
क्रिप्टोकरन्सी
2
Answer link
क्रिप्टोकरन्सी बद्दल संपूर्ण माहिती | Cryptocurrency Information in Marathi

Cryptocurrency ही एक डिजिटल क्रिप्टोग्राफिक करन्सी आहे, तसेच डिजिटल असेट्स सुद्धा आहे. जिचा वापर वस्तुंच्या खरेदी आणि विक्री साठी तसेच वेगवेगळया प्रकारच्या सेवेसाठी केला जात असतो. अणि इंटरनेट च्या माध्यमातुन ह्या करन्सी चा वापर हा दैनंदिन करन्सी च्या स्वरूपात तसेच इतर आँनलाईन सेवा तसेच सुविधा खरेदी आणि विक्री करण्यासाठी केल्या जाऊ शकतो.

या डिजिटल करन्सी मध्ये कोणत्याही देशाच्या सरकारचा, कोणत्याही एजंसी, बोर्डाचा कुठलाही अधिकार नसतो म्हणून हि एक विकेंद्रित करन्सी म्हणून ओळखल्या जाते. त्यामुळेच या Cryptocurrency ची व्हॅल्यू नियंत्रित केल्या जाऊ शकत नाही.
जगातील टॉप क्रिप्टोकरन्सी । Top Cryptocurrency in the World
तसे पाहायला गेले तर Cryptocurrency जगात भरपुर प्रमाणात उपलब्ध आहेत पण त्यापैकी काही क्रिप्टोकरन्सी विषयी पुढील प्रमाणे जाणुन घेऊया.
- Bitcoin | BTC
- Dogecoin | DOGE
- Ethereum | ETH
- Litecoin
- Shiba Inu | SHIB
- Ripple |XRP
- Cardano | ADA
- Tether | USDT
- Solana | SOL
क्रिप्टोकरन्सी चे फायदे
- Cryptocurrency चा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे यात फसवणुक होण्याची शक्यता खूपच कमी असते.
- क्रिप्टोकरन्सी मध्ये अकाऊंटची सुरक्षितता खुपच जास्त असते. अणि ह्यासाठी यात वेगवेगळया Cryptography Algorithm चा देखील यात वापर केलेला असतो.
क्रिप्टोकरन्सी चे नुकसान
- Cryptocurrency मध्ये एकवेळा व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराला रिव्हर्स करता येत नाही.
- क्रिप्टोकरेंसी चा Wallet चा ID हरवला तर आपल्याला आपल्या वॉल्लेट मधील रक्कम काढता येत नसते.
अशाप्रकारे आपण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? त्याचे फायदे आणि नुकसान, क्रिप्टोकरन्सी कसे कार्य करते? इत्यादी गोष्टींबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलीच आहे.
जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी बद्दल सविस्तरपणे माहिती हवी असेल तर आमच्या मराठी स्पिरिट ब्लॉग पोस्ट ला नक्कीच व्हिझिट करा आणि लेख आवडल्यास कंमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या माहीतीचा लाभ घेता येईल.
3
Answer link
क्रिप्टोकरन्सी म्हणजे क्रिप्टो चलन हे जरा वेगळे आहे. आपण त्या चलनाला पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. कारण क्रिप्टो चलन हे प्रत्यक्ष स्वरूपात छापलेले नसते. म्हणून त्याला आभासी चलन असे म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून क्रिप्टो चलनात फार प्रमाणात वाढ होत आहे.
क्रिप्टोकरन्सी काय आहे?
क्रिप्टोकरन्सीला मराठी मध्ये आभासी चलन (Virtual currency) असे म्हणतात. पहिली बिटकॉइन २००९ मध्ये सातोशी नाकामोटो यांनी तयार केली होती. ह्याचा वापर करून आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवू शकतो. क्रिप्टोकरन्सी हे चलन संगणकाचा वापर करून बनवलेले चलन आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक स्वतंत्र चलन आहे व त्याचा कोणीही मालक नाहीय.
रुपये, डॉलर, युरो, जापानी येन किंवा इतर चलनांप्रमाणेच हे चलन कोणत्याही देशाचे किंवा कोणत्याही सरकारचे चलन नाही आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे ज्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. सामान्यत: याचा वापर वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.
या चलनाच्या मदतीने पैसे खूप सहज लपविले जाऊ शकतात. ह्याच्या वापरासाठी कोणत्याही बँक किंवा इतर सरकारी संस्थेला भेट देण्याची गरज नसते. म्हणून क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने आपले पैसे सहज लपविले जाऊ शकतात. हे डिजिटल चलन “पिअर टू पिअर इलेक्ट्रॉनिक” (PEER TO PEER Electronic) पद्धतीने कार्य करते. याचा उपयोग इंटरनेटच्या मदतीने करता येतो.
क्रिप्टोकरन्सी चे किती प्रकार आहेत?
1. बिटकॉइन (Bitcoin)
बिटकॉइन ही जगामधली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. २००९ मध्ये सतोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीने श्वेतपत्रिका ऑनलाइन प्रकाशित केली. तथापि नंतर हे उघड झाले की सतोशी नाकामोटो हे त्या व्यक्तीचे खरे नाव नव्हते.
आजही कोणालाही बिटकॉइनच्या निर्मात्याचे खरे नाव माहित नाहीय. त्यावेळी कोणालाही माहित नव्हते की बिटकॉइन चा आज किती प्रमाणात वापर होणार आहे ते.
बिटकॉइन ही एक डिजिटल करंसी आहे, त्याचा उपयोग ऑनलाइन वस्तु खरेदी करण्यासाठी केला जातो किंवा कोणालाही पैसे पाठवण्यासाठी केला जातो. ही एक विकेंद्रित करंसी आहे आणि सरकार किंवा कोणत्याही देशाचा ह्यावर हक्क नाही आहे.
▪️बिटकॉईन काय आहे? बिटकॉईन चे फायदे आणि तोटे!
2. लिटकॉइन (Litecoin)
बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉइन लॉन्च करण्यात आले. बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉईन २०११ मध्ये लाँच केले होते. इतर क्रिप्टोकरन्सीं प्रमाणेच लिटकॉइन हे एक ओपेन स्त्रोत आहे, ग्लोबल पेमेंट नेटवर्क आहे जे पूर्णपणे विकेंद्रित आहे, म्हणजे सरकारचे कोणतेही केंद्रीय अधिकारी नाहीत.
लिटकॉइन एक पीअर-टू-पीअर क्रिप्टोकरन्सी आणि मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर प्रकल्प आहे. चार्ली ली (Charlie Lee) ह्याने लिटकॉइन ची निर्मिती केली आहे. चार्ली ली हा गूगल ह्या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी करणारा एक कर्मचारी आहे.
बिटकॉइन आणि लिटकॉइन मधला फरक:–
असे मानले जाते की लिटकॉइन च्या साहाय्याने सर्वात वेगवान व्यवहार करू शकतो.
बिटकॉइनची नाणे (coin) मर्यादा २१ दशलक्ष (Million) आहे आणि लिटकॉइन ची ८४ दशलक्ष आहे.
हे वेगवेगळ्या अल्गोरिदमवर काम करते, लिटकॉइन
“स्क्रिप्ट” वर आणि बिटकॉइन “SHA-२५६” वर काम करत आहे.
3. एथेरियम (Ethereum)
२०१५ मध्ये एथेरियम तयार करण्यात आले. एथेरियम हा एक प्रकारचा क्रिप्टोकर्न्सी आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरियमचे एथेर (ETH) नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत.
जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरियम मध्ये बर्याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे आणि जगात कोणासही त्वरित पाठवले जाऊ शकते. एथेरियम पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जगभरातील लोक ETH चा उपयोग पेमेंट करण्यासाठी केला जातो.
▪️
4. रिपल (Ripple)
रिपल हे २०१२ मध्ये रिलीझ झाले होते. जी आर्थिक व्यवहारांसाठी क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल पेमेंट नेटवर्क दोन्ही म्हणून काम करते. हे एक जागतिक सेटलमेंट नेटवर्क आहे जे पैसे हस्तांतरित करण्यासाठी वेगवान, सुरक्षित आणि कमी किंमतीची पद्धत तयार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
रिपल कोणत्याही प्रकारच्या चलनाला एक्सचेंज करण्याची परवानगी देते. यूएसडी (USD) आणि बिटकॉइन पासून ते सोने व EUR पर्यंत आणि अन्य चलनांपेक्षा बँकांशी जोडते. रिपल इतर प्रकारच्या डिजिटल चलनांपेक्षा वेगळे देखील आहे कारण त्याचे प्राथमिक लक्ष मोठ्या प्रमाणात पैसे हलविण्याऐवजी व्यक्ती-ते-व्यक्तीच्या व्यवहारावर नाही.
5. बिटकॉइन कॅश (Bitcoin Cash)
बिटकॉइन कॅश हा डिजिटल करन्सीचा एक प्रकार आहे. जो बिटकॉइनची विशिष्ट वैशिष्ट्ये सुधारित करण्यासाठी तयार केला गेला आहे. बिटकॉइन कॅशने ब्लॉक्सचा आकार वाढविला, ज्यामुळे अधिक व्यवहारावर वेगवान प्रक्रियेणे होऊ शकतील.
▪️ एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजे काय? त्याचे कोण कोणते फायदे आहेत?
6. झेकॅश (Zcash)
झेकॅश हे डिजिटल चलन आहे. जे मूळ बिटकॉइन कोडबेसवर तयार केले गेले होते. हे चलन एमआयटी जॉन्स हॉपकिन्स आणि इतर सन्मानित शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांनी मिळून तयार केले आहे. हे विकेंद्रित ब्लॉकचेनवर तयार केले गेले.
झेकॅश मधील मुख्य वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणजे ह्यामध्ये गोपनीयतेवर खूप जोर दिला आहे. प्रेषक, प्राप्तकर्ता किंवा व्यवहार केलेल्या रकमेची माहिती न देता वापरकर्ते झेकॅश पाठवू आणि प्राप्त करू शकतात.
7. मोनेरो (Monero)
मोनेरो हे एक सुरक्षित, खाजगी आणि अप्रत्याशित चलन आहे. मोनेरो ही मुक्त स्रोत क्रिप्टोकरन्सी एप्रिल २०१४ मध्ये लाँच करण्यात आली होती. पण काहीच कालावधीत क्रिप्टोग्राफी समुदाय आणि उत्साही लोकांमध्ये याचा खूप रस निर्माण झाला.
या क्रिप्टोकरन्सीचा विकास पूर्णपणे देणगी-आधारित आणि समुदाय-आधारित आहे. विकेंद्रकरण आणि स्केलेबिलिटीवर जोरदार लक्ष केंद्रित करून मोनेरो ही करंसी सुरू करण्यात आली आहे आणि रिंग सिग्नेचर या विशेष तंत्राचा वापर करून संपूर्ण गोपनीयता सक्षम करण्यात आली आहे. त्यामुळे ही करन्सी जास्तीत जास्त लोकप्रिय झाली.
8. स्टेल्लर (Stellar)
जेड मॅककालेब (Jed McCaleb) यांनी मुक्त-स्त्रोत नेटवर्क स्टेल्लर स्थापना केली आणि २०१४ मध्ये स्टेल्लरचे मूळ चलन तयार केले.
स्टेल्लर हे एक मध्यस्थ चलन आहे, जे चलन विनिमय सुलभ करते. Steller वापरकर्त्यास त्यांची स्वतःची कोणतीही चलन वेगळ्या चलनात असलेल्या कोणाकडे पाठविण्याची परवानगी दिली जाते.
▪️
क्रिप्टोकरन्सीचे फायदे
क्रिप्टोकरन्सी नॉर्मल डिजिटल पेमेंट पेक्षा सुरक्षित आहे.
यामधून व्यवहार करताना खूप कमी फी आकारली जाते.
यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूप प्रमाणात असते.
क्रिप्टोकरन्सी बनवताना वेगवेगळ्या अल्गॉरिथ्मचा उपयोग केला जातो, त्यामुळे अकाऊंट खूप सुरक्षित राहते.
यामध्ये सरकारचे कोणतेही कंट्रोल नसते, त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचे मार्केट २४×७×३६५ चालू असते.
क्रिप्टोकरन्सी मधून तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्ती ला जलद गतीने पैसे पाठवू शकता.
क्रिप्टोकरन्सीचे तोटे
यामध्ये कोणत्याही प्रकारचे नियम आणि कायदे नाही आहेत. प्रत्येक देशामध्ये क्रिप्टोकरन्सीचे वेगवेगळे नियम आहेत, त्यामुळे यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूप प्रमाणात आहेत.
क्रिप्टोकरन्सी मधून एकदा व्यवहार (transaction) केल्यावर ते रिव्हर्स करने अशक्य आहे. कारण ह्यामध्ये पेमेंट रिव्हर्स करण्याचा कोणताही ऑप्शन उपलब्ध दिलेला नाहीय.
क्रिप्टोकरन्सी ही स्थिर नाहीय. कारण बिटकॉइन चा दर हा रोज वर खाली होत असतो. त्यामुळे कधी नफा तर कधी तोटा होतो.
यामध्ये रोज चोरी, फसवणूक, हॅक्स आणि पैशांच्या गैरव्यवहाराचा प्रकार खूप जोरात सुरू आहे.
क्रिप्टोकरन्सी मध्ये कोणत्याही सरकारचे किंवा बँकेचे कंट्रोल नसते, त्यामुळे जर आपली कधी फसवणूक झाली तर आपला कोणाशीही संपर्क साधू शकत नाही.
2
Answer link
Cryptocurrency म्हणजे काय? जाणून घ्या १० खास गोष्टी
Cryptocurrency म्हणजे काय?
सर्वोच्च न्यायालयाने आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) वापरावर लावण्यात आलेली बंदी उठवली असून व्यवहारात वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एप्रिल २०१८ मध्ये बिटकॉइनसारख्या आभासी चलनाच्या ट्रेडिंगवर बंदी आणली होती. आरबीआयने बिटकॉइन तसंच इतर आभासी चलनांसंबधी नियम अत्यंत कठीण केले होते. यावेळी त्यांनी बँक आणि इतर आर्थिक संस्थांना कोणत्याही सेवा देण्यापासून बंदी आणली होती मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे. पण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? त्याचा इतिहास काय आहे? यासंदर्भात अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊयात त्याचबद्दल…
आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.
२००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली.
एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या.
अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.
कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे.
अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते.
‘बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे. मागील वर्षी (२०१९) एप्रिल मे महिन्यामध्ये एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास ९ हजार डॉलरइतके पोहोचले होते. भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास सहा लाख सहा हजार रुपये इतके आहे.
‘बिटकॉइन’सारख्या सर्वच आभासी चलनांच्या घोडदौडीचे आणखी एक उदाहरण भारताच्याच अनुषंगाने देता येईल. २८ एप्रिल २०१९ रोजी एका बिटकॉइनचे मूल्य ३ लाख ६० हजार रुपये इतके होते. तेच मुल्य २८ मे २०१९ रोजी ६ लाख ६ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, जर एखाद्याने एप्रिलमध्ये खरेदी केलेला एक बिटकॉइन मेमध्ये विकला तर महिनाभरात त्याला तब्बल तीन लाख रुपयांचा घसघशीत नफा कमवता आला असेल.
तर असं हे आभासी चलनाचं वाढतं साम्राज्य. आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे.
साहजिकच फेसबुकने हे ताडले आणि या नव्या उद्योगात शिरकाव करण्याचा निर्णय घेतला. तसं तर फेसबुकने दहा वर्षांपूर्वीही ‘फेसबुक क्रेडिट’ हे आभासी चलन जारी केले होते.
फेसबुकवरून खेळल्या जाणाऱ्या गेम्स किंवा वापरल्या जाणाऱ्या अॅपमधील खरेदीसाठी ‘फेसबुक क्रेडिट’चा वापर करता येत होता. त्या वेळी एका डॉलरला दहा फेसबुक क्रेडिट मिळत होते. मात्र, ‘फेसबुक क्रेडिट’ वापरकर्त्यांच्या पचनी पडले नाही. याची दोन कारणे होती. एक म्हणजे, त्या काळी फेसबुक आजच्याइतके जगभरात रुजले नव्हते आणि दुसरे म्हणजे, तोपर्यंत आभासी चलन ही संकल्पना रूढ झाली नव्हती. आज हे दोन्ही अडथळे दूर झाले आहेत.
(
क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलनाबद्दल अजूनही सर्वसामान्यांमध्ये अनभिज्ञता आहे. पाश्चात्त्य देशांत ‘बिटकॉइन’सारख्या आभासी चलनाच्या व्यवहारांना मान्यता मिळाली असली तरी, भारतात रिझव्र्ह बँकेने अशा चलनातील व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा वातावरणात फेसबुकच्या ‘ग्लोबलकॉइन’चे आगमन होत आहे. फेसबुकचे जगभरातील वापरकर्ते पाहिले तर ‘ग्लोबलकॉइन’चा वापरही वाढेल, अशी चिन्हे आहेत.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसानंतर जवळपास चार महिने अवघा भारत नोटाबदलीसाठी बँकांबाहेर उभा राहिल्याचे दिसून आले. नोटाबंदी करून केंद्र सरकारने काय साध्य केले, हा चर्चेचा मुद्दा ठरू शकतो; परंतु नोटाबंदीच्या निमित्ताने देशात डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, ही बाब नाकारता येणार नाही. निश्चलनीकरणापूर्वी अगदी मोजक्याच डिजिटल पेमेंट बँका वा कंपन्या आणि त्यांच्या वापरकर्त्यांचे नगण्य प्रमाण असे चित्र होते. मात्र, नोटाबंदीनंतर नाइलाजाने म्हणा किंवा रोकडरहित व्यवहारांचे महत्त्व पटल्याने म्हणा, डिजिटल व्यवहारांची संख्या वाढली. आजघडीला एखाद्या मित्राची पैशांची गरज पूर्ण करायची असेल तर, लागलीच पेटीएम किंवा फोनपे करून ती भागवली जाते. ऑनलाइन शॉपिंगसाठी ऑनलाइन व्यवहार करण्याचे प्रमाणही वाढले. एकूणच पाश्चात्त्य देशांत बऱ्याच आधीपासून रूढ झालेली डिजिटल अर्थव्यवस्था भारतातही बऱ्यापैकी रुजली आहे.
याच डिजिटल अर्थव्यवस्थेला आणखी पुढच्या पायरीवर नेणारी एक गोष्ट येत्या वर्षभरात घडणार आहे. ती म्हणजे, फेसबुकचं स्वत:चं असं आभासी चलन बाजारात येणार आहे. ‘ग्लोबल कॉइन’ नावाचं हे आभासी चलन २०२०च्या पहिल्या तिमाहीत जगभरातील देशांत जारी केलं जाईल, अशी चर्चा आहे. हे आभासी चलन फेसबुकखेरीज अन्य ईकॉमर्स संकेतस्थळांवरील खरेदीसाठीही वापरता येईल. एवढंच नव्हे तर फेसबुकचीच मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपवरून एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही ‘ग्लोबलकॉइन’ उपयुक्त ठरेल. फेसबुकने यासंदर्भात जगभरातील बँकांशी बोलणीही सुरू केली असून वर्षभरात डझनभर देशांत हे चलन कार्यान्वित होईल, अशी तंत्रजगतात चर्चा आहे.
आभासी चलन ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे आभासी चलन म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. २००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे. अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते. ‘बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे. काही दिवसांपूर्वीच एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास ९ हजार डॉलरइतके पोहोचले होते. भारतीय रुपयाच्या चौकटीत सांगायचे झाले तर एका बिटकॉइनचे मूल्य जवळपास सहा लाख सहा हजार रुपये इतके आहे. ‘बिटकॉइन’सारख्या सर्वच आभासी चलनांच्या घोडदौडीचे आणखी एक उदाहरण भारताच्याच अनुषंगाने देता येईल. सुमारे महिनाभरापूर्वी, २८ एप्रिल रोजी एका बिटकॉइनचे मूल्य ३ लाख ६० हजार रुपये इतके होते. ते २८ मे रोजी ६ लाख ६ हजार रुपयांवर पोहोचले. म्हणजेच, जर एखाद्याने एप्रिलमध्ये खरेदी केलेला एक बिटकॉइन मेमध्ये विकला तर महिनाभरात त्याला तब्बल तीन लाख रुपयांचा घसघशीत नफा कमवता आला असेल.
तर असं हे आभासी चलनाचं वाढतं साम्राज्य. आभासी चलनाला अजूनही अनेक देशांत मान्यता मिळालेली नाही. आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तरीही या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात आहे. साहजिकच फेसबुकने हे ताडले आणि या नव्या उद्योगात शिरकाव करण्याचा निर्णय घेतला. तसं तर फेसबुकने दहा वर्षांपूर्वीही ‘फेसबुक क्रेडिट’ हे आभासी चलन जारी केले होते. फेसबुकवरून खेळल्या जाणाऱ्या गेम्स किंवा वापरल्या जाणाऱ्या अॅपमधील खरेदीसाठी ‘फेसबुक क्रेडिट’चा वापर करता येत होता. त्या वेळी एका डॉलरला दहा फेसबुक क्रेडिट मिळत होते. मात्र, ‘फेसबुक क्रेडिट’ वापरकर्त्यांच्या पचनी पडले नाही. याची दोन कारणे होती. एक म्हणजे, त्या काळी फेसबुक आजच्याइतके जगभरात रुजले नव्हते आणि दुसरे म्हणजे, तोपर्यंत आभासी चलन ही संकल्पना रूढ झाली नव्हती. आज हे दोन्ही अडथळे दूर झाले आहेत.
असे असले तरी, फेसबुकचे ‘ग्लोबलकॉइन’ हे अन्य आभासी चलनांच्या तुलनेत खूप वेगळे असणार आहे. आभासी चलनाची मूळ संकल्पना गोपनीयतेवर आणि मुक्तव्यवस्थेवर बेतलेली आहे. मघाशी म्हटल्याप्रमाणे त्यावर कोणा एकाच मक्तेदारी नाही (अगदी बिटकॉइनची निर्मिती करणाऱ्या साकोशी नाकामोतोचीही नाही!) नाही म्हणायला या आभासी चलनाचा माग काढणारी ‘ब्लॉकचेन’ यंत्रणा अस्तित्वात आहे; पण ही यंत्रणा केवळ वापरकर्त्यांच्या विश्वासार्हतेसाठी आहे. आपल्याकडे आलेले आभासी चलन हे खरोखरच अस्तित्वात आहे का, याच्या पडताळणीचे काम ‘ब्लॉकचेन’ करते. ‘ब्लॉकचेन’ ही एका प्रकारची अदृश्य साखळी आहे, जी एखाद्या बिटकॉइनचा एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास दर्शवते. या साखळीवरील ठिपके बिटकॉइनच्या हस्तांतराचे टप्पे दर्शवतात. मात्र, ते हस्तांतर करणारे कोण, याचा उलगडा करून देत नाहीत. फेसबुकच्या ‘ग्लोबलकॉइन’ची संकल्पना मात्र, यापेक्षा वेगळी असणार आहे. मुळात ‘ग्लोबलकॉइन’च्या उलाढालीवर फेसबुकचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे त्याचे व्यावहारिक मूल्य ठरवण्याचा अधिकारही फेसबुककडे असेल. आभासी चलनाच्या सध्याच्या संकल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे हे.
दुसरं म्हणजे, फेसबुकने ‘ग्लोबलकॉइन’ला अधिमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी विविध देशांतील प्रमुख बँकांशी, नामांकित ईकॉमर्स संकेतस्थळांशी, ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मशी त्यांची बोलणी सुरू आहेत. बिटकॉइन किंवा अन्य कोणत्याही आभासी चलनाने गेल्या दशकभरात असे प्रयत्न केले नाहीत. उलट या प्रस्थापित यंत्रणेपासून स्वत:ला किती वेगळे ठेवता येईल, यावरच या आभासी चलनांनी भर दिला.
मग फेसबुकच्या ‘ग्लोबलकॉइन’चा प्रसार कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो; पण याचे उत्तर फेसबुकच्याच सद्य:स्थितीत दडले आहे. फेसबुक ही आज जगभरातील सर्वात मोठय़ा कंपन्यांपैकी एक आहे. फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या आज अडीच अब्जांच्या आसपास पोहोचली आहे. जगभरातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेलं व्हॉट्सअॅप फेसबुकच्या मालकीचं आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची कल्पनाच अनेकांना उत्साहित करणारी आहे. अशा परिस्थितीत फेसबुकचं आभासी चलन लोकप्रिय होणार नाही तर नवलच. उलट भविष्यात कदाचित ते सर्वात मोठं जागतिक चलनही ठरू शकेल. किमान आभासी दुनियेत तरी!
0
Answer link
Cryptocurrency बद्दल मराठी मध्ये संपूर्ण माहिती
Cryptocurrency ही एक डिजिटल क्रिप्टोग्राफिक करन्सी आहे, तसेच डिजिटल असेट्स सुद्धा आहे. जिचा वापर वस्तुंच्या खरेदी आणि विक्री साठी तसेच वेगवेगळया प्रकारच्या सेवेसाठी केला जात असतो. अणि इंटरनेट च्या माध्यमातुन ह्या करन्सी चा वापर हा दैनंदिन करन्सी च्या स्वरूपात तसेच इतर आँनलाईन सेवा तसेच सुविधा खरेदी आणि विक्री करण्यासाठी केल्या जाऊ शकतो.
जर तुम्हाला Cryptocurrency म्हणजे काय आहे आणि ते कसं काम करते आणि या करन्सी मध्ये इन्व्हेस्ट कसे करायचे याबद्दल आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर आमच्या मराठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला नवनवीन तंत्रज्ञान, शेअर मार्केट, इंटरनेट, डिजिटल मार्केटिंग अश्या विविध प्रकारची इंटरेस्टिंग माहिती वाचायला मिळेल.
2
Answer link
🔶 Pi Network परिचय
पाई Network हे एक क्रिप्टो चलन आहे. जे सध्या दुसऱ्या phase या टप्प्यात आहे, आणि तिसर्या टप्प्यावर जाऊन एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जाईल. जिथे त्यास मान्यता मिळेल, व नंतर खरेदी विक्री करू शकता, किंवा व्यापार करू शकता. सध्या pi चे मूल्य शून्य आहे. याचे मूल्य तिसर्या टप्प्यात निश्चित केले जाईल. तिसरा टप्पा या वर्षाच्या 2021 च्या शेवटी येणार आहे. तोपर्यंत पाई शक्य तितक्या गोळा करा.
या अॅपमध्ये आपल्याला काय करावे लागेल?
आपल्याला दर 24 तासांनी टेपवर क्लिक करावे लागेल, यामुळे दररोज आपल्याला माइनिंग होत राहिल, आणि पाई मिळवता येतील. जे स्क्रीनच्या शीर्षस्थानी दिसतील. आपण 24 तासांनंतर क्लिक न केल्यास आपण निष्क्रिय व्हाल आणि आपण अनुप्रयोग उघडल्याशिवाय टेपवर क्लिक करेपर्यंत आणि सक्रिय होईपर्यंत आपली माइनिंग थांबेल. आपण कमाईचा वेग वाढवू इच्छित असल्यास माइनिंग गती दोन मार्गांनी वाढेल. प्रथम आपल्याला आणि लोकांना आमंत्रित करणे. दुसरे म्हणजे जेव्हा आपण या अॅपवर 3 दिवस सतत क्लिक कराल, तेव्हा आपला कंट्रीब्युटर रोल अनलॉक होईल, जेव्हा आपण सेक्युरिटी सर्कल मध्ये 5 pi उपयोगी करताना जोडल्या नंतर, पाई माइनिंग वेग वाढेल.
https://minepi.com/Vikasbhaygude
0
Answer link
आयएक्स ग्लोबल (iX Global) बद्दल माहिती
आयएक्स ग्लोबल ही एक खाजगी मालकीची कंपनी आहे जी लोकांना आर्थिक आणि वैयक्तिक वाढीसाठी शिक्षण आणि साधने प्रदान करते. ही कंपनी 2020 मध्ये स्थापन झाली आणि तिचे मुख्यालय सॉल्ट लेक सिटी, यूटा येथे आहे.
मुख्य उत्पादने आणि सेवा:
- वित्तीय शिक्षण (Financial Education): कंपनी वित्तीय बाजार, व्यापार आणि गुंतवणुकीबद्दल विविध प्रकारचे शिक्षण साहित्य आणि अभ्यासक्रम पुरवते.
- सॉफ्टवेअर आणि साधने (Software and Tools): आयएक्स ग्लोबल सदस्यांना व्यापार आणि गुंतवणुकीसाठी विविध सॉफ्टवेअर टूल्स आणि प्लॅटफॉर्म देखील प्रदान करते.
- वैयक्तिक विकास (Personal Development): या कंपनीतर्फे व्यक्तिगत विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि मार्गदर्शन दिले जाते.
- क्रिप्टो प्रशिक्षण (Crypto Education): क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन.
व्यवसाय मॉडेल (Business Model):
आयएक्स ग्लोबल हे मल्टी-लेव्हल मार्केटिंग (MLM) मॉडेलवर आधारित आहे, ज्यात सदस्य बनून लोकांना भरती करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. सदस्यांना त्यांच्या भरती केलेल्या लोकांकडून कमिशन मिळते.
टीका आणि वाद (Criticism and Controversies):
आयएक्स ग्लोबलच्या व्यवसाय मॉडेलवर अनेकदा टीका झाली आहे, काहीजण याला पिरामिड स्कीम (Pyramid scheme) देखील म्हणतात. पिरामिड स्कीममध्ये, उत्पादने किंवा सेवांच्या विक्रीऐवजी नवीन सदस्यांना भरती करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते.
निष्कर्ष:
आयएक्स ग्लोबल वित्तीय आणि वैयक्तिक विकासाचे शिक्षण देणारी कंपनी आहे, परंतु संभाव्य सदस्यांनी MLM मॉडेल आणि त्यासंबंधित धोके लक्षात घेणे आवश्यक आहे. गुंतवणूक किंवा सदस्य बनण्यापूर्वी कंपनीबद्दल संपूर्ण माहिती मिळवणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी स्रोत:
हे लक्षात ठेवा की कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणत्याही MLM कंपनीत सामील होण्यापूर्वी, आपली स्वतःची तपासणी करणे आणि आवश्यक ती माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे.
0
Answer link
मला माफ करा, परंतु माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसा डेटा नाही. बुलक यांनी सुरू केलेल्या नवीन नाण्यांबद्दल मला कोणतीही माहिती नाही.
अधिक अचूक उत्तरासाठी, कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा किंवा अधिक माहिती द्या.