Topic icon

वर्णविचार

2

व्यंजन : मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.

व्यंजनांचे प्रकार

मराठी भाषेतील व्यंजनांचे पुढील प्रकारांत विभाजन करण्यात येते.

१. स्पर्श व्यंजन

क् पासून म् पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात.

स्पर्श व्यंजनांचा उच्चार करत असताना आपल्या

फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, मूर्धा, दात किंवा ओठ या अवयवांना स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात. त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात
त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात.

उदाहरणार्थ - क्, ख्, ग्, भ्, म् इत्यादी.

२. अनुनासिक

ज्या व्यंजनाचा उच्चार नासिकेतून म्हणजे नाकातून होतो, त्याला अनुनासिक असे म्हणतात.

अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात, त्यामुळे त्यांना पर-सवर्ण असेही म्हणतात. 

उदाहरणार्थ - ङ्, ञ, ण्, न्, म्

३. कठोर व्यंजन

ज्या व्यंजनाचा उच्चार करताना त्याच्यात तीव्रता दिसून येते, त्याला कठोर व्यंजन असे म्हण
दिसून येते, त्याला कठोर व्यंजन असे म्हणतात.

प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने यांचा उच्चार करताना अधिक स्पर्श होतो, त्यामुळे त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात.

उदाहरणार्थ – क्, ख्, च्, छ्, ट्, ठ्, प्, फ् इत्यादी.

४. मृदू व्यंजन

ज्या व्यंजनाचा उच्चार करताना त्याच्यात • सौम्यता, कोमलता आणि मदता am त्याला मृदू व्यंजन असे म्हणतात.

साधारणतः प्रत्येक वर्गातील तिसरे व चौथे व्यंजन यांचा उच्चार करताना थोडासाच स्पर्श होतो, त्यामुळे त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात.
उदाहरणार्थ – ग्, घ्, ज्, झ्, ड्, ढ्, द्, ध्, ब्, भ् इत्यादी.

५. अर्धस्वर / अंतस्थ

ज्या व्यंजनाचा उच्चार जवळपास स्वरासारखाच होतो, त्याला अर्धस्वर किंवा अंतस्थ असे

म्हणतात.

संधी होताना या स्वराच्या जागी व्यंजन आणि व्यंजनाच्या जागी स्वर येतो. GrammarAheadmarathi gram

उदाहरणार्थ - य्, र्, ल्, व्

६. उष्मे / घर्षक

श्, ष, स् यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात.

संधी होताना या स्वराच्या जागी व्यंजन आणि व्यंजनाच्या जागी स्वर येतो.
उदाहरणार्थ - य्, र्, ल्, व्

७. महाप्राण व अल्पप्राण

ह् या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. अशा ह् मिसळून तयार होणाऱ्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात.

श्, ष्, स् यांचा उच्चारही वायुच्या घर्षणाने होतो, म्हणून त्यांनाही महाप्राण असे म्हणतात. head

एकूण १४ वर्ण महाप्राण मानले जातात. उरलेल्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात.

• महाप्राण – ख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, श्, ष, स्, ह्

• अल्पप्राण - क्, ग्, ङ्, च्, ज्, ञ्, ट्, ड्, ण् त्, द्, न्, प्, ब्, म्, य्, र्, ल्, व्, ळ्
उत्तर लिहिले · 16/5/2022
कर्म · 53720
0
ज्या वर्णांचा उच्चार स्वातंत्र्यपणे होत नाही त्यांना व्यंजन म्हणतात.
उत्तर लिहिले · 19/11/2021
कर्म · 25830
0

मराठीमध्ये 'ई' हा दीर्घ स्वर आहे.

उदाहरण:

  • ईश्वर
  • ईमान

तसेच, 'ऊ' हा सुद्धा दीर्घ स्वर आहे.

उदाहरण:

  • ऊर्जा
  • ऊब
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
2
मृदू व्यंजन पुढीलप्रमाणे आहेत: ग, घ, ड, ढ, द, ध, ज, झ, ब, भ
उत्तर लिहिले · 16/1/2021
कर्म · 1215
0
उत्तर:

ङ् हा कंठ्य वर्ण आहे.

कंठ्य वर्ण म्हणजे कंठातून उच्चारले जाणारे वर्ण. ङ् चा उच्चार कंठातून होतो.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980
2
ज्या स्वरांना जीभ दातांच्या मागे स्पर्श करते, उदाहरणार्थ ट, थ, त, द, ध, न, स हे स्वर दंत्य वर्गात मोडतात.
उत्तर लिहिले · 21/7/2019
कर्म · 10535
3
अनुस्वार व विसर्ग यांना स्वरादी म्हणतात, कारण त्यांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते.
उत्तर लिहिले · 10/4/2017
कर्म · 9460