Topic icon

सामाजिक_वर्तन

7
आपल्या ओळखीचे लोकं आपल्याला बघून न बघितल्या सारखं करतात; याची काही कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात:

  • त्यांना काम असेल.
  • ते घाई-गडबडीत असू शकतात.
  • कदाचित त्यांनी पाहीलच नसेल, पण आपल्याला पाहिल्या सारखं वाटले असेल.
  • त्यांची बोलण्याची इच्छा नसेल.
  • त्यांना तुमचा कशाचा तरी राग आला असेल.
  • कदाचित तुम्ही होऊन त्यांना बोलावे, अशी त्यांची इच्छा असेल.

किंवा इतरही कारणे असू शकतात.
उत्तर लिहिले · 22/6/2023
कर्म · 25850
0
HTML मध्ये रूपांतरित उत्तर येथे आहे:

सौजन्यशीलता आजची गरज आहे, याबद्दल काही शंका नाही.

आजच्या धावपळीच्या जीवनात, लोकांमध्ये ताणतणाव वाढला आहे. त्यामुळे, अनेकजण एकमेकांशी आदराने आणि समजूतदारपणे वागत नाहीत. सौजन्यशीलतेमुळे समाजात सलोखा आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.

सौजन्यशीलतेची गरज:

  • सामंजस्य: सौजन्यशीलतेमुळे लोकांमध्ये सामंजस्य वाढते.
  • सकारात्मकता: समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
  • संबंध सुधारतात: व्यक्ती-व्यक्तीमधील संबंध सुधारतात.
  • तणाव कमी होतो: सौजन्यपूर्ण व्यवहारामुळे तणाव कमी होतो.

उदाहरण:

  • बसमध्ये वृद्ध व्यक्तीला जागा देणे.
  • दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे.
  • help करणे.

म्हणून, सौजन्यशीलता केवळ एक चांगली सवय नाही, तर आजच्या जीवनातील एक मूलभूत गरज आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1780
0

शिष्टाचार ही एक कला आहे आणि गरज देखील आहे.

कला म्हणून:
  • शिष्टाचार आपल्याला आपले विचार आणि भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यास मदत करते.
  • हे आपल्याला इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यास मदत करते.
  • हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
गरज म्हणून:
  • शिष्टाचार आपल्याला समाजात चांगले स्थान मिळवण्यास मदत करते.
  • हे आपल्याला व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात यशस्वी होण्यास मदत करते.
  • हे आपल्याला संघर्ष टाळण्यास आणि शांततापूर्ण संबंध राखण्यास मदत करते.

म्हणून, शिष्टाचार ही एक कला आणि गरज दोन्ही आहे. हे आपल्याला एक चांगले व्यक्ती बनण्यास आणि समाजात यशस्वी होण्यास मदत करते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1780
10
सौजन्यशीलता आजची गरज
उत्तर लिहिले · 22/6/2022
कर्म · 440
8
प्रश्नाचे उत्तर येत असेल, तर आपण द्यायचे.. ते लाईक किंवा कमेंट करो अथवा ना करो.. आपण मनावर घ्यायच नाही...  कदाचित त्यांना उत्तर अवडले नसेल... किंवा लाईक केल्याने कर्म वाढते अशीही काही लोकांची मानसिकता असते... असो..आपण आपले काम नित्य नियमाने करावे कशाचीच अपेक्षा न करता... कारण आपण दुसऱ्याची मानसिकता नाही बदलू शकत... 


अतिशय मोठ उत्तर असेल, तर वाचायला वेळ लागतो म्हणून किंवा कंटाळ्यामुळे वाचत नाहीत... मग लाईक काय करणार... प्रश्नही तसे उत्साहवर्धक नसतात... एखाद्या विषयाची माहिती वगैरे विचारली जाते... आपल मत वगैरे तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्याचे प्रश्न ही विचारले जात नाहीत.. 


एखादा प्रश्न विचारला विचारताना खाली सिमीलर प्रश्न येतो पण काही जण लक्षात घेत नाहीत, मग तो प्रश्न डबल होतो... त्याच उत्तर द्यायचे नाही... किंवा आधी दिलेल्याच उत्तराची लिंक द्यायची... 


कोणत्याही प्रश्नाचे उत्तर थोडक्यात, कमी शब्दांत, छोटे आणि सुटसुटीत लिहण्याचा प्रयत्न करावा... जेणेकरून वाचायला कंटाळवाणे किंवा किचकट नाही वाटणार... मुख्य गोष्ट ठळक करावी.. अधोरेखित करावी... 

काही चुकल्यास क्षमस्व... 🙏
उत्तर लिहिले · 7/5/2022
कर्म · 25850
3
माणुसकी दाखवणारे त्रास सोसत नाहीत माणुसकी करणारे त्रास सोसताना आढळतात, ज्यांना कुणी विचारत नाही. दाखवणारेच अधिक चमकत असतात.

• माझं मत आहे की नियती प्रत्येक पावलावर प्रत्येक माणसाची परिक्षा घेत असते. चांगल्या आणि वाईट सर्व दिवसांत. ते तिचं कामच आहे. परिक्षा फक्त संत संज्जनांची घेतली जाते सामान्यांची नव्हे हा आपला गोड गैरसमज आहे. पृथ्वी वर जन्माला आल्या पासून शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला परिक्षा द्यावी लागते. ज्याचा रिझल्ट आपण परमेश्वर जवळ पोहोचल्या नंतर आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच इथे माणूस सहज पापं करतो आणि पचवतो.

• माणुसकी दाखवण्याचं नाटक करणारे इथे ९९ %आणि खरी मदत करणारे १ % भेटतील हे कलीयुगाचं वास्तव आहे. खरी माणुसकी करणाऱ्या व्यक्तीला नेहमी वास्तव जवळुन पहायला मिळतं जे हादरवणारं आहे. इथे सभ्यतेचा आव आणणारे, शोषण करणारे, दुसऱ्यांचा गैरफायदा घेणारे, टॉर्चर करणारे, अपमान करणारे, श्रीमंतीचा फायदा घेणारे, अशा लबाडांच्या अनेक प्रजाती आहेत. पण खरी मदत करणाऱ्याला हा भेदभाव कळत नाही. तो निरपेक्ष मदत करायला जातो आणि पाय मागे खेचणारे, अपमान करणारे, मनस्ताप देणारे अधिक भेटतात. ज्यात ती व्यक्ती, त्यांचं कुटुंब, मुलंबाळं भरडली जातात.

• हा प्रश्न मलाही पडतो, परमेश्वरा तु खरंच अस्तित्वात आहेस का ? की पुराणातच हरवलास ? की मी तुझ्यावरआंधळा विश्वास ठेवते आहे ? आज उघड उघड इतके गुन्हे चालले आहेत. बायका मुलीबाळी लहान मुलं धोक्यात आहेत. तु कुठे आहेस ? हे सगळं कधी थांबणार ? तुझा न्याय कुठे आहे ? घरगुती हिंसाचार, सामाजिक हिंसाचार वाढत चालला आहे. असाच तुझ्या वरचा विश्वास उडाला तर प्रामाणिकपणे कुणीही वर्तन करणार नाही. तेव्हा ह्या त्रासाला ईलाज नाही हे सत्य स्विकारून होईल तितकी मदत आपण इतरांना द्यावी आणि पुढे चलावं हेच बरं.
उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121765
0

जेवण करणाऱ्या लोकांना खूप आग्रह करू नये असे मला वाटते, कारण:

  • अतिआग्रह discomfort निर्माण करू शकतो:

    एखाद्या व्यक्तीला भूक नसेल किंवा तिची जेवणाची इच्छा नसेल, तर वारंवार आग्रह केल्याने तिला discomfort आणि अपराधी वाटू शकते.

  • आरोग्याच्या समस्या:

    काही लोकांना काही विशिष्ट पदार्थांची ऍलर्जी (allergy) असू शकते किंवा काही आरोग्याच्या समस्यांमुळे ते काही पदार्थ खाणे टाळतात. अशा स्थितीत, आग्रहामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.

  • आवडीनिवडी:

    प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला एखादा पदार्थ आवडत नसेल, तर तिला तो खाण्यासाठी आग्रह करणे योग्य नाही.

  • शिष्टाचार:

    अतिआग्रह करणे हा शिष्टाचाराचा भाग मानला जात नाही. पाहुण्यांना त्यांच्या मर्जीनुसार जेवण करू देणे हे अधिक योग्य आहे.

त्यामुळे, लोकांना त्यांच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार जेवण करू द्यावे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1780