Topic icon

पुनर्जन्म

0

पुनर्जन्माबद्दल लोकांमध्ये अनेक समज आणि गैरसमज आहेत. याबद्दल नक्की काय सत्य आहे हेfinal सांगणे कठीण आहे, कारण हा विषय श्रद्धा आणि विश्वासावर आधारित आहे.

पुनर्जन्माच्या बाजूने काही युक्तिवाद:
  • स्मृती: काही लोकांना त्यांच्या मागील जन्मातील घटना आठवतात, असा दावा केला जातो.
  • समानता: काही जुळ्या मुलांमध्ये आश्चर्यकारक साम्य आढळते, जणू काही ते मागील जन्मात एकत्र होते.
  • आध्यात्मिक अनुभव: अनेक लोक ध्यानाच्या माध्यमातून मागील जन्मातील अनुभव घेत असल्याचा दावा करतात.
पुनर्जन्माच्या विरोधात काही युक्तिवाद:
  • वैज्ञानिक पुरावा नाही: पुनर्जन्म सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
  • स्मृती समस्या: लहान मुले अनेकदा काल्पनिक गोष्टी सांगतात, त्यामुळे त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.
  • मेंदू आधारित जाणीव: काही शास्त्रज्ञांच्या मते, जाणीव ही मेंदूची उपज आहे आणि मेंदूच्या मृत्यूनंतर ती नष्ट होते.

पुनर्जन्म ही एक गुंतागुंतीची बाब आहे. यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेवर अवलंबून असते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

जंगलातील प्राण्यांचा आत्मा अमर आहे की नाही, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. यावर कोणताही निश्चित आणि सार्वत्रिक दृष्टिकोन नाही, कारण तो अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, जसे की:

  • धार्मिक श्रद्धा: विविध धर्मांमध्ये आत्म्याच्या अस्तित्वाविषयी आणि मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी वेगवेगळी धारणा आहे.
  • तात्त्विक विचार: अध्यात्मिक परंपरेनुसार, काही विचारवंत आत्मा अमर आहे असे मानतात, तर काहीजण त्यास केवळ एक जैविक प्रक्रिया मानतात.
  • वैज्ञानिक दृष्टिकोन: विज्ञान आत्म्याच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा देत नाही.

त्यामुळे, 'जंगलातील प्राण्याचा आत्मा अमर आहे का?' या प्रश्नाचे उत्तर तुमच्या वैयक्तिक श्रद्धा आणि दृष्टिकोनानुसार बदलू शकते.

या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी, आपण विविध धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन करू शकता.


उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1
भगवान श्रीकृष्णाने पवित्र भगवद्गीतेमध्ये घोषित केले आहे की ते धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि वाईटाचा नाश करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतील . तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर वाढले पाहिजे.” “सध्या, मी अजूनही लहान आहे. जसजसा मी मोठा होतो, तसतसे मला अनेक भाव (मूड्स) अनुभवायला मिळतील.
श्री कृष्ण भीमाकडे पाहत म्हणाले. “तुम्ही पाहिलेल्या विहिरी कलियुगातील संपत्तीचे प्रतिनिधित्व करतात. त्या विहिरीतील पाण्याप्रमाणे संपत्तीचे समान वाटप होणार नाही. श्रीमंतांकडे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त असेल तर गरीबांना एक तुकडा अन्नासाठी देखील संघर्ष करावा लागेल.
सामान्य गुणधर्म आणि परिणाम म्हणजे आध्यात्मिक दिवाळखोरी, निरर्थक हेडोनिझम, सर्व सामाजिक संरचनेचे पतन, लोभ आणि भौतिकवाद, अनिर्बंध स्वार्थ, क्लेश आणि मन आणि शरीराचे रोग .
उत्तर लिहिले · 22/9/2023
कर्म · 53715
3
पुनर्जन्म होतो माणसांचा, याचे बरेचशे पुरावे वृत्तपत्रातून, युट्यूब, गूगल वरून मिळून जातील. एक विद्यार्थी जो पूर्वी नालंदा विद्यापीठात शिक्षण घ्यायचा, त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याला तेथील सर्व काही गोष्टी अगदी जसेच्या तसे माहीत आहेत. एक मुलगा राजकुमार म्हणून जन्माला आला, तो आधीच्या जन्मी भारतात जीवन जगलेला आहे.
उत्तर लिहिले · 21/1/2021
कर्म · 160
11
Energy never gets destroyed...
Energy takes access through one medium to another
आपल्या शरीरात आत्मा एक ऊर्जा आहे जी शरीर सोडल्यावर एक दुसऱ्या माध्यमात म्हणजे दुसऱ्या शरीरात प्रवेश घेते. शरीर सोडल्यावर आठवणी राहत नाही .आणि या गोष्टी गीता वाचल्यास जास्त चांगल्या समजतील . करण गीता एक प्रकारचं problem solving mannual आहे. यात मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय आहेत.
उत्तर लिहिले · 13/12/2017
कर्म · 3380
9
महोदय
हे लक्षात घ्या, कि आत्ता आपण स्वर्गातच आहात.  ह्या पृथ्वी पेक्षा सुंदर, असुच शकणार नाही स्वर्ग.
स्वर्ग पण इथेच आहे.आणी नर्क पण या पृथ्वी वरच आहे.
सांगतो कस ते.
आज तुम्हाला या पृथ्वी वर मनुष्य देह प्राप्त झालाय तो काय सहजा सहजी नाही मिळालेला. खुप वेदना,दु:ख भोगल्या नंतर मिळालाय.
डिस्कव्हरी चैनेल बघताना?
या पृथ्वी चा एकच नियम.
एकच पोट भरण्यासाठी दुसर्यांला मरायलाच लागते.
तेव्हा मित्रा तु आत्ता स्वर्गातच आहेस.
मनुष्य देही जन्म म्हणजे स्वर्ग आणी इतर प्राण्यांचा नर्क.
आपण सर्वांनी या स्वर्गाचा क्षणा,क्षणा चा आनंद घेवून इतरांना पण आनंद दिला पाहिजे.
जगा आणी जगुद्या.

स्वर्ग,नर्क हे तर माणसाचेच तर्क,वितर्क.

आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर.
हा,हा... पांडवांनी तर या पृथ्वी वरच पंचमहाभुतांनी बनलेल्या शरीरा पासुन सगळ्यांचा आस्वाद घेतला.
त्यामुळे मेल्यानंतर दुसरा देह धारण करायची गरजच उरली नाही.
त्यामुळे ते या पृथ्वी वरचे कर्म
उत्तर लिहिले · 18/11/2017
कर्म · 2370
9
*|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||*
----------------------------------------------

*आपण हिंदु आहोत, माहीती असावी.*

*|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास ||*

*१.) प्रश्न : -  आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय ?*
     *असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात, त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो ?*
    *कृपया नक्की काय असते ?*
-----------------------------------------

*उत्तर :-*
प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे.
यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात, आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ .
अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की , मेलेल्या वेक्तिला संबोधुन मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पहात असतो. तेंव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहीलेला नाहि तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात. आता आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळुन टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात, जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेवुन प्रेताला अपसव्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालतो , यावेळेस एका दगडाने खांद्यावरिल मडक्याला एक भोक पाडतात, अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छाद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात तेव्वा त्या माठाचा फ sss ट् असा आवाज होवुन तो फुटतो यालाच घटस्फोट असे म्हणतात. (आता नवरा जिवंत किवा बायको असतानाच घटस्फोट घेतला जातो) या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथुन जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामधे बांधतात याला अश्मा असे म्हणतात. त्या नंतर प्रेताळा जाळले जाते. आत्मा  हे सगळं पहात असतो , त्याला आपला देह जळताना पाहुन वाईट वाटते, त्याला रडायला येते , (येथे आशी कुणी शंका घेवु नये की आत्मा रडतो का ? तर आत्मा अजुनही चार कोषामधे बद्ध आहे व यात मनोमय कोष असल्यामुळे वासना, भावना असतात) प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो, तो आत्माही आपल्या सोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात, दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो.
घरात दक्षिणेकडे कडे तोंड करुन दिवा लावला जातो याला नमस्कार करुन आलेली मंडळी निघुन जातात. घरातिल माणसं अंघोळ करुन पिठलं भात खायला मोकळी होतात ........
पुढे काय होते ...?
अश्मा घराबाहेर ठेवतात, आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघुन जातात व घरातील मंडळी पिठलं भात खावुन दुःख करित बसतात. पुढे अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर, गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे. लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे ती आपण पुढे पहाणार आहोत.
आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे, आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक, आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात कारण दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो.
त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक, मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पहात असतो, ऐकत असतो. आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं.
या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासगट करावं .
दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेवुन घाटावर जातात तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजे दाढी मिशा व डोक्यावरील केस काढावेत, या घाटावर जो विधि केला जातो तो म्हणजे काय असतो ? या आत्म्याचा प्रवास कसा सुरु होतो व त्याचे पुढे काय होते ते कालच्या लेखात आपण पाहिले की, दहाव्या दिवशी ज्या अश्म्यावर आत्म्याचा वास असतो तो अश्मा घेवुन घाटावर येतात, क्षौर करतात आणि त्या आत्म्याला सद् गती मिळण्यासाठी संस्कार करतात , आता ते संस्कार म्हमजे काय करतात ते पुढे पाहु ----
एकाने शंका विचारली की क्षौर का करतात तर त्याचे उत्तर असे आहे की, जेव्हा आपण एखादे पुण्य कर्म करतो, एखादे व्रत करतो, अनुष्ठाण करतो तेंव्हा क्षौर करावे, कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्मे करावीत. आपण कळत नकळत दररोज अनेक प्रकारची पापं करत असतो आणि आपण केलेली पापे आपल्या देहात आपल्या केसाला धरून घट्ट बसतात म्हणून दर पौर्णिमेला व अमावास्येला प्रत्येकाने क्षौर करावे. अजुनही संन्यासी दर अमावस्या व पौर्णिमेला क्षौर करतात. पण आता केस वाढवायची फँशन आहे, एखाद्या प्रसिद्ध हिरोने डोक्याचा गोटा केला आणि दाढिमिशा भादरल्या की आमचे सगळे हिंदू तरूण आपलं डोकं भादरून मिशी काढून टाकतिल बाप जिवंत असताना सुद्धा .
थोडक्यात एका जीवाला सद् गती देणं हे सुद्धा पुण्य कर्मच आहे.
त्या मागचा दुसरा हेतु हा असतो की, गेलेल्या माणसा बद्दल ची कृतज्ञता, भावना, प्रेम मुंडण करून व्यक्त करण्याची प्रथा आहे. दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्याच्या शेजारी हा अश्मा ठेवतात व मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडामधे विलीन करतात आणि त्याना असे सांगितले जाते की तुमचा दैह जाळुन टाकला आहे, तुमच्या नावाने क्षौर केले आहे आता तुमचे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद् गतीला जा अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजुला नेवुन ठेवतात. जर त्या आत्म्याची वासना कशातच राहिली नसेल तर पटकन् कावळा त्या पिंडाला शिवतो अन्यथा तासंतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येवु देत नाही. कावळा आणि कुत्रा हे दोनच प्राणी असे आहेत की त्याना मृत्यू व आत्मा दिसतो म्हणून कुणी मरणार असेल तर तिथलि कुत्री भेसुर रडतात.
कावळा शिवल्या नंतर मग सगळे त्या अश्म्याला म्हणजे दगडाला अंगठ्या वरून पाणी देतात याला तर्पण असे म्हणतात......
    एकाने प्रश्न विचारला की, अंगठ्या वरूनच पाणी का देतात ?
त्याचे उत्तर असे आहे की, देवाला, ऋषी, आणि पितर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. आपल्या हाताची पाच बोटं आहेत त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट ज्याला तर्जनी म्हणतात, ही दोन बोटे पितरांकरता वापरावीत, मधले बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्या करता वापरावे, करंगळीच्या शेजारचे बोट आनामिका याने देवाला, गुरुंना, साधुसंताना गंध लावावे. म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे, रूषींना तर्पण करताना करंगळी च्या बाजुने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे, आणि पितरांना अंगठ्याच्या बाजुने तिरपा हात करून पाणी द्यावे.
***
एकाने विचारले एक शंका आहे, हल्ली च्या धावपळी च्या जिवनात समजा जर आपल्या अगदी जवळचे कोणी निवर्तले व सुतक असेल तर, सुतक असलेल्या व्यक्तिने सुतकात त्याचे व्यवसाय अथवा कार्यालयात जाऊन त्याचे कर्तव्य करणे जरूरीचे असेल तर त्याने करावे का ??? व त्या संदर्भात व या दरम्यान अन्नग्रहण करणे बाबत योग्य ते यम नियमांच्या बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.

शंका निरसन --------
वरील शंका विचारली आहे त्याचे *उत्तर :-*
सुतकामधे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जावु नये, कुठल्याही देवळात जावु नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही. आपला जो नित्यनियम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडुन ईतर नामजप, कीर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही. नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र जाने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व दहा दिवस घराबाहेर पण जावु नये. सुतकामधे पलंग, गादीवर झोपु नये, चहा सोडुन कुठलेही गोड पदार्थ खावु नये, दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावु नये, अत्तर अथवा स्प्रे पर्फ्युम वापरू नये, नवीन वस्त्र परिधान करू नये, बाकी नित्याचे व्यवहार चालु ठेवावेत. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी, सुतकातील सर्व कपडे धुवावेत, आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे. अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली गंध लावावे .
या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा, व तेराव्या दिवशीचे विधी करावेत .
चवदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नविन टोपी घालावी, खांद्यावर टाॕवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जावुन गाभार्यात तुपाचे निरांजन लावुन ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद् गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व खांद्यावरील उपरणे तेथेच काढुन ठेवावे, लावलेले निरांजन घरी आणु नये.

*☆   सुतक कोणाचे  नसते :::::::*
       
*आधार : निर्णयसिंधु , गरुड पुराण*_
    मरणाच्या इच्छेने खुप उपवास करुन देह ठेवणे, शस्त्राने,विष पिवुन, पाण्यात बुडी घेवुन ,टांगुन घेवुन (फासी घेवुन), पर्वता वरुन उडी मारुन इत्यादी कारणाने मृत असता -आत्महत्या केली असता अशौच नाही म्हणजे सुतक नाही .
     गुरू हत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या त्याज्य व्यक्तीचे दाह कर्म करू नये अथवा त्याचे शौचही पाळु नये
    नास्तीक ,निच कर्म करणारे ,पितृ कर्म जे करत नाहीत अशा कडे जेवन सुद्धा करु नये  तसेच पाणी सुद्धा पिवु नये .
      शास्त्राचा उद्देश सर्वांनी नियमात,चांगले वागावे असा असावा म्हणुनच असे कडक नियम केले असावेत.

*आपण हिंदु आहोत, माहीती असावी म्हणुन हा प्रपंच.*
         🕉अलख निरंजन🕉
               📿आदेश📿
उत्तर लिहिले · 23/4/2017
कर्म · 160