. माहिती भरा:

    • अर्ज क्रमांक (Application Number) आणि जन्मतारीख (Date of Birth)required माहिती submit करा.

  6. डाउनलोड करा:

    • लर्निंग लायसन्स डाउनलोड करा आणि प्रिंट करा.

टीप:

  • लर्निंग लायसन्स डाउनलोड करताना काही अडचण आल्यास, परिवहन विभागाच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा.
  • अर्ज भरताना दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सक्रिय (active) ठेवा.

हेल्पलाइन नंबर:Citizen Helpline

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980
0
learners लायसन्स साठी परिवहन मंडळाच्या संकेतस्थळावरून नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला काही कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे. खाली आवश्यक कागदपत्रांची यादी दिली आहे:

ओळखपत्र (Identity Proof):

पत्त्याचा पुरावा (Address Proof):

  • आधार कार्ड (UIDAI)
  • रेशन कार्ड
  • वीज बिल
  • घरपट्टी पावती

जन्मतारखेचा पुरावा (Date of Birth Proof):

  • जन्म दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • एसएससी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट (Passport India)

इतर कागदपत्रे:

  • अर्ज क्रमांक (Application Number)
  • भेटीची पावती (Appointment Receipt)
  • पासपोर्ट साइज फोटो (Passport size photo)

टीप: कृपया, आपल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कागदपत्रांची खात्री करा.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980
11
एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे गुन्हा ठरतो. हा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा, याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांची दलालांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते.

एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे गुन्हा ठरतो. हा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा, याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांची दलालांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. 

 ■ चालक व वाहकांसाठी बॅच बिल्ला देताना त्याचा चारित्र्य अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटार वाहन निरीक्षकांच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे. बॅच बिल्ल्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया



■ सर्वप्रथम चालकाच्या बॅच बिल्ल्यासाठी फार्म एल.पी.एस.ए. (फार्म)मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी वयाची २0 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. बस चालकासाठी (गोल बॅच) तर टॅक्सी चालकासाठी (त्रिकोणी बॅच) काढावा लागतो. दोन्ही बॅचसाठी चालकाकडे टॅक्सी चालकासाठी (हलके मोटार वाहन)चे परिवहन संवर्गातील (एसटी) वाहन चालकाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. हलके मोटार मोटार वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा किंवा मध्यम जड वाहन चालविण्याचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे. चालकाच्या बॅचसाठी ४५0 रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच एसईसी फार्म भरणे गरजेचे आहे. मोटार वाहन निरीक्षकांकडे चाचणीसाठी सादर करावे. या नमुन्यातील फॉर्म भरावा

■ आवश्यक सर्व कायदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे. चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात येतो. 


त्यानंतर उमेदवाराला दोन दिवसांत बॅच बिल्ला मिळू शकतो. यासाठी आवश्यक कागदपत्र

■ उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा■ सोबत फार्म सीबी जोणे (कंडक्टर बॅच अर्ज)■ फार्म एसईसी जोडणे■ जन्म तारखेचा दाखला ■ रहिवासी पुरावा, मतदान कार्ड ■ वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट फॉर कंडक्टर या कागदपत्रांची गरज आहे


कुठे मिळतो बॅचबिल्ला?

■ वाहन चालक-वाहकांसाठी गरजेचा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे मिळतो. यासाठी एसटी व खासगी सार्वजनिक वाहन चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना फॉर्म एसईसी या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करुन घ्यावे लागते. नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन एलपीएसए या नमुन्यातील अर्ज भरावा लागतो. 

उत्तर लिहिले · 27/8/2017
कर्म · 1295
3
लर्निंग लायसन्स ऑनलाईन काढता येत नाही. तेथे प्रत्यक्ष तोच उमेदवार हजर राहावा लागतो.