Topic icon

खाद्य व्यवसाय

0

वडापाव गाड्यांसाठी काही नावे:

  • मुंबई वडापाव
  • स्ट्रीट वडापाव
  • झटपट वडापाव
  • टेस्टी वडापाव
  • गरमा गरम वडापाव
  • स्पेशल वडापाव
  • बॉम्बे वडापाव
  • वडापाव जंक्शन
  • वडापाव एक्सप्रेस
  • Balaji Vadapav
उत्तर लिहिले · 27/9/2025
कर्म · 3640
1
हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. ... हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो.नफाही भरपूर होईल.
सुशिक्षित युवकांसाठी मार्गदर्शन........

१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा. 
२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा. 
३ 】मासे विकणे. दिडपट नफा.
४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे. 
५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात
६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात 
७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात. 
८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.
९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा. 
१०】 ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका. 
११ 】चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात. 
१२】 घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा. 
१३】 फळ विक्री करा. 
१४ 】शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात. 
१५ 】कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा. 
१६】 फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात. 
१७ 】सातारा येथे राजवाड्याजवळ सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल. 
१८】मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे. 
१९】 मंदिराजवळ नारळ विक्री करा
२० फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका. यात खुप फायदा आहे. 
२१】 हाॅटेलला कडधान्ये पुरवणे. 
२२】 हाॅटेलला बटाटे खुप लागतात. सप्लाय करा. 
२३ 】घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट फूड मार्ट ला विका किंवा स्वतः रिटेल करा. 
२४】 लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर तयार करुन विका. चांगले मार्जिन मिळते. 
२५】 मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात. हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका. 
२६】 एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका. आपल्या ग्रुपवर त्याचे होलसेलर आहेत
२७】 ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत. 
२८】 महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता. भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते 
२९】 प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे. 
३०】 पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात. 
३१】 प्लंबिंग काम शिकून घ्या. दररोज हजार रुपये 'सहज कमवा'.
३२】 विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते. 
३३】 काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका. 
३४】 गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका. 
३५】 खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते. 
३६】 गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील. 
३७】 फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता. 
३८】 स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील. 
३९】 आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे 
४०】 भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या. 
४१】 उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता. शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.
४२】 उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते. तसे विका
४३】देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात. 
४४】रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल
४५】जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते. 
४६】शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात. 
४७】धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे. 
४८】रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते. 
४९】रिचार्ज चा बिझनेसही खुप चांगला आहे. एक हजारपासून सुरु करता येतो. विशिष्ठ टारगेट पुर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात. 
५०】 सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझिनेस म्हणजे मोबाईल अॅक्सेसरीज विकणे....

मित्रानो,स्वावलंबी व्हा, जिद्दीने जगा,श्रीमंत व्हा,रुबाबात रहा,गरजू-गरिबांना मदत करा,तुम्ही पण श्रीमंत होऊ शकता हे कायम ध्यानात ठेवा.

व्यवसाय हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
उत्तर लिहिले · 21/8/2023
कर्म · 53750
0
वडापाव हा कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे?
उत्तर लिहिले · 26/5/2023
कर्म · 0
0

नमस्कार! अमृततुल्य हे चहाचे दुकान कसे सुरु करायचे, याची माहिती खालीलप्रमाणे:

अमृततुल्य: चहाच्या दुकानाची माहिती

अमृततुल्य हे एक लोकप्रिय चहाचे दुकान आहे. हे दुकान सुरू करण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे:

1. जागेची निवड:
  • अमृततुल्य सुरू करण्यासाठी योग्य जागा निवडणे खूप महत्त्वाचे आहे.
  • जागा निवडताना ती बाजारपेठ, बस स्टॉप किंवा जास्त लोकांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी असावी.
  • शक्यतो जागा 100-300 स्क्वेअर फूट असावी.
2. आवश्यक उपकरणे:
  • चहा बनवण्यासाठी लागणारी उपकरणे:
    • चहाची भांडी
    • स्टोव्ह
    • गॅस सिलेंडर
    • चहा गाळण्याची किटली
    • कप आणि बश्या
  • इतर आवश्यक उपकरणे:
    • फर्निचर (टेबल, खुर्च्या)
    • कॅश काउंटर
    • वॉटर फिल्टर
3. साहित्य:
  • चहा पावडर
  • साखर
  • दूध
  • आले, वेलची, लवंग (इत्यादी)
  • इतर आवश्यक साहित्य
4. भांडवल:

अमृततुल्य सुरू करण्यासाठी अंदाजे भांडवल:

  • जागेचे भाडे: ₹5,000 - ₹20,000 (ठिकाणानुसार)
  • उपकरणे: ₹20,000 - ₹50,000
  • साहित्य: ₹5,000 - ₹10,000 ( per month)
  • इतर खर्च: ₹5,000 - ₹10,000
  • एकूण: ₹35,000 - ₹90,000
5. आवश्यक परवानग्या आणि नोंदणी:
  • FSSAI परवाना ( Food Safety and Standards Authority of India)
  • GST नोंदणी ( Goods and Services Tax)
  • स्थानिक प्राधिकरणाकडून परवाना
6. अमृततुल्य चहा बनवण्याची प्रक्रिया:
  1. प्रथम पाणी उकळा.
  2. त्यात चहा पावडर, आले, वेलची, लवंग (आवश्यकतेनुसार) टाका.
  3. साखर आणि दूध घालून चांगले उकळू द्या.
  4. चहा गाळून कपमध्ये सर्व्ह करा.
7. इतर महत्वाचे मुद्दे:
  • स्वच्छता: दुकानाची आणि परिसराची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.
  • सेवा: ग्राहकांना चांगली आणि जलद सेवा देणे महत्त्वाचे आहे.
  • मार्केटिंग: आपल्या दुकानाची जाहिरात करणे आवश्यक आहे.

हे सर्व मुद्दे विचारात घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा अमृततुल्य चहाचा व्यवसाय सुरू करू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3640
0
सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर लिहिले · 30/6/2022
कर्म · 0