Topic icon

पाणी शुद्धीकरण

0
रेन वॉटर हार्वेस्टिंग ही एक खूप सोपी पद्धत आहे. कमी खर्चात पावसाचं पाणी फिल्टर करण्याची. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला संपर्क करा..👍
उत्तर लिहिले · 28/12/2020
कर्म · 160
0

पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी टाकीमध्ये 30,000 लिटर पाण्यात किती ग्राम ब्लिचिंग पावडर टाकावे हे पाण्याचे प्रदूषण आणि ब्लिचिंग पावडरमधील क्लोरीनच्या प्रमाणावर अवलंबून असते. साधारणपणे, 30,000 लिटर पाण्यात 150 ते 300 ग्राम ब्लिचिंग पावडर पुरेसे आहे.

इतर माहिती:

टीप:

  • पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर, ते व्यवस्थित ढवळा आणि 30 मिनिटे तसेच ठेवा.
  • पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी क्लोरीनची पातळी तपासा.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5060
3
*💁‍♂घरी फिल्टर नसेल तर पाणी शुद्ध करण्याचे 'हे' घरगुती उपाय ट्राय करा!*

👍आजकाल जास्तीत जास्त घरांमध्ये पाणी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे फिल्टर असतातत. पण यातून जेवढ जास्त पाणी शुद्धा होऊन मिळतं, त्यापेक्षा अधिक पाण्याची नासाडी होते. सध्या अशी स्थिती आहे की, थेंब थेंब पाणी वाचवणं गरजेचं आहे. विचार करण्यासारखी बाब ही आहे की, जेव्हा हे पाण्याचे फिल्टर नव्हते, तेव्हा लोक पाणी शुद्ध करण्यासाठी काय उपाय करत होते? तेव्हा पाणी शुद्ध करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जात होते. आज आम्ही तुम्हाला तेच घरगुती उपाय सांगणार आहोत.

*🍀निर्गुंडी -* निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. एका मडक्यात पाणी भरून त्यात निर्गुंडीची पाने ३० मिनिटांसाठी टाकून ठेवा. हे पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्यी निरगुडीचा समावेश होतो.

*▪निर्मलीच्या बीया -* निर्मली झाडाचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. या झाडाच्या बीया बारीक करून पाण्यात टाका. या बीया पाण्यात २ ते ३ तासांसाठी तशाच राहू द्या. याने पाणी शुद्ध होईल.

*🌱शेवग्याच्या शेंगा आणि तुळस -* पाण्याच्या मडक्यात शेवग्याच्या शेंगा आणि तुळशीची काही पाने टाका. हा दूषित पाणी शुद्ध करण्याचा एक चांगला उपाय मानला जातो.

*🍇जांभुळ आणि अर्जुन झाडाची साल -* दूषित पाण्यात जांभुळाच्या आणि अर्जुन झाडाची साल सोबतच काही तुळशीची पाने टाकून रात्रभर ठेवा. सकाळी पाणी गाळून एका भांड्यात भरा. याने पाणी शुद्ध होतं.

*☀सूर्याची किरणे -* दूषित पाणी उन्हात ठेवा. सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे पाण्यातील कीटाणू नष्ट होतात. हे पाणी नंतर पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.

*🍋लिंबाचा रस -* नळाचं पाणी शुद्ध करण्यासाठी त्यात लिंबाचा रसाचा वापर केला जाऊ शकतो. पाण्यात असलेला बॅक्टेरिया लिंबाच्या रसाने ३० मिनिटात नष्ट होऊ शकतात.
उत्तर लिहिले · 5/6/2019
कर्म · 569265
0

ज्या भांड्यात पाणी साठवले जाते, त्या जारमधील पाणी शुद्ध करण्यासाठी 'क्लोरिनच्या गोळ्या' (Chlorine tablets) वापरल्या जातात.

इतर पर्याय:

  • लिक्विड क्लोरीन: हे पाण्यात मिसळून जंतुनाशक म्हणून वापरले जाते.
  • पोटॅशियम परमॅंगनेट: हे देखील जंतुनाशक आहे आणि पाणी शुद्ध करण्यासाठी वापरले जाते.

टीप: औषध वापरण्यापूर्वी, बाटलीवरील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5060
8
पाणी गाळण्यातून किंवा पातळ कपड्यातून गाळून घ्या. ही क्रिया दोन-तीन वेळा करा. म्हणजे पाण्यातील गाळ गाळण्यात/कपड्यात जमा होईल. त्यानंतर या पाण्यात तुरटी फिरवून परत पाणी गाळा. मग हे गाळलेले पाणी उकळवून गार करून परत गाळून घ्या. जर काही गाळ शिल्लक राहिला असेल तर गाळण्यात जमा होईल. अशा प्रकारे प्रक्रिया केलेले पाणी शुद्ध व पिण्यायोग्य होईल.
उत्तर लिहिले · 11/7/2018
कर्म · 91105
18
खरं तर सर्वात सोपा उपाय हां तुरटी पाण्यात टाकणे असा होय...तुरटी पाण्यात टाकली की सर्व गाळ खाली बसून जातो...आणि दूसरा उपाय म्हणजे क्लोरीन पावडर...
परंतु यांचेही दुष्परिणाम होतात...म्हणूनच तुरटी, क्लोरीन पावडर यांचा अतिरिक्त वापर केल्यावर शरीराला हानी पोहोचण्याची शक्यता आहे...
आणि म्हणूनच, पिण्याचे पाणी हे उकळुन प्यावे...हा सर्वात उत्तम उपाय आहे...सामान्यतः घरात कौटुंबिक संख्या जास्त असेल तर पिण्याचे पाणी दररोज उकळण्यासाठी थोड़ी फार तर समस्या होते आणि गॅसदेखील लवकर संपतो...
शक्यतो आपण घरातील पिण्याचा एक हंडा रात्रीच्या वेळेस किमान  पाण्याला उकळी येईपर्यंत गरम करावे...सकाळी हंडयातील पाणी थंड झालेले असेल...तेव्हा फ्रिज मधील बाटल्यांमध्ये ते पाणी भरून ठेवावे...याने कोणतेही शरिरास हानी पोहोचणार नाही...
उत्तर लिहिले · 23/9/2017
कर्म · 458580
0
div style='font-family: Arial, sans-serif;'>
निश्चितच, पिण्याचे पाणी शुद्ध आणि क्षारमुक्त बनवण्यासाठी काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • उकळणे:

    पाणी उकळणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पाणी किमान 20 मिनिटे उकळल्याने त्यातील हानिकारक जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात.

  • गाळणे:

    Filter वापरून पाणी गाळून घ्या. बाजारात विविध प्रकारचे फिल्टर उपलब्ध आहेत, जसे की ceramic filters आणि activated carbon filters.

  • सूर्यप्रकाश:

    SODIS (Solar Water Disinfection) पद्धतीने पाणी शुद्ध करता येते. यासाठी, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून त्या 6 तास उन्हात ठेवा. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती उपलब्ध आहे.

  • क्लोरीनचा वापर:

    पाण्यात क्लोरीनच्या गोळ्या किंवा liquid chlorine टाकून पाणी शुद्ध करता येते. पण, हे प्रमाण योग्य असावे.

  • तुरटी:

    तुरटी (Alum) पाण्यात फिरवल्याने पाण्यातील माती आणि इतर कण खाली बसतात आणि पाणी स्वच्छ होते.

टीप: हे उपाय घरगुती पातळीवर आहेत. पाण्याची गुणवत्ता तपासून घेण्यासाठी प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5060