
संयुक्त उपक्रम
5
Answer link
Joint venture म्हणजे तुम्हाला एखादे project किंवा contract भेटले आहे, पण तुमच्याकडे पुरेसे भांडवल नाही. अशा वेळी तुम्ही अजून एका company ला किंवा contractor ला घेऊन एक joint venture स्थापन करता आणि project पूर्ण करता. शेवटी झालेला नफा वाटून घेता आणि joint venture ज्या कामासाठी केले होते, ते काम पूर्ण झाल्यावर joint venture बंद करतात. यालाच joint venture असे म्हणतात.
5
Answer link
Venture या शब्दाचा अर्थ होतो जोखीम घेणे, किंवा धाडस करणे. बिझनेस म्हणजे देखील एक धाडसच आहे आणि बिझनेसच्या क्षेत्रात हा शब्द जास्तच प्रसिद्ध झाला आहे.
१) व्यवसाय सुरु करणाऱ्या पार्टीची संख्या
२) जॉईंट व्हेंचर जिथे सुरु करायचे ते भौगोलिक क्षेत्र, तयार करणारे प्रोडक्ट, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान इत्यादी
३) पार्टीचा जॉईंट व्हेन्टचर मधील सहभाग
४) रचना
५) सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट आणि मालकी हक्क वाटून घेणे
६) आर्थिक करार
अश्या आणखी काही गोष्टीसाठी दोन किंवा अधिक पार्टीचे व्यवसायासाठी एकमत झाले तरच जॉईंट व्हेंचर बिझनेस सुरु होतो.

उदाहरणार्थ भारतातील Indian Oil PETRONAS Private Ltd. हि कंपनी Indian Oil, पेट्रोनास या दोन कंपन्यांचे जॉईंट व्हेंचर आहे.