Topic icon

रक्त संक्रमण

4
शरीरातील अवयवात जर जंतूंनी प्रवेश केला असेल, तर कधी कधी ते जंतू रक्तात प्रवेश करतात व त्यामुळे ब्लड इन्फेक्शन होते. अशा वेळी अँटिबायोटिक्स घेऊन इलाज करता येतो. परंतु अशा वेळी स्वतःच्या बुद्धीने इलाज करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (ब्लड इन्फेक्शन झाल्याचे कसे ओळखावे व उपाय करावे याविषयी मला माहिती नाही).
उत्तर लिहिले · 13/4/2018
कर्म · 91105
4

ज्या व्यक्तीला रक्त द्यायचे आहे त्याचा रक्तगट आणि रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचा रक्तगट एक असणे गरजेचे असते.

काही दिवसांपूर्वी O निगेटिव्ह हा रक्तगट असणारी व्यक्ती वैश्विक रक्तदाता म्हणजेच Universal Donor म्हणून ओळखला जात होता. म्हणजेच O - रक्त सर्व रक्तगटांना चालत होते, परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात O - रक्तात काही अँटीबॉडीज असू शकतात कि ज्याने दुसऱ्या रक्तगटाच्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो - संदर्भ

म्हणजेच O निगेटिव्ह रक्त दुसऱ्या रक्तगट असणाऱ्या व्यक्तीस देणे धोकादायक ठरू शकते. म्हणून रक्तगट जुळत असेल तरच रक्त द्यावे अन्यथा रिएक्शन होऊन आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. असे असूनही इमर्जन्सी परिस्थितीत O - रक्त दुसऱ्या रक्तगटासाठी चालू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उदा. ए + (पॉझिटिव्ह) व्यक्तीला रक्त द्यायचे असल्यास ए + रक्त लागते. B+ve व्यक्तीला B+ve रक्त चालते. दुसरे रक्त दिल्यास रक्तात गाठी होऊन मृत्यू येऊ शकतो.


रक्तगटाबद्दल अधिक माहितीसाठी खालील उत्तर वाचा:

Blood ग्रुप बद्दल माहिती पाहिजे, ब्लड ग्रुप म्हणजे नेमके काय ?

उत्तर लिहिले · 3/1/2017
कर्म · 15105