Topic icon

डिजिटल उपक्रम

3
डिजिटल इंडिया च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील हरिसाल हे गाव महाराष्ट्रातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून साकारण्याचे ठरवण्यात आले आहे. त्या अंतर्गत गावात विविध प्रकाराच्या 18 ई-नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

या संदर्भात अमरावती जिल्हाधिकारी किरण गित्ते, मायक्रोसॉफ्ट चे राज्यातील तंत्रज्ञान प्रमुख प्रशांत शुक्ला आणि इतर संबंधित मंडळींनी या गावाची पाहणी केली.

पाथमिक स्वरूपामध्ये गावात ई-स्किल सेंटर, ई-लर्निंग क्लासरुम, ई-हेल्थ सेंटर, डिजिटल क्लासरुम, ऑनलाईन सेतु केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, क्लाऊड बेस ई-लर्निंग, इ. सेवा सुरू करण्यात आल्या आहे. तसेच सुमारे 18 विविध शासकीय यंत्रणा आणि विभागाकडून येथे डिजिटल उपक्रम साकारल्या जाणार आहे.

या 18 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र; BSNL; आरोग्य विभाग; स्पेशालिटी हॉस्पिटल; एल.व्ही. प्रसाद आय केअर सेंटर, हैद्राबाद; शिक्षण विभाग; चैतन्य सॉफ्टवेअर; कृषि विभाग; व्हि. ॲग्री हैद्राबाद; इंडूस टॉवर; स्कील डेव्हलपमेंट; सेतू, महा ऑनलाईन; पोस्ट ऑफिस; मेळघाट टायगर प्रोजेक्ट; MIDC; धारणी प्रकल्प कार्यालय; CDAC; ब्रीटानिया यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून येणार आहे.

उत्तर लिहिले · 10/4/2017
कर्म · 5520